मुंबई | Mumbai
मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसंदर्भात शालेय शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहिले आहे. येत्या काही दिवसांमध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा आहे. परीक्षा केंद्रांमध्ये बुरखा घालून प्रवेश देऊ नये, अशी मागणी करणारे पत्र मंत्री नितेश राणे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांना दिले आहे. परिक्षेला बसताना बुरखा घालू नये तसेच वर्गात प्रवेश करायच्या आधी बुरखा नाकारण्यात यावा अशी मागणी राणे यांनी केली आहे. हिंदू मुलांसाठी वेगळे नियम आणि इतर धर्मियांना वेगळे नियम नको, त्यासोबतच अशा प्रकारामुळे कॉपीचे प्रमाण वाढू शकते, अशी भीती देखील नितेश राणे यांनी व्यक्त केली आहे.
इयत्ता १० व १२ वी परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या परीक्षा आहे. यावर विद्यार्थ्यांचे संपूर्ण भविष्य अवलंबून आहे. सदर परीक्षा पारदर्शकपणे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार जसे कॉपी मुक्त परीक्षा होणे अपेक्षित आहे. याकरीता शासनस्तरावरुन वेळोवेळी सुचना दिल्या जातात. याप्रकरणी मस्त्य विकास मंत्री नितेश राणे यांनी राज्य शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. परीक्षा पारदर्शकपणे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार जसे कॉपी मुक्त परीक्षा होणे अपेक्षित आहे. याकरीता शासनस्तरावरुन वेळोवेळी सुचना दिल्या जातात. जर परीक्षार्थीना बुरखा घालून परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात आला तर, एखादी परीक्षार्थी बुरखा घालून ईलेक्ट्रॉनीक उपकराणाचा उपयोग करुन परीक्षा देत आहे किंवा नाही, हे तपासणे शक्य होत नाही.
काय म्हणाले नितेश राणे?
दहावी, बारावी परीक्षेत बुरखा घातलेल्या विद्यार्थीनींना परीक्षा केंद्रात प्रवेश देऊ नये असे नितेश राणे म्हणाले. माध्यमिक शाळेत उच्च माध्यमिक शाळेत परिक्षेसाठी बुरखा घालून बसण्याची मान्यता देण्याचे प्रमाणपत्र दिल्याचे परिपत्रक आहे. असे लांगुलचालन चालणार नाही अशी भूमिका मी शिक्षण मंत्र्यांकडे मांडल्याचे नितेश राणे म्हणाले. बुरखा घालून परीक्षेला बसल्याचे इतरही धोके आहेत. याचे धोके लक्षात घेऊन हा निर्णय रद्द करावा अशी मागणी शिक्षणमंत्र्यांकडे केल्याचे ते म्हणाले.
लांगुलचालन आम्हाला मान्य नाही. हा निर्णय २००४ सालचा आहे. हे निर्णय रद्द करण्यासाठी मागणी केली. परिक्षेसोबतच मतदानाच्या वेळीही असे प्रकार उघडकीस आलेले आहेत. नेमकी तीच विद्यार्थीनी परीक्षेला आहे का? हे देखील पाहावे लागेल. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे या मुलांनीही आपला धर्म शाळेत आणू नये, असे राणे यावेळी म्हणाले. नितेश राणेंच्या या निर्णयावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्याला राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे. विशिष्ठ धर्माचे लांगुलचालन होऊ नये ही सरकारची भूमिका आहे. सरकारचा भाग म्हणून मी बोलतोय. असे परिपत्रक काढले असेल तर ते तात्काळ रद्द करा, असे ते यावेळी म्हणाले.
जर, परीक्षार्थीना बुरखा घालून परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात आला तर, एखादी परीक्षार्थी बुरखा घालून ईलेक्ट्रॉनीक उपकराणाचा उपयोग करुन परीक्षा देत आहे किंवा नाही, हे तपासणे शक्य होत नाही. आकस्मिक प्रसंगी काही आक्षेप उदभवल्यास सामाजिक तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनेक विद्यार्थ्यांना नुकसान सहन करावे लागेल, असे नितेश राणे यांनी आपल्या पत्रात म्हटलेय.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा