नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
सुपरस्टार थलपती विजय याने तामिळनाडूत चमत्कार घडवला. त्याचा पक्ष TVK सरकार स्थापन करेल. त्याने निवडणुकीत मतदारांना अनेक मोठी आश्वासनं दिली होती. त्यातील सर्वात मोठे आश्वासन हे सोने वाटप करण्याचे होते. विशेषतः नवजात बालकांना सोन्याची अंगठी आणि गरीब कुटुंबातील वधूंना 8 ग्रॅम सोने देण्याच्या घोषणेमुळे राज्याच्या राजकारणात याची चर्चा सुरु आहे.
सोन्याच्या वचनाची जोरदार चर्चा
TVK पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील मुलींच्या विवाहासाठी ८ ग्रॅम सोने आणि सिल्क साडी देण्याचे आश्वासन दिले होते. सध्या २२ कॅरेट सोन्याचा दर सुमारे 14 हजार रुपये प्रति ग्रॅमच्या आसपास असल्याने एका लाभार्थीवरच मोठा खर्च होणार आहे. थलापती यांनी वारेमाप कल्याणकारी योजना जाहीर केल्या आहेत. त्यांनी जाहीरनाम्यात जी आश्वासने दिली आहे. त्यामुळे तामिळनाडू सरकाच्या खर्चात ५२ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
Nashik Crime News: त्र्यंबकेश्वर व्हिआयपी दर्शन घोटाळ; बेरोजगार एजंटच्या खात्यात लाखोंची उलाढाल
त्यातच, तमिळनाडूमध्ये दरवर्षी लाखो विवाह होतात. अंदाजानुसार, जर 60 टक्के कुटुंबे या योजनेसाठी पात्र ठरली, तर दरवर्षी सुमारे 2.7 लाख वधूंना सोनं द्यावं लागेल. केवळ या योजनेसाठीच सरकारवर 3 हजार कोटी रुपयांहून अधिक आर्थिक भार पडू शकतो. सध्या जनकल्याण योजनांवर ६५००० कोटी रुपये खर्च येतो. तो वाढून १ लाख कोटी रुपयांपर्यंत होईल. TVK पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींच्या लग्नासाठी मदतीचे आश्वासन दिले आहे. पक्षाने वार्षिक ५ लाखांपेक्षा कमी उत्पन्न गटातील कुटुंबामधील नवरीला ८ ग्रॅम सोने आणि एक सिल्क साडी देण्याचे आश्वासन दिले आहे.
नवजात बालकांना सोन्याची अंगठी
विजयने नवजात बालकांना सोन्याची अंगठी देण्याचेही आश्वासन दिले आहे. राज्यात दरवर्षी सुमारे 7.8 लाख बालकांचा जन्म होतो. यापैकी 60 टक्के गरीब कुटुंबांतील मुलांना अंगठी देण्याचा विचार केला, तरी लाखो अंगठ्या तयार कराव्या लागतील. राज्यात जन्मदर घसरला आहे. वर्ष २०२५ मध्ये जवळपास ७.८ लाख मुलांनी जन्म घेतला होता. एका अंदाजानुसार, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांना लाभ देण्याचे ठरवले तरी जवळपास ४.७ लाख मुलांना सोन्याची अंगठी द्यावी लागेल. एका अंगठीची किंमत साधारण ५ हजार रुपये धरली, तरी या योजनेसाठी शेकडो कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
RBI ची मदत का हवी?
या दोन्ही योजनांसाठी सरकारला दरवर्षी हजारो किलो सोन्याची आवश्यकता भासू शकते. केवळ वधूंसाठीच्या योजनेतच सुमारे 2160 किलो सोने लागेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करण्यासाठी आर्थिक आणि नियामक प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यामुळे या व्यवहारांसाठी Reserve Bank of India अर्थात RBI ची मदत किंवा मंजुरी आवश्यक आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.




