Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSupriya Sule : वाल्मिक कराडवर ईडीची कारवाई का नाही? सुप्रिया सुळेंनी...

Supriya Sule : वाल्मिक कराडवर ईडीची कारवाई का नाही? सुप्रिया सुळेंनी आक्रमक होत केंद्र सरकारला घेरलं

मुंबई | Mumbai

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी वाल्मिक कराडला (Walmik Karad) अटक झाली असून त्याच्यावर खंडणी अंतर्गतही गुन्हा दाखल झाला आहे. अंजली दमानिया, जितेंद्र आव्हाड आणि सुरेश धस यांनी हे प्रकरण उचलून धरल्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणातील आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत एक वेगळाच मुद्दा उचलून धरला आहे. सुळे यांनी वाल्मिक कराडवर ईडीची कारवाई अद्याप का झाली नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.

- Advertisement -

यावेळी बोलतांना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या की, “वाल्मिक कराडवर आधीच खंडणीअंतर्गत गुन्हा दाखल होता. खंडणीविरोधात पीएमएलए कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. मग वाल्मिक कराडप्रकरणी ईडी आणि पीएमएलएची अंमलबजावणी का करण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारला विचारला. तसेच खंडणीप्रकरणी कंपनीने मे महिन्यात नोटीस पाठवली होती. त्यामुळे वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल असतानाही ईडीने कारवाई का केली नाही? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला. यावेळी त्यांनी वाल्मिक कराडविरोधातील सर्व एफआयआरची प्रत देखील माध्यमांना दाखवली.

पुढे त्या म्हणाल्या की, “मागील एक महिना बीड आणि परभणी घटनेबाबत आमचे लोक बोलत आहेत. संसदेत पहिला आवाज या विरोधात खासदार बजरंग सोनवणे यांनी उठवला होता. तर, या विरोधात जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर हेही सातत्याने बोलत आहेत, त्यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, अद्यापही वाल्मिक कराडवर ईडीची कारवाई का झाली नाही, असा प्रश्नही सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे. तसेच मागील ३० दिवस आमचे लोक बोलत आहेत. माणुसकीच्या नात्याने आपण सर्वजण एकच म्हणत आहोत की, पीडित देशमुख कुटुंबाला न्याय मिळायला हवा”, असेही त्यांनी म्हटले.

तसेच “लाडकी बहीण योजना परळी तालुका अध्यक्ष वाल्मिक कराड आहे. ज्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे, त्याला तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष करता? अनिल देशमुख, संजय राऊत आणि नवाब मलिक यांच्यावर ऐकीव गोष्टीच्या आधारावर कारवाई होते तर मग कंपनीची तक्रार असताना वाल्मिक कराडवर गुन्हा असताना त्यांच्यावर कारवाई का नाही”? असा सवाल सुळेंनी ईडीला केला.

.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...