Wednesday, June 17, 2026
Homeदेश विदेशNobel Prize in Physiology : वैद्यकशास्रातील योगदानाबद्दल व्हिक्टर ॲम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांना...

Nobel Prize in Physiology : वैद्यकशास्रातील योगदानाबद्दल व्हिक्टर ॲम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांना यंदाचा नोबल पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
जगातील सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यास सुरूवात झाली आहे. विविध क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी आणि संशोधन करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. २०२४ सालातील वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार व्हिक्टर ॲब्रोस आणि गॅरी रुवकुन या दोघांना मायक्रोआरएनएच्या शोधासाठी जाहीर झाला आहे. शरीरातील अवयवांचा विकास आणि त्याचे कार्य यासाठी हा शोध महत्त्वाचा आहे असे नोबेल कमिटीने म्हटले आहे.

व्हिक्टर ॲब्रोस आणि गॅरी रुवकुन यांनी मायक्रोआरएनएचा शोध लावला आणि ट्रांसक्रिप्शननंतर जीन एक्स्प्रेशनला रेगुलेट करण्यात महत्त्वाचे योगदान दिले. या दोघांच्या शोधामुळे सजीवांचा विकास आणि कार्य करण्याच्या पद्धतीबद्दल महत्त्वाचे संशोधन झाले आहे.

- Advertisement -

गेल्या वेळी वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक कॅटलिन कॅरिको आणि ड्र्यू वेसमन यांना मिळाले होते. नोबेल पारितोषिक देणाऱ्या समितीने सांगितले होते की, त्यांनी दिलेल्या mRNA तंत्रज्ञानाने बनवलेल्या कोरोना लसीमुळे जग कोरोना महामारीतून बाहेर येऊ शकते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

संपादकीय : शांततेचे ढग, की ट्रम्प यांची खेळी?

0
पश्चिम आशियाला युद्धाच्या भयंकर ज्वाळांमध्ये होरपळून टाकणारा अमेरिका-इराण संघर्ष तब्बल १०७ दिवसांच्या रक्तरंजित थरारानंतर अखेर थांबला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ८०व्या...