Friday, November 13, 2026
Homeब्रेकिंग न्यूजOnion : लासलगाव बाजार समितीत नवीन लाल कांद्याला हंगामातील उच्चांकी भाव

Onion : लासलगाव बाजार समितीत नवीन लाल कांद्याला हंगामातील उच्चांकी भाव

दिवाळीच्या सुट्टीनंतर कांदा लिलाव सुरू

- Advertisement -

लासलगाव | वार्ताहर Lasalgaon

दिवाळी आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे तब्बल आठ दिवस बंद असलेले लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे लिलाव आज पासून पुन्हा पूर्ववत सुरू झाले . लिलावाच्या पहिल्याच दिवशी लाल कांद्याला ५ हजार ४२१ रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला.

दिपावली सण निमित्ताने दि.५ ते १२ सुट्टीनंतर लासलगाव बाजार समितीत आज १६९ वाहनांतून २११८क्विंटल कांद्याची आवक झाली. यामध्ये अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक जिल्ह्यातून नवीन लाल कांद्याची ८० वाहनांतून आवक झाली. विशेष म्हणजे नवीन लाल कांद्याला प्रतिक्विंटल कमाल ५ हजार ४२१ रुपये दर मिळाला. लाल कांद्याच्या चालू हंगामातील उच्चांकी दर ठरला आहे. नवीन लाल कांद्याला किमान २ हजार ५०० रुपये, तर सरासरी ४ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.तर जुन्या उन्हाळी कांद्यालाही बाजारात कमाल ४ हजार ३११ रुपये, किमान १ हजार ५०० रुपये, सरासरी ३ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

आठवडा भर सुट्टी नंतर कांद्याची बाजारपेठ सुरू झाल्या नंतर पहिल्याच दिवशी चांगले दर मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांनी कांदा बाजारात विक्रीसाठी आणताना योग्य प्रकारे प्रतवारी करून आणावा. त्यामुळे कांद्याच्या गुणवत्तेनुसार चांगला दर मिळण्यास मदत होईल, असे आवाहन लासलगाव बाजार समितीचे व्यापारी संचालक प्रवीण कदम यांनी केले आहे.

आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर सुरू झालेल्या कांदा लिलावात पहिल्याच दिवशी नवीन लाल कांद्याला ५ हजार ४२१ रुपयांचा चांगला दर मिळाला. नाशिक जिल्ह्यासह शेजारील छत्रपती संभाजी नगर, अहिल्यानगर या जिल्ह्यातूनही आज लासलगाव येथे कांदा विक्रीसाठी आला आहे कांद्याची योग्य प्रकारे प्रतवारी करून आणल्यास शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यास मदत होईल
डी. के. जगताप,
सभापती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती

ताज्या बातम्या

टेम्पो

भीषण अपघात! टेम्पो ट्रॅव्हलरला समोरुन येणाऱ्या कंटेनरची जोरदार धडक; २३ जणांचा...

0
नवी दिल्ली | New Delhiआसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाजवळ शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) काळजाचा थरकाप उडवणारा रस्ते अपघात घडला. प्रवाशांनी भरलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरची समोरून येणाऱ्या कंटेनर...