Sunday, December 15, 2024
Homeब्रेकिंग न्यूजJitendra Awhad: जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदेंच्या भेटीला; उदय सामंतांनी भेटीचं सांगितलं कारण

Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदेंच्या भेटीला; उदय सामंतांनी भेटीचं सांगितलं कारण

मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आव्हाड हे शिंदेंच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी गेले आहेत. वर्षा बंगल्यावर जाऊन जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांची ही भेट घेतली आहे. भेटीमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पण, या दोन नेत्यांच्या भेटीची चर्चा मात्र सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता राज्यात सत्तास्थापन आणि मुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीवरुन खल सुरु आहे. त्यामुळे राज्याचा कारभार सध्या काळजीवाहू मुख्ममंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच पाहत आहेत. आता त्यांच्या भेटीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नवनियुक्त आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भेट घेतली आहे.

- Advertisement -

अजित पवार अर्थमंत्री असताना अनेकदा मागणी करूनही त्यांनी आपल्याला निधी दिला नव्हता अशी तक्रार या आधी जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या बाजूलाच राहतात त्यामुळे त्यांनी आपल्याला अनेकदा मदत केली होती असंही त्यांनी सांगितले होते. दरम्यान, या भेटीबाबत शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी आव्हाड यांच्या भेटीबाबत खुलासा केला आहे. आव्हाड ठाण्याचे आहेत. त्यामुळे मित्र म्हणून त्यांना भेट घ्यायची असेल, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. आव्हाड आमच्यासोबत आले तर स्वागतच आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

या आधी गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी जितेंद्र आव्हाडांनी एकनाथ शिंदे यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळीही या दोन नेत्यांमध्ये जवळपास १५ मिनिटे चर्चा झाली होती. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या