Friday, June 20, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNorway Chess 2025: डी गुकेशकडून पराभव होताच मॅग्नस कार्लसना संताप अनावर; टेबलवर...

Norway Chess 2025: डी गुकेशकडून पराभव होताच मॅग्नस कार्लसना संताप अनावर; टेबलवर हात मारत राग केला व्यक्त

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारताचा युवा बुद्धिबळपटू आणि सध्याचा विश्वविजेता डोम्माराजू गुकेश याने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या सहाव्या फेरीत विजय नोंदवला आहे. आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच, गुकेशने शास्त्रीय वेळेच्या नियंत्रणाखाली माजी विश्वविजेता मॅग्नस कार्लसनचा पराभव केला. गुकेशच्या या विजयानं संपूर्ण बुद्धिबळविश्वात खळबळ माजवली असून त्याने आपली क्षमता पुन्हा सिद्ध केली आहे. डी गुकेशचे डावपेच ओळखण्यात अपयशी ठरल्यानंतर कार्लसनला राग अनावर झाला आणि चेकमेट होताच त्याच्या अनपेक्षित प्रतिक्रियेने एकच आश्चर्य व्यक्त केले. त्याच्या या कृतीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होतोय.

बुद्धिबळाच्या इतिहासात कोरल्या जाणाऱ्या नाट्यमय लढतीत डी गुकेशने नॉर्वे बुद्धिबळ २०२५ च्या सहाव्या फेरीत कार्लसनवर जबरदस्त मात केली. या सामन्यात गुकेशकडून पराभव होताच मॅग्नस कार्लसनची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. त्याने बोर्डावर जोरात मुठ आदळत आपली निराशा जाहीर केली. तर दुसरीकडे विजयानंतरही गुकेश शांत होता.

- Advertisement -

डी गुकेशचा बुद्धिबळाच्या पटावरचा कार्लसनविरुद्ध हा पहिलाच ऐतिहासिक विजय मिळवला. सामन्यामध्ये सुरुवातीपासूनच कार्लसनने गुकेशवर वर्चस्व गाजवलेले होते. तरीही, गुकेशने संधीची वाट पाहत आपले स्थान टिकवून ठेवले. जेव्हा कार्लसनने वेळेच्या दबावाखाली एक दुर्मिळ पण महागडी चूक केली, एक असामान्य चूक जी गुकेशने अचूक टिपली आणि विजायवर नाव कोरले. क्षणाचाही विलंब न लावता गुकेशने आपली खेळी केली आणि विजय मिळवला.

पण, सामना संपल्यानंतर कार्लसन अत्यंत नाराज दिसला. पराभवाची झळ त्याला चांगलीच लागली आणि रागाच्या भरात त्याने टेबलवर बुक्का मारला, आपला पराभव स्वीकारत तो तिथून रागारागाने उठून गेला. कॅमेऱ्यात हे दृश्य कैद झाले आणि पाहता पाहता ते सोशल मीडियावर व्हायरल झाले. कार्लसनची ही प्रतिक्रिया पाहून खुद्द गुकेशही काही क्षण स्तब्ध झाला होता. गुकेशसाठी हा विजय केवळ गुणांची बाब नव्हती, तर एक मोठा टप्पा होता. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी कार्लसनसारख्या दिग्गजाला हरवून त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो फक्त भारतासाठीच नव्हे, तर जागतिक बुद्धिबळासाठीही मोठे नाव ठरू शकतो.

सामन्यानंतर, कार्लसनने गुकेशशी हस्तांदोलन केले, पण त्याच्या चेहऱ्यावरची नाराजी आणि हताशा स्पष्ट दिसत होती. गुकेशने मात्र या विजयाचा आनंद शांतपणे साजरा केला. लॉबीमध्ये आपल्या प्रशिक्षक ग्रझेगॉझ गाजेव्स्की यांच्याशी भेटल्यावर त्याने आनंदाने जोरदार ‘फिस्ट बंप’ दिली, ज्याला गाजेव्स्कींनी ‘आजवरची सर्वात जोरदार फिस्ट बंप’ असे म्हटले. हा विजय गुकेशच्या कारकिर्दीतील एक मैलाचा दगड ठरला असून, त्याने पुन्हा एकदा जागतिक बुद्धिबळपटूंमध्ये आपले स्थान सिद्ध केले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरात जोरदार पाऊस; वाकी, पिंपळगाव खांड ओव्हरफ्लो

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara भंडारदरा धरण परिसरात गत तीन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटींग सुरू असल्याने धरणात नव्याने पाण्याची आवक सुरू आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरात काल...