Sunday, July 5, 2026
HomeUncategorizedनगर - जिल्ह्यात आणखी सहा करोनाबाधित

नगर – जिल्ह्यात आणखी सहा करोनाबाधित

अहमदनगर ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यात आज ०६ नवे रुग्ण वाढले आहे. जिल्ह्यात करोना बधीतांची संख्या २८२ झाली आहे.

यात संगमनेर तालुक्यातील ०३ तर पारनेर तालुक्यातील दोन आणि नगर शहरातील एकाचा समावेश आहे. संगमनेर शहरातील नाईकवाडपुरा या प्रतिबंधित क्षेत्रात आज ५९ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच घुलेवाडी येथील ४८ वर्षीय पुरुष आणि जोर्वे येथील ४५ वर्षीय पुरुषालाही करोनाची बाधा झाली आहे. आजाराची लक्षणे जाणवू लागल्याने उपचारासाठी झाले होते दाखल.पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील एकाच कुटुंबातील दोन मुलींना कोरोनाची लागण झाली. यापूर्वीच्या बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कामुळे लागण झाली आहे. तर मूळचा झारखंड येथील असलेला आणि नगर शहरातील सारसनगर येथे राहणाऱ्या ५८ वर्षीय व्यक्तिलाही कोरोनाची लागण. कर्करोगावरील उपचारासाठी मुंबई येथे प्रवास करून आला होता.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नगरमध्ये पहिल्यांदाच गुन्हेगारांची ओळख परेड

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात प्रथमच गंभीर गुन्ह्यांतील सराईत आरोपींची ओळख परेड आयोजित...