Saturday, July 4, 2026
Homeनाशिकराष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे करोना पॉझिटिव्ह

राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे करोना पॉझिटिव्ह

नाशिकरोड l प्रतिनिधी

देवळाली विधान सभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आमदार अहिरे यांच्या एका नातेवाईकाचे निधन झाले होते. याठिकाणी अंत्यविधीसह काही दिवस त्या सहकुटुंब मुंबईत उपस्थित होत्या. यातूनच त्यांना करोनाची बाधा झाल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

दरम्यान, त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आल्यानंतर आमदार आहिरे यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दहा दिवस गृहस्थानबद्ध राहण्याचा सल्ला दिला होता. यादरम्यान, आमदार आहिरे यांच्यासह काही कुटुंबातील सदस्यांचे स्वब नमुने तपासणीला पाठविण्यात आले होते. या नमुन्यांचे अहवाल आज प्राप्त झाले. यामध्ये आमदार अहिरे यांचा अहवाल बाधित आढळून आला आहे.

आमदार अहिरे यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ताबडतोब त्यांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती महापालिका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र त्र्यंबके यांनी देशदूतशी बोलताना दिली.

आज नाशिक जिल्ह्यात 51 रुग्णांचे अहवाल बाधित आढळून आले आहेत. यामध्ये शहरातील सर्वाधिक अहवाल असून यापाठोपाठ नांदगाव, दिंडोरी तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...