नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांच्या न्यूयॉर्कमधील प्रस्तावित कार्यक्रमावरून नवा वाद निर्माण झाला आहे. न्यूयॉर्क शहराचे महापौर झोहरान ममदानी यांनी या कार्यक्रमाला स्पष्टपणे विरोध दर्शवला असून, “मी या रॅलीचे समर्थन करत नाही; मात्र हा खासगी कार्यक्रम रद्द करण्याचा अधिकार शहर प्रशासनाला आहे की नाही, याची मला माहिती नाही,” अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
२९ ऑगस्टला मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये कार्यक्रम
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त संघटनेकडून जागतिक स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मोहन भागवत २९ ऑगस्ट रोजी न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाला सुमारे ५ हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याच कार्यक्रमासंबंधी न्यूयॉर्क शहराचे महापौर झोहरान ममदानी यांनी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
ममदानींचा थेट विरोध
पत्रकार परिषदेत ममदानी यांना भागवत यांच्या कार्यक्रमाबाबत आणि तो रद्द करण्यासाठी शहर प्रशासनाने हस्तक्षेप करावा का, याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी कार्यक्रमाला आपला वैयक्तिक विरोध असल्याचे स्पष्ट केले. मात्र, कार्यक्रम खासगी स्वरूपाचा असल्याने तो रद्द करण्याचा अधिकार न्यूयॉर्क शहर प्रशासनाकडे आहे की नाही, याबाबत त्यांनी अनिश्चितता व्यक्त केली. त्यामुळे ममदानींनी कार्यक्रम रद्द करण्याचा आदेश दिलेला नाही, हेही स्पष्ट आहे.
तो एक धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक होता, जो प्रत्येक भारतीय नागरिकाच्या सहभागावर विश्वास ठेवतो
मी या शहराच्या इतिहासातील पहिली भारतीय-अमेरिकन महापौर म्हणून येथे उभा आहे. माझ्या आईचे संपूर्ण कुटुंब अजूनही भारतात राहते. माझ्या कुटुंबाने मला ज्या भारताबद्दल सांगितले आणि जो भारत मी लहानपणापासून पाहत मोठी झाले, तो एक धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक होता, जो प्रत्येक भारतीय नागरिकाच्या सहभागावर विश्वास ठेवतो, असे न्यूयॉर्क शहराचे पहिले भारतीय-अमेरिकन महापौर जोहरान ममदानी यांनी म्हटले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे हा मुद्दा केवळ न्यूयॉर्कमधील एका कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता RSSची विचारधारा, धार्मिक स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि भारतातील बहुविधतेच्या प्रश्नाशी जोडला जात आहे.
पडसाद : ‘हरित’ कुंभचा ‘सावळा’ गोंधळ!
विविध संघटनांचाही विरोध
मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाला काही अमेरिकन नागरी हक्क, धार्मिक आणि समुदाय संघटनांनीही विरोध केला आहे. Hindus for Human Rights, Indian American Muslim Council आणि Interfaith Center of New York यांसारख्या संघटनांनी कार्यक्रमाबाबत आक्षेप व्यक्त केला आहे. काही संघटनांनी मॅडिसन स्क्वेअर गार्डन प्रशासनाने कार्यक्रम रद्द करावा, अशी मागणीही केली आहे. दरम्यान, भागवत यांच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या काही संघटनांकडून न्यूयॉर्कमध्ये निदर्शनेही करण्यात आली आहेत. त्यामुळे २९ ऑगस्टच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा आणि निषेध आंदोलनांकडेही लक्ष लागले आहे.
अमेरिकेच्या धार्मिक स्वातंत्र्य आयोगाच्या भूमिकेनंतर वाद वाढला
यापूर्वीच अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाने (USCIRF) RSSविरोधात कठोर भूमिका घेतली होती. भागवत यांच्या अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून RSSशी संबंधित व्यक्तींवर निर्बंध घालण्याची मागणी करण्यात आली होती. भारताने यापूर्वी USCIRFच्या भारतासंबंधीच्या मूल्यांकनांवर तीव्र आक्षेप घेतले आहेत. RSSने मात्र संघाला हिंदू समाजाला संघटित करणारी सांस्कृतिक संस्था असल्याचे सांगत त्याच्यावर करण्यात येणारे असहिष्णुतेचे आरोप नाकारले आहेत.




