नवी दिल्ली | New Delhi
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी फास्टॅगबाबत एक नवीन घोषणा केली आहे. त्यानुसार आता फास्टॅगशी (Fast Tag) जोडलेला एक नवीन वार्षिक पास (Pass) उपलब्ध होणार आहे. हा वार्षिक पास राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणाऱ्यांसाठी असून, १५ ऑगस्ट २०२५ पासून लागू होणार आहे. देशभरात फक्त ३ हजार रूपयात फास्टॅगचा वार्षिक पास मिळणार आहे.
नितीन गडकरींची घोषणा नेमकी काय?
एका ऐतिहासिक उपक्रमात, १५ ऑगस्ट २०२५ पासून तीन हजार रुपयांचा फास्टॅग आधारित वार्षिक पास सुरू करण्यात येत आहे. हा पास सक्रिय झाल्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी किंवा २०० प्रवासांपर्यंत, जे आधी असेल ते वैध असेल. हा पास विशेषतः गैर-व्यावसायिक खाजगी वाहनांसाठी (कार, जीप, व्हॅन इ.) डिझाइन केला आहे आणि देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर अखंड प्रवास करण्यास सक्षम करेल. वार्षिक पास सक्रिय करण्यासाठी/नूतनीकरणासाठी एक स्वतंत्र लिंक लवकरच हायवे ट्रॅव्हल अॅप आणि NHAI/MoRTH वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाईल, ज्यामुळे प्रक्रिया सोपी आणि सुलभ होणार आहे.
महत्वपूर्ण घोषणा। ????
एक ऐतिहासिक पहल के तहत, 15 अगस्त 2025 से ₹3,000 की कीमत वाला FASTag आधारित वार्षिक पास शुरू किया जा है। यह पास सक्रिय होने की तिथि से एक वर्ष तक या 200 यात्राओं तक, जो भी पहले हो, वैध रहेगा।
यह पास केवल गैर-व्यावसायिक निजी वाहनों (कार, जीप, वैन आदि) के लिए…
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) June 18, 2025
नवीन पासचा उद्देश नेमका काय?
नवीन वार्षिक पास धोरणाचा उद्देश ६० किमीच्या परिघात असलेल्या टोल प्लाझांशी (Toll Both) संबंधित दीर्घकालीन समस्या सोडवणे आहे. एकाच डिजिटल व्यवहाराद्वारे टोल पेमेंट सोपे करणे, टोल प्लाझावरील प्रतीक्षा वेळ कमी करणे, गर्दी कमी करणे आणि वादाचे प्रसंग टाळणे यासाठी होणार आहे.
टोलमधून किती उत्पन्न मिळणार?
मिळालेल्या माहितीनुसार, २०२३ -२४ मध्ये एकूण ५५ हजार कोटी रुपयांच्या टोल महसुलापैकी खासगी कारचा वाटा फक्त ८ हजार कोटी रुपये होता. टोल प्लाझावरील वाहतुकीत खासगी गाड्यांचा वाटा ५३ टक्के असतो पण महसूलात त्यांचा वाटा फक्त २१ टक्के असतो. शिवाय सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत खासगी वाहनांचा वाटा जवळजवळ ६० टक्के असतो. तर व्यावसायिक वाहने दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेत धावतात, असे टोल व्यवहारांच्या विश्लेषणातून समोर आले आहे.
पास कुठे मिळणार?
फास्टॅग वार्षिक पास अधिकृत NHAI FASTag पोर्टल किंवा तुमच्या फास्टॅग जारी करणाऱ्या बँकेच्या वेबसाइटवरून खरेदी करता येऊ शकतो. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा वापर करूनीही तुम्ही फास्टटॅग वार्षिक पास खरेदी करु शकता. अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमचा वाहन नोंदणी क्रमांक आणि मोबाइल नंबर आवश्यक असेल. तीन हजार किमतीचा वार्षिक पास, एका वर्षासाठी सर्व राष्ट्रीय महामार्गांवर अमर्यादित प्रवास करण्यास अनुमती देतो.





