Friday, May 15, 2026
Homeब्रेकिंग न्यूजरासेगावच्या उपसरपंचावर अविश्वास ठराव मंजूर

रासेगावच्या उपसरपंचावर अविश्वास ठराव मंजूर

दिंडोरी | प्रतिनिधी Dindori

- Advertisement -

अविश्वास ठरावाच्या विरुद्ध मतदान करण्यासाठी लाच मागितल्या प्रकरणी गाजलेल्या दिंडोरी तालुक्यातील रासेगाव व देहरवाडी या ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंचांवरील अविश्वास ठराव मंजूर झाला आहे.

म्हसरूळ येथे दोन दिवसांपूर्वीच सरपंच पतींना लाच घेताना लाचलुचपात प्रतिबंधक विभागाने अटक केली होती रंगीहात पकडले होते.अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान करण्यासाठी दोन दिवसापूर्वी सरपंच यांनी लाच मागितल्याचे प्रकारनंतर सरपंच यांचेवर नाशिकच्या लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाई नंतर आज गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी रासेगाव ग्रामपंचायत मध्ये झालेल्या अविश्वास प्रस्तावावर उपसरपंच यांच्यावर एकतर्फी अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला.

या विशेष सभेसाठी तहसीलदार मुकेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत चर्चा करण्यासाठी उपसरपंच सुधाकर वारुळे यांच्य विरुद्ध अविश्वास प्रस्ताव बहुमताने स्वीकारला गेला असून उपसरपंच पदावरून सुधाकर वारुळे यांना पद उतार व्हावं लागले आहे.उपसरपंच वारुळे यांचे विरोधात सरपंच व नऊ सदस्य यांनी 23 फेब्रुवारी ला अविश्वास प्रस्ताव सादर केला होता.

अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात मतदान करण्यासाठी सदस्यांचे वतीने सरपंच यांनी लाच मागितली अशी तक्रार उपसरपंच सुधाकर वारुळे यांनी मंगळवारी लाचलुचपत विभागाकडे केली होती .याबाबत विभागाने सरपंच मंदा बेंडकुळे व त्यांचे पती विठ्ठल बेंडकुळे यांना लाच घेताना रंगेहाथ पकडून कारवाई केली होती. गुरुवारी तहसीलदार मुकेश कांबळे यांचे अध्यक्षतेखाली रासेगाव ग्रामपंचायत कार्यालयात अविश्वास ठरावबाबत विशेष सभा संपन्न झाली यावेळी सदस्य संतोष साळवे यांनी सदस्यांतर्फे बाजू मांडली की उपसरपंच हे वारंवार कामकाजात दुर्लक्ष व गैरहजर असतात तसेच विकास कामांमध्ये अडथळे निर्माण करतात सदस्यांसोबत असहकार्याची भूमिका घेतात व चुकीचे राजकारण करतात, तर उपसरपंच वारुळे यांनी खुलासा केला.

यांनतर तहसीलदार यांनी नियमाप्रमाणे मतदान प्रक्रिया राबवली यावेळी नऊ सदस्य अविश्वास ठरावाच्या बाजूने हात उंचावून ठरावचे समर्थन असल्याने, ठराव बहुमताने मंजूर करण्यात आल्याचे घोषित केले . सरपंच यांचेवर लाचलुचपत विभागाने कारवाई केल्याने त्या उपस्थित नव्हत्या. परंतु उपसरपंच सुधाकर वारुळे यांच्यावर बहुमताने अविश्वास ठराव मंजूर झाल्याने दिंडोरी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. की सरपंच यांच्यावर एसीबी कडून झालेली कारवाई खरी आहे की खोटी हे दिंडोरी तालुक्यातील जनतेला प्रश्न पडला आहे.

यावेळी उपसरपंच सुधाकर वारुळे ग्रामपंचायत सदस्य संतोष साळवे, शंकर मोरे, शोभा अपसुंदे, सुनंदा शिंगाडे ,शोभा गवे, शकुंतला मोरे ,अंबादास जाधव ,रंजना जाधव, आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते तसेच ग्रामसेवक युवराज ठाकरे हे देखील उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ST Mahamandal News : लालपरीचा प्रवास महागणार? डिझेल दरवाढीचा फटका; मंत्री...

0
मुंबई । Mumbai सर्वसामान्यांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या 'लालपरी'वर आता महागाईचे सावट पसरले आहे. आधी दुधाचे दर वाढले, मग सीएनजी महागला आणि आता पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी उच्चांक...