Monday, July 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजविधान परिषद निवडणुकीची नवी तारीख जाहीर; 'या' तारखेला मतदान होणार

विधान परिषद निवडणुकीची नवी तारीख जाहीर; ‘या’ तारखेला मतदान होणार

मुंबई | Mumbai
देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच विधान परिषद निवडणुकांची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी १० जून ही तारीख जाहीर करण्यात आली होती. मात्र, आता विधानपरिषद निवडणुकांची तारीख बदलण्यात आली आहे. नव्या वेळापत्रकानुसार पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे.

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. आता, या निवडणुकीसाठी नव्याने कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये, २ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर,तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी २६ जूनला मतदान होणार आहे, तर १ जुलै रोजी मतमोजी केली जाणार आहे.

- Advertisement -

म्हणून निवडणुक पुढे ढकलण्यात आली होती
दरम्यान, सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने १० जून रोजी राज्यातील बहुतांश सर्वच शाळा आणि शिक्षकांना सुट्टी आहे. त्यामुळे मतदानावर त्याचा परिणाम पडू शकतो, असा शिक्षक संघटनांचा दावा होता. त्यामुळे, ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून होत होती. निवडणूक आयोगाने शिक्षक संघटनांची ही मागणी मान्य केली आहे.

ताज्या बातम्या

Nashik Sinnar News : जलसंधारण सचिवांकडून सिन्नर तालुक्यातील पुरचाऱ्यांची पाहणी

0
नाशिक | Nashik शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर आणि मुख्य अभियंता हरिभाऊ गिते यांनी २६ जुलै रोजी सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) कुंदेवाडी...