Tuesday, July 23, 2024
Homeब्रेकिंग न्यूजहो, मी लढण्यास इच्छुक होतो पण,…; राज्यसभा खासदारकीवरुन मंत्री छगन भुजबळ काय...

हो, मी लढण्यास इच्छुक होतो पण,…; राज्यसभा खासदारकीवरुन मंत्री छगन भुजबळ काय म्हणाले?

पुणे | Pune
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमुळे महायुतीला महाराष्ट्रात फटका बसला आहे. याचे कारण राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे RSS ने म्हणत नाराजी व्यक्त केली होती. याबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना विचारले असता त्यांनी या विषयावर भाष्य केले आहे. ते पुण्यातील भिडे वाड्याची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

- Advertisement -

काय म्हणाले छगन भुजबळ?
४८ जागामधील आम्हाला ४ जागा दिल्या. चारमधील दोन जागा शिरुरमध्ये शिंदेंचे आढळराव पाटील होते, तर परभणीमध्ये महादेव जानकर यांना उमेदवारी दिली. आम्हाला फक्त रायगड आणि बारमती या जागाच मिळाल्या. एका जागेवर विजय झाला, दुसऱ्या जागेवर पराभव झाला. आमच्यामुळे ४८ जागांवर परिणाम झाला, असे कसे म्हणू शकता. आम्हाला फक्त दोनच जागा मिळाल्या. त्यातही एक जिंकली. मग आमच्यामुळे फटका कसा बसलेला असू शकतो?

छगन भुजबळ म्हणाले, थोडीफार पिछेहाट झाली आहे, पण फक्त महाराष्ट्रातच झाली का? दुसऱ्या राज्यातही फटका बसलाच आहे ना? उत्तर प्रदेशमध्ये इतका मोठा फटका बसेल, असे कुणीच म्हणत नव्हते. त्यामुळे राज्यात भाजपला फटका बसण्याचे कारण अजित पवार गट असल्याचे म्हणून शकत नाही, असे छगन भुजबळ म्हणाले.

मी तयारी सुरु केली होती पण…
लोकसभा लढवण्यास मी तयार झालो होतो. मला दिल्लीतून निवडणूक लढवण्याचा संदेश मिळाला होता. त्यानंतर मी तयारी सुरु केली होती. परंतु एक महिना झाल्यानंतर उमेदवारी जाहीर केली गेली नाही. यामुळे मी थांबण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे स्पर्धक उमेदवार एका महिन्यापासून कामाला लागले होते. नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार अर्ज भरण्याच्या एका दिवशीपूर्वी जाहीर झाला. त्या सर्वांचे परिणाम जय पराजय झाला, असे स्पष्टपणे छगन भुजबळ यांनी सांगितले.

राज्यसभेच्या उमेदवारीवर भुमिका स्पष्ट केली
हो, मी लढण्यासाठी इच्छूक होतो. पण पक्ष म्हटले की सगळ्याच गोष्टी तुमच्या म्हणण्याप्रमाणे होत नाही. थांबावे लागते. आपल्याला वाटते असे व्हायला हवे, पण होत नाही. त्यासाठी वेगवेगळी कारण असतील. पक्ष म्हणातल्यावर अनेक गोष्टी घडतात पक्षात सगळे काही मनासारखे होत नाही, असे छगन भुजबळ म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या