अकोले |प्रतिनिधी| Akole
निळवंडे धरणातून रब्बीच्या दुसर्या हंगामासाठी बुधवारी (दि.12) सायंकाळी 7 वाजता 1700 क्युसेकने पाणी सोडण्यात आले असून वीस ते बावीस दिवस हे आवर्तन चालणार आहे. सध्या भंडारदरा धरणात 10 हजार 572 दशलक्ष घनफूट तर निळवंडे धरणामध्ये 4 हजार 675 दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे.
- Advertisement -
भंडारदरा व निळवंडे या दोन्ही धरणांमध्ये एकूण 15 हजार 247 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा आहे. यावर्षी भंडारदरा धरण पाणलोटक्षेत्रात मुबलक प्रमाणात पाऊस पडल्याने रब्बीसाठी पाण्याची मागणी तुलनेने कमी आहे. परंतु, निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आलेले आहे.