Tuesday, December 3, 2024
Homeदेश विदेशHaryana CM Nayab Saini : नायब सिंह सैनींनी दुसऱ्यांदा घेतली हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदाची...

Haryana CM Nayab Saini : नायब सिंह सैनींनी दुसऱ्यांदा घेतली हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ; कोण कोण बनले मंत्री?

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते नायब सिंग सैनी यांनी दुसऱ्यांदा हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गुरुवारी नायब सिंह सैनी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पंचकुला येथील दशहरा मैदानात हा शपथविधीचा कार्यक्रम झाला. सैनी यांच्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते. याशिवाय, भाजपाशासित राज्यांचे अनेक मुख्यमंत्रीही या सोहळ्याला उपस्थित होते.

सीएम सैनी यांच्यासह १४ आमदारांनी कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजप आमदार अनिल विज यांनी देखील कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. ते राज्यातील भाजपच्या ज्येष्ठ आमदारांपैकी एक आहेत. अनिल विज सातव्यांदा अंबाला कँटमधून आमदार झाले. ते ७० च्या दशकात संघात सामील झाले आणि ते पंजाबी समजाचे प्रतिनिधीत्व करतात. अनिल विज यांच्यानंतर किशन लाल पवारने मंत्री पदाची शपथ घेतली. ते इसराना विधानसभा जागेवरून सहाव्यांदा आमदार बनलेत. खट्टर सरकार असतांना म्हणजेच २०१५ ते २०१९ पर्यंत अनेक खात्याचं मंत्रीपद भुषवलंय.

- Advertisement -

तसेच, यावेळी दोन महिला आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. केंद्रीय मंत्री इंद्रजीत राव सिंह यांची मुलगी आरती राव आणि माजी मुख्यमंत्री चौधरी बन्सीलाल यांची नात व तोशाम मतदारसंघाच्या आमदार श्रुती चौधरी यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.

या आमदारांनी घेतली शपथ
अनिल विज, कृष्ण लाल पंवार, विपुल गोयल, राव नरवीर सिंह, महिपाल ढांडा, श्रुति चौधरी, अरविंद शर्मा, श्याम सिंह राणा, रणबीर गंगवा, कृष्ण बेदी, गौरव गौतम, आरती राव, राजेश नागर यांना हरयाणा सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याचे सांगितले जात आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या