Sunday, September 13, 2026
Homeनाशिकनविन नाशिकमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; वंदना बिरारींचा बाळकृष्ण शिरसाटांना दम, म्हणाल्या, "तु कसा…"

नविन नाशिकमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; वंदना बिरारींचा बाळकृष्ण शिरसाटांना दम, म्हणाल्या, “तु कसा…”

नविन नाशिक | प्रतिनिधी
अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस असतानाच नाशिकमध्ये राजकीय हालचालींपाठोपाठ मोठा राडा पहायला मिळाला. नविन नाशिक विभागातील प्रभाग क्र. ३१ चे भाजपचे उमेदवार बाळकृष्ण शिरसाट आणि उमेदवारी न मिळालेले देवानंद बिरारी यांच्यात नविन नाशिक विभागीय कार्यालयातच हाणामारी झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

माजी नगरसेविका वंदना बिरारी या भाजपतर्फे इच्छुक होत्या, मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्या शुक्रवारी दुपारी १ ते १.३० वाजेच्या सुमारास आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांचे पती देवानंद बिरारी व भाजपचे उमेदवार बाळकृष्ण शिरसाट यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यांच्यातील हा वाद शेवटी हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचला, यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या माध्यम प्रतिनिधिंनी दोघांमध्ये मध्यस्थी केल्याने आणि नंतर पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी केल्याने काही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र वंदना बिरारी यांनी शिव्यांची लाखोली वाहत बाळकृष्ण शिरसाट त्यांचा निषेध करत “तु कसा निवडून येतो, तेच पाहते…”असा सज्जड दमच भरला.

- Advertisement -

यावेळी, माघारीला वेळ कमी राहिल्याने वंदना बिरारी यांनी निवडणूक कक्षात जात अर्ज माघारी घेतला. दरम्यान, पोलिसांनी शिरसाट यांना महापालिका कार्यालयाबाहेर काढले. दरम्यान, या प्रकरणी वंदना बिरारी यांनी बाळकृष्ण शिरसाट यांच्यावर अंबड पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

Nashik Municipal Corporation Election: मोठी बातमी! दिपक बडगुजर पाठोपाठ हर्षा बडगुजरांची माघार; नविन नाशिक विभगात मोठा ट्विस्ट

ताज्या बातम्या

Nashik Fraud News : सात काेटींचे मनी लाँड्रिंग अन् ड्रग्ज तस्करी;...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik सायबर चाेरट्यांनी (Cyber Theives) आता डिजिटल अरेस्ट आणि गंभीर गुन्ह्यांची भीती दाखवून नागरिकांची (Citizen) आयुष्यभराची पुंजी लुटण्याचा भयंकर मार्ग शोधला...