Tuesday, June 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNitin Gadkari: "काही कंत्राटदार आणि टोलवाल्यांना तुरुंगात टाकणार"; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा...

Nitin Gadkari: “काही कंत्राटदार आणि टोलवाल्यांना तुरुंगात टाकणार”; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा सज्जड इशारा

नागपूर | Nagpur
“मी आता काही कंत्राटदार आणि टोलवाल्यांना तुरुंगात टाकणार आहे. त्यांचे फोटो काढणार आहे,” अशा कडक शब्दांत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कंत्राटदारांना इशारा दिला आहे. पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण विकासकामांची गरज अधोरेखित करताना त्यांनी कार्यपद्धतीतील ढिसाळपणावर स्पष्ट नाराजी व्यक्त केली.

नागपूरमधील ‘सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट’च्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, “पूर्वी कंत्राट मिळवण्यासाठी तांत्रिक व आर्थिक पात्रतेपेक्षा कोण काळा कोट घालून येतो, हे महत्त्वाचे असायचे. एवढेच ठरवायचे बाकी होते की त्यालाच कंत्राट द्यायचे, अशी पद्धत होती.

- Advertisement -

कार्यक्रमात मंत्री गडकरी म्हणाले, “जे कंत्राटदार योग्य आणि गुणवत्तापूर्ण काम करत नाहीत, त्यांच्यावर कारवाई होणार आहे. मी आता काही कंत्राटदार आणि टोलवाल्यांना तुरुंगात टाकणार आहे. त्यांना तुरुंगात टाकून फोटो काढणार आहे”, अशा शब्दांत गडकरींनी कामचुकार कंत्राटदारांना धाऱ्यावर धरले. गडकरी यांनी अशा प्रकारच्या कामकाजावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, जे कंत्राटदार दर्जेदार काम करत नाहीत, अपारदर्शक पद्धती वापरतात किंवा टोल वसुलीत गैरप्रकार करतात, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

या कार्यक्रमात बोलताना गडकरींनी एक महत्त्वाची घोषणाही केली. ब्रम्हपुत्रा नदीखाली १२,००० कोटी रुपये खर्चून एक टनेल बांधण्यात येणार असून, हा खर्च कमी करण्यासाठी गेले वर्षभर त्यांनी तांत्रिक आणि आर्थिक अभ्यास केला असल्याचं गडकरींनी माहिती दिली. पारदर्शकता,भ्रष्ट्राचारमुक्त व्यवस्था,जलदगती निर्णय घेण्याची क्षमता, आणि गुणवत्तापूर्ण काम आवश्यक असल्याचेही यावेळी गडकरी म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : जिल्ह्यात नऊ ठिकाणी केंद्रे; ६१९...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik विधानपरिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीच्या (Nashik Vidhan Parishad Election) एका जागेसाठी गुरुवारी (दि. १८) मतदान (Voting) होणार आहे. या...