दिल्ली । Delhi
नॅशनल बोर्ड ऑफ एग्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (National Board of Examinations in Medical Sciences NBEMS) ने NEET PG परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
आता ही परीक्षा आता ११ ऑगस्ट रोजी दोन सत्रामध्ये घेतली जाणार आहे. यासंदर्भातील एक परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. विद्यार्थी नीट पीजी परीक्षेचं नवं वेळापत्रक एनबीईची वेबसाईट natboard.edu.in वर पाहू शकतात. नीट पीजी परीक्षा ही नीट यूजी परीक्षेतील गैरप्रकार, नेट परीक्षेतील गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर टाकण्यात आली होती.
हे ही वाचा : चौघांना साठ लाखांचा गंडा
प्रवेशपत्र कधी भेटणार?
नीट पीजी २०२४ परीक्षेची नवीन तारीख जाहीर झाल्यानंतर आता परीक्षेच्या नवीन तारखेसह नीट पीजी २०२४ परीक्षेसाठी प्रवेशपत्र पुन्हा जारी करण्याची शक्यता आहे. या परीक्षेच्या आधी एक आठवडा हे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी ऑनलाईन उपलब्ध केले जाणार आहेत. यासंदर्भात अधिकृत वेबसाईटवरून प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहेत.
हे देखील वाचा : शेअर मार्केटमध्ये कोटींची गुंतवणूक, एकही कार नाही; पंकजा मुंडेंची संपत्ती नेमकी किती?
देशभरात पदवी स्तरावरील वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी नीट यूजी परीक्षा आयोजित केली जाते. या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर नेट म्हणजेच राष्ट्रीय पात्रता परीक्षेत देखील गोंधळ निर्माण झाला होता. यानंतर २३ जूनला होणारी नीट पीजी परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती. नीट यूजी आणि राष्ट्रीय पात्रता परीक्षेचं आयोजन नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून केलं जातं. या दोन्ही परीक्षेत मोठा गैरप्रकार झाल्यानंतर नीट पीजी परीक्षा अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकली गेली होती.