Sunday, June 14, 2026
HomeनगरAhilyanagar : गरजू कुटूंबाला मिळणार प्रत्येकी 3 लिटर रॉकेल

Ahilyanagar : गरजू कुटूंबाला मिळणार प्रत्येकी 3 लिटर रॉकेल

जिल्ह्यासाठी 216 किलोलिटर साठा मंजूर

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजीचा तुटवडा जाणवत असल्याने केंद्र शासनाने अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना एलपीजीला पर्याय म्हणून प्रति कुटुंब तीन लिटर रॉकेल देण्याचा निर्णय घेतला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 216 किलोलिटर (2 लाख 16 हजार लिटर) रॉकेल मंजूर झाले असून लवकर वाटप सुरु होणार आहे.

- Advertisement -

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने बुधवारी जिल्हानिहाय नियतन मंजूर केले आहे. अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांशिवाय उपलब्धतेनुसार इतर शिधापत्रिकाधरकांना देखील केरोसीन मिळणार आहे. शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांना केरोसीन मिळवण्यासाठी ग्रामपंचायत रहिवास दाखला सादर करावा लागणार आहे. तसेच स्थालांतरित मजुरांना केंद्र अथवा राज्य शासनाचे ओळखपत्र दाखवावे लागणार आहे.

शिधापत्रिका किंवा शिधापत्रिकाधारक नसलेले लाभार्थ्यांना रास्त भाव दुकानदार किंवा किरकोळ केरोसीन विक्रेत्यांकडून प्रति कुटुंब 3 लिटर प्रमाणे केरोसीन मिळणार आहे. एखाद्या गावात केरोसीन विक्रेता उपलब्ध नसल्यास शेजारच्या गावातून केरोसीन उपलब्ध करुन दिले जाणार आहे. विक्रेत्यांना केरोसीन साठा व वितरणाच्या दैनंदिन नोंदी ठेवणे बंधनकारक आहे. केरोसीनची वाहतूक परवानाधारक वाहनातून करावी लागणार आहे. सध्यास्थितीमध्ये ग्रामीण भागात केरोसीन वितरण व्यवस्था कार्यान्वित नसल्याने तहसीलदारांना तालुकास्तर वितरण व्यवस्था, केरोसीनची आवश्यकता व मागणी तसेच दुकानदारांचा प्रतिसाद याबाबींचा विचार करुन गावनिहाय केरोसीन वाटपाचे नियोजन करायचे आहे.

45 दिवसांत उचल बंधनकारक
केरोसीन वितरण मार्च-एप्रिल महिन्यात करायचे असल्याने वाटपाच्या दिनांकापासून 45 दिवसांत संपूर्ण उचल करावी लागणार आहे. न उचलेले केरोसीन पुढील महिन्यात मिळणार नाही, असे शासन आदेशात म्हटले आहे.

दराचा निर्णय नंतरच…
केरोसीन वाहतूक दरात तसेच किरकोळ कमिशनमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनस्तरावर विचाराधीन असल्याने केरोसीन दराबाबत स्वतंत्र आदेश येणार आहे.

जिल्हास्तरावर संयुक्त निरीक्षक
केरोसीनचा गैरवापरावर नजर ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर संयुक्त निरीक्षक पथक तयार करण्यात येणार आहे. हे पथक केरोसीनची पेट्रोल-डिझेलमधील भेसळ रोखणार आहे. केरोसीनाची अनाधिकृत विक्री किंवा गैरवापर आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

Udaipur Intercity Express accident : मोठी दुर्घटना! आग लागल्याची अफवा पसरल्याने...

0
उदयपूर । Udaipur भय आणि घबराट माणसाकडून काय करून घेईल याचा नेम नसतो, पण कधीकधी हीच घबराट प्राणांतिक ठरते, याचाच एक अत्यंत दुर्दैवी प्रत्यय मध्य...