Monday, August 17, 2026
Homeनगरनवी कर प्रणाली अर्थव्यवस्थेला बळकट करेल - ना. विखे पाटील

नवी कर प्रणाली अर्थव्यवस्थेला बळकट करेल – ना. विखे पाटील

राहाता |प्रतिनिधी| Rahata

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने (Central Government) वस्तू व सेवा कर कमी करून सुरू केलेल्या नव्या बचत पर्वाचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Water Resources Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी स्वागत केले असून, नवी कर प्रणाली (New Tax System) जाहीर करून नागरीकांना दिलेली भेट देशाच्या अर्थव्यवस्थेला आत्मनिर्भरतेने अधिक बळकट करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून वस्तू व सेवा कर (Goods and Services Tax) कमी करण्याचा निर्णय जाहीर केला होता. नवरात्र उत्सवाच्या पावन पर्वावर याची अंमलबजावणी करण्याच्या झालेल्या निर्णयाचे स्वागत करून मंत्री विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शहा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांचे आभार मानले आहेत.

केंद्र सरकारच्या धोरणामुळे आर्थिक दृष्ट्या देश सक्षम होत आहे. यापूर्वी एक राष्ट्र एक कर याची सुरूवात केंद्र सरकारने केली होती. आता विकसित भारताच्या सर्व निर्णय प्रक्रियेत देशातील सामान्य माणसाचे प्रतिबिंब असावे या उद्देशाने वस्तू व सेवा कर प्रणालीतील बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सुरू झालेली कार्यवाही देशातील सामान्य माणसाला दिलासा देणारी ठरेल.

नव्या कर प्रणालीचा देशातील नागरीक, शेतकरी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक, महिला आणि युवक यांना मोठा आधार मिळेल. कर प्रणालीतील व्यापक सुधारणेमुळे नागरीकांचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होईलच, परंतु यापेक्षा महत्वाचे म्हणजे लघु उद्योजक आणि छोटे व्यापारी वर्गासाठी व्यवसाय प्रक्रिया अधिक सुलभ होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचे उद्दिष्ट पूर्ण करताना देशाची अर्थव्यवस्था सुध्दा आत्मनिर्भरतेने पुढे जाण्यास केंद्र सरकारचा निर्णय ऐतिहासिक ठरणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Accident News : दूध टँकर व दुचाकीचा अपघात; एक ठार

0
अकोले |प्रतिनिधी| Akole तालुक्यातील लिंगदेव येथील ठाकरवाडी परिसरात दुचाकी (Bike) आणि दूध टँकरमध्ये (Milk Tanker) जोरदार धडक होऊन भीषण अपघात (Accident) होवून दुचाकीस्वार जागीच ठार...