Thursday, May 7, 2026
Homeमुख्य बातम्याShubhanshu Shukla : तब्बल ४१ वर्षांनंतर भारतीय अंतराळवीराची  गगनभरारी; शुभांशू शुक्ला Axiom-4...

Shubhanshu Shukla : तब्बल ४१ वर्षांनंतर भारतीय अंतराळवीराची  गगनभरारी; शुभांशू शुक्ला Axiom-4 मिशनसाठी रवाना

नवी दिल्ली | New Delhi

भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला (Shubhanshu Shukla) यांनी आज (बुधवार दि.२५ रोजी) दुपारी १२ वाजून ०१ मिनिटांनी अवकाशात झेप घेतली. अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला इतर तीन आंतराळवीरांना घेऊन अ‍ॅक्सिओम-४ मिशन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) यशस्वीरित्या रवाना झाले आहे. या मिशनचे नेतृत्व नासाचे माजी अंतराळवीर पेगी व्हिटसन हे करत आहे. तसेच, हंगेरीचा अंतराळवीर टिबोर कपू आणि पोलंडचा स्लोव्होज उडनास्की विस्निव्हस्की तज्ज्ञ म्हणून सोबत असतील.

- Advertisement -

मिशन लॉंच होत असताना शुभांशू शुक्ला यांचे आई-वडील (Mother and Father) देखील उपस्थित होते. यावेळी त्यांच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. त्यांच्यासह हा संपूर्ण देशासाठी हा क्षण अत्यंत अभिमानाचा ठरला. यापूर्वी ही मोहिम अनेकदा लांबणीवर पडली होती. मात्र आज अॅक्झिओम मोहिमेचे प्रक्षेपण पार पडले आहे. ३ एप्रिल १९८४ रोजी भारताचे आंतराळवीर राकेश शर्मा यांनी सोविएत संघाच्या मदतीने अंतराळात पाऊल ठेवले होते. त्यानंतर आता ४१ वर्षांनंतर शुभांशू शुक्ला यांची निवड झाली आहे.

शुभांशू हे लखनौचे रहिवासी असून एअरफोर्सवर ग्रुप कॅप्टन पदावर कार्यरत आहे. एक वर्षांच्या कठोर ट्रेनिंगनंतर त्यांची स्पेस मिशनसाठी निवड झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, इस्रो शुभांशु शुक्ला यांच्या एक्सिओम-४ मिशनसाठी ५५० कोटींचा खर्च करत आहे. मात्र १९५४ साली जेव्हा राकेश शर्मा अंतराळात गेले होते, तेव्हा भारताकडून अधिक खर्च करण्यात आला नव्हता.त्यावेळी सोवियत संघाने त्या स्पेस मिशनची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती.

शुभांशू शुक्ला यांनी या मोहिमेत अंतराळयानात त्यांच्यासोबत काही मिठाई, आंब्याचा रस, गाजराचा हलवा आणि मूग डाळ हलवा घेऊन गेले आहेत. तसेच शुक्ला यांनी त्यांच्याबरोबर एक सॉफ्ट टॉयदेखील सोबत नेला आहे. ज्याचे नाव शुभांशू यांनी जॉय असे ठेवले आहे. एका ऑनलाइन पत्रकार परिषदेत त्यांनी हंसचे सॉफ्ट टॉय दाखवले होते. अ‍ॅक्सिओम-४ मिशनमधील हा पाचवा क्रू मेंबर असेल असेही शुक्ला यांनी सांगितले होते.

दरम्यान, शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ (Space) स्थानकावर सात प्रकारचे प्रयोग करणार आहेत. यामध्ये अंतराळ स्थानकाच्या आत भारतीय सूक्ष्म गुरूत्वाकर्षण प्रयोगांचा समावेश आहे. शरीराचे स्नायू अंतराळात स्वत:ची दुरूस्ती करण्यास सक्षम आहेत की नाही. तिथे कडधान्यांना अंकुर कसे फुटतात? अंतराळात जीवाणूंवर काय परिणाम होतो? तसेच अंतराळात भात, वांगी आणि टोमॅटोच्या बियाण्यांच्या विकासावरही संशोधन करतील. तर मूग आणि मेथीची अंतराळात लागवड कशी करतात हे देखील शुक्ला जाणून घेणार आहेत.

या कारणांमुळे प्रक्षेपणाला उशीर

यापूर्वी आधी खराब हवामानामुळे आणि नंतर स्पेसएक्सच्या फाल्कन-९ रॉकेटआणि नंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या रशियन मॉड्यूलमध्ये गळती आढळल्याने अ‍ॅक्सिओम-४ मिशनचे प्रक्षेपण अनेकवेळा लांबणीवर पडले होते. यापूर्वी २९ मे रोजी अ‍ॅक्सिओम-४ मिशन लाँच होणार होते. त्यानंतर ८ जून, १० जून आणि ११ जूनपर्यंत पुढे ढकलावी लागली.

ताज्या बातम्या

निदा

Nashik TCS: धर्मांतरासाठी आंतरराष्ट्रीय सिंडीकेटचा कट? निदा खानवर नव्या गुन्ह्याची नोंद

0
नाशिक | प्रतिनिधीटीसीएस कंपनीतील बलात्कार, विनयभंग आणि धर्मांतराच्या प्रयत्नाचे प्रकरणात एक मोठे आंतरराष्ट्रीय सिंडिकेट सक्रिय असल्याचा संशय नाशिक जिल्हा न्यायालयाने व्यक्त केला होता तर,...