Monday, September 7, 2026
HomeनगरAccident News : 5 वर्षांच्या बालिकेचा ट्रकच्या धडकेत मृत्यू

Accident News : 5 वर्षांच्या बालिकेचा ट्रकच्या धडकेत मृत्यू

एमआयडीसीत भीषण अपघात || चालकाविरूध्द गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

एमआयडीसी परिसरात (MIDC) निंबळक-विळद बायपासवरील (Nimblak Vilad Bypass) भारत पेट्रोलपंपासमोर शनिवारी (6 सप्टेंबर) सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात (Accident) पाच वर्षांच्या बालिकेचा जागीच मृत्यू (Death) झाला. सोनाली नागनाथ बांदल (वय 5, रा. मोरया पार्क, एमआयडीसी, अहिल्यानगर) असे मयत बालिकेचे नाव आहे.

- Advertisement -

घटनेविषयी मिळालेली माहिती अशी की, नागनाथ राजाराम बांदल (रा. मोरया पार्क, एमआयडीसी, अहिल्यानगर) आपल्या पत्नी व मुलीसह दुचाकीवरून विळद बायपासमार्गे जात होते. ते पेट्रोलपंपाजवळ आल्यावर त्यांनी पत्नी व मुलगी सोनालीला रस्त्याच्या कडेला थांबवून दुचाकी बाजूला लावली. याचदरम्यान तेथेच उभा असलेला ट्रक चालक सतीषकुमार गुलाबसिंग रेपारी (वय 23, रा. भिलडाना, जि. फतेहाबाद) याने निष्काळजीपणे, मागे कोण उभे आहे की नाही याची खात्री न करता ट्रक अचानक जोरात रिव्हर्स घेतला. या वेळी ट्रकच्या (Truck) मागे उभी असलेली सोनाली ट्रकच्या टायरखाली दबली.

गंभीर जखमी (Injured) झालेल्या सोनालीला तातडीने उपचारासाठी खासगी रूग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे (MIDC Police Station) सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, उपनिक्षक विनोद परदेशी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळ पंचनामा करून ट्रक चालक सतीष रेपारीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक परदेशी अधिक तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : एसटी बसमध्ये धाडसी चोरी; गर्दीचा फायदा घेणाऱ्या...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik लासलगाव ते निमाणी मार्गावर (Lasalgaon and Nimani Highway) धावणाऱ्या एसटी बसमध्ये प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील...