Wednesday, August 26, 2026
Homeदेश विदेशतिबेटमधून आला महापुराचा लोंढा! नेपाळमध्ये हाहाकार; घरे, पूल, रस्ते वाहून गेले, अनेक...

तिबेटमधून आला महापुराचा लोंढा! नेपाळमध्ये हाहाकार; घरे, पूल, रस्ते वाहून गेले, अनेक बेपत्ता

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
नेपाळमध्ये बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी सकाळी अचानक आलेल्या भीषण पुरामुळे मोठी हानी झाली आहे. रसुवा जिल्ह्यातील भोटेकोशी नदीला आलेल्या प्रचंड पुराच्या लाटेने अनेक वसाहती, रस्ते, पूल आणि जलविद्युत प्रकल्पांचे मोठे नुकसान केले आहे. पुराचा प्रवाह पुढे त्रिशूली नदीच्या दिशेने गेल्याने नुवाकोट, धादिंग आणि आसपासच्या भागांना सतर्क करण्यात आले आहे.

तिबेटच्या दिशेने पुराचा उगम?
प्राथमिक माहितीनुसार, हा पूर तिबेटच्या बाजूने भोटेकोशी नदीत आला. मात्र, पुरामागचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. नेपाळच्या पूर पूर्वसूचना विभागातील अधिकाऱ्यांनी रसुवा जिल्ह्यात मोठ्या पावसामुळे हा पूर आला नसल्याचे सांगितले आहे. तिबेटच्या बाजूला मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचे उपग्रह निरीक्षणातून दिसून आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. काही अधिकाऱ्यांनी तिबेटमध्ये भूस्खलनामुळे नदीचा प्रवाह अडला असावा आणि त्यानंतर पाण्याचा अचानक विसर्ग झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, याची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.

- Advertisement -

‘ग्लेशियर फुटला’ की नदीला अचानक पूर?
या घटनेला काही वृत्तांमध्ये ग्लेशियल लेक आऊटबर्स्ट फ्लड (GLOF) म्हणजेच हिमनदीशी संबंधित जलसाठा फुटल्यामुळे आलेला पूर, असे म्हटले जात आहे. रसुवाचे काँग्रेस खासदार मोहन आचार्य यांनी हा पूर तिबेटमधील हिमनदीजन्य तलाव फुटल्यामुळे आल्याचे सांगितले असल्याचे Nepal Viewsने वृत्त दिले आहे. मात्र,मोठ्या प्रमाणावर जीवितहानीची भीती

रसुवाचे जिल्हा प्रशासक नरेंद्र परियार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महापुरात अनेक गावे आणि प्रोजेक्ट साईट्सचे अतोनात नुकसान झाले आहे. सध्या झालेल्या जीवित व वित्तहानीचा अचूक आकडा समोर आला नसला, तरीही मोठ्या प्रमाणावर प्राणहानी आणि मालमत्तेचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांनी तातडीने पोलीस, लष्कर आणि आपत्कालीन बचाव पथकांना बाधित भागांत उतरण्याचे निर्देश दिले आहेत.

 ‘मी समर्थन करत नाही…’, मोहन भागवतांच्या कार्यक्रमावर न्युयॉर्कचे महापौर ममदानींची पहिली प्रतिक्रिया

नेपाळच्या प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा आणि सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. त्रिशूली नदी पुढे नारायणी नदीला मिळते आणि भारतात प्रवेश केल्यानंतर याच नदीला गंडक म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे भारतातील गंडक नदीकाठच्या भागातील परिस्थितीवरही लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे.त्यादृष्टीने आता प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

ताज्या बातम्या

Nashik Onion News : “रॅकमध्ये सडका अन् खराब…”; लासलगाव स्थानकात ‘कांदा...

0
लासलगाव | वार्ताहर | Lasalgoan देशांतर्गत बाजारात कांद्याचे दर ६० ते ७० रुपये प्रति किलोवर पोहोचल्याने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) बफर स्टॉकमधून...