Monday, August 17, 2026
Homeब्रेकिंग न्यूजJayant Patil: अर्थमंत्रीपदी वर्णी लागणार का? जयंत पाटलांचं हसत हसत उत्तर, म्हणाले,...

Jayant Patil: अर्थमंत्रीपदी वर्णी लागणार का? जयंत पाटलांचं हसत हसत उत्तर, म्हणाले, मुख्यमंत्र्यांचा…

मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. या चर्चांदरम्यान शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेत आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे ही उपस्थित असल्याची चर्चा आहे. तिन्ही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला दाखल झाल्याने विविध चर्चांना उधाण आले. असे असतानाच जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे.

फडणवीसांसोबत नियोजित भेट होती
जयंत पाटील यांनी सांगितले की, ईश्वरपूर नगराध्यक्षांचे पद अपात्र ठरवल्याप्रकरणी मी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. नगराध्यक्षांव्यतिरिक्त कुठल्याच विषयावर चर्चा झाली नाही. देवेंद्र फडणवीसांसोबत नियोजित भेट होती. अर्थमंत्रीपदाबाबत फडणवीस निर्णय घेतील. पटेल-तटकरे यांच्यासोबत माझी भेट झाली नाही. मी ज्या हॉलमध्ये बसलो होतो तिथे कुणीच नव्हते. मुख्यमंत्र्यांची ५ ते १० मिनिटे भेट घेऊन मी तिथून निघून गेलो. भेटीसंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली होती. त्यांनी वेळ दिल्यानंतर मी भेटायला गेलो.’

- Advertisement -

तर मी नक्कीच सांगितलं असतं
माझी सुनील तटकरे आणि प्रफुल पटले यांची भेट झाली असती, तर मी नक्कीच सांगितलं असतं, असं जयंत पाटील म्हणाले. कुठली चर्चा झाली नाही. विलीनीकरण वगैरे याची चर्चा होण्याचा संबंधच नाही. त्यांच्यासोबत कोणताही विलीनीकरण याची चर्चाच झाली नाही. अजितदादांच्या निधनानंतर अशी कुठली चर्चा नाही, ही चर्चा थांबली, असं जयंत पाटील म्हणाले.

होर्मुझच्या सामुद्रधुनीत कंटेनरवर इराणचा हवाई हल्ला; पुण्यातील अभियंता हेरंब करमरकरचा मृत्यू

सध्या अर्थमंत्रीपदी जयंत पाटील यांची वर्णी लागेल, अशी चर्चा आहे, यावर तुमचे मत काय?, असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारण्यात आला. यावर हसत हसत जयंत पाटील यांनी उत्तर दिले. मी कशाचाच विचार केला नाही. मग तुम्ही पुढचा विचार का करताय?, असा प्रतिसवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला. खातेवाटपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अधिकार असतो. तुम्ही मुख्यमंत्र्यांचा अधिकार देखील घेत आहात. तुम्ही खूपच पुढचं विचारातंय. हा मुख्यमंत्री यांचा अधिकार आहेत. अर्थमंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवत असतात, असे जयंत पाटील म्हणाले.

तसंच, दोन्ही राष्ट्रादीच्या विलिनीकरणाबाबत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ‘अजितदादांच्या निधनानंतर विलीनीकरणाच्या चर्चा झाल्या नाहीत. आम्ही सर्व आमदार आणि खासदार शरद पवार यांच्यासोबत आहोत. माझ्या पक्षात कोणतेही घालमेल नाही. आम्ही सगळे एकत्र आहोत. पक्षाच्या कार्यपद्धतीबाबत मी आक्षेप घेणार नाही. तसेच आम्ही सगळे राष्ट्रवादी शरद पवार यांच्या मागे एकसंध आहोत. वारंवार अशाप्रकारच्या चर्चा समोर का येतात, यामुळे मला दुःख होतं, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : मी मेंदूचा डॉक्टर, पण राजकारणात आलो नी माझाच मेंदू...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नगर दक्षिणचे माजी खासदार, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत राहिले आहेत. राहुरीतील देवळालीत तिरंगा रॅली दरम्यान...