Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजPM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले, “गेल्या १० वर्षांतील हे पहिलेच अधिवेशन, ज्यात…”

PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले, “गेल्या १० वर्षांतील हे पहिलेच अधिवेशन, ज्यात…”

दिल्ली । Delhi

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या सत्राआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसद भवनाच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नवाचार, समावेशकता आणि गुंतवणूक देशाच्या आर्थिक घडामोडींचा आधार आहे.

- Advertisement -

या अधिवेशन काळात अनेक ऐतिहासिक विधेयकांवर चर्चा होईल आणि व्यापक विचार विनिमयासह देशाची ताकद वाढविणाऱ्या कायद्यांत या विधेयकांचे रुपांतर होईल. यानंतर पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. गेल्या १० वर्षांतील हे पहिलेच अधिवेशन आहे, ज्याच्याआधी कोणतेही विदेशी डावपेच आखले गेले नाहीत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, गेल्या १० वर्षांत प्रथमच संसदेच्या अधिवेशनापूर्वी कोणीही विदेशातून आग लावण्याचा प्रयत्न केला नाही. २०२४ पासून हे बहुधा पहिलंचं संसदेचे अधिवेशन असेल, ज्यात आमच्या कारभारात कोणीही परकीय हस्तक्षेप केलेला नाही. एवढंच नव्हे तर या परकीय कारवायांना हातभार लावण्यास आपल्या देशातील अनेकजण कोणतीही कसर सोडत नाहीत, असंही मोदी म्हणाले.

भारताने ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. हे प्रत्येक देशवासियांसाठी सर्वाधिक गौरवपूर्ण आहे आणि जगातील लोकशाहीच्या देशांमध्ये भारताचे हे सामर्थ्य आपलं एक विशेष स्थान निर्माण करतो. देशातील जनतेने आम्हाला तिसऱ्यांदा हे दायित्व दिलं आहे. या तिसऱ्या कार्यकाळातील हे पहिलं पूर्ण बजेट आहे. मी विश्वासाने सांगू शकतो की २०४७ मध्ये आपण स्वातंत्र्याची १०० पूर्ण करू, विकसित भारताचा संकल्प या देशाने स्वीकारला आहे. हा अर्थसंकल्प एक नवा विश्वास निर्माण करेल. नवीन ऊर्जा देईल की देश १०० वर्षे साजरे करेल तेव्हा विकसित झालेला असेल. १४० कोटी देशवासिय आपल्या सामूहिक प्रयत्नांनी या संकल्पाला पूर्ण करतील,असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

तिसऱ्या टर्ममध्ये आम्ही मिशन मोडमध्ये देशाला सर्वांगिण विकासाच्या दिशेने घेऊन जात आहोत. यामध्ये भौगोलिक, सामाजिक किंवा आर्थिक भिन्न स्तरावरील सर्वांगिण विकासाच्या संकल्पावरून मिशन मोडमधून पुढे जात आहोत. इनोव्हेशन, इन्क्लुजन, इन्व्हेस्टमेंट या सातत्याने आमच्या आर्थिक गतीसाठी आधार राहिले आहेत. या सत्रात नेहमीप्रमाणे काही ऐतिहासिक विधेयकावर चर्चा होईल. व्यापक मंथनासोबत राष्ट्राची ताकद वाढवणारे कायदे बनतील. नारी शक्तीच्या गौरवाला पुनर्प्रस्थापित करणारे, प्रत्येक महिलेला समान अधिकार देणारे निर्णय या अधिवेशनात घेतले जातील, असं मोदी म्हणाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...