Saturday, August 22, 2026
HomeनगरAhilyanagar : नायलॉन मांजा विकताना एकास पकडले

Ahilyanagar : नायलॉन मांजा विकताना एकास पकडले

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

बंदी घातलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणार्‍या एका व्यक्तीला कोतवाली पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. अंबिका शाळेजवळ, भाजी मार्केट, केडगाव येथे मंगळवारी (2 डिसेंबर) ही कारवाई करण्यात आली आहे. संतोष धोंडीराम गुंड (वय 50, रा. अंबिका शाळेजवळ, भाजी मार्केट, केडगाव) असे त्याचे नाव असून त्याच्या ताब्यातून 40 हजार रूपये किमतीचा मांजा जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, केडगाव येथील अंबिका शाळेजवळ एका पिवळ्या रंगाच्या गोणीमध्ये बंदी असलेला नायलॉन मांजा विक्रीसाठी ठेवलेला आहे. या माहितीच्या आधारावर, गायकवाड यांनी तातडीने गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना कारवाईचे निर्देश दिले. या पथकाने दोन पंचांना सोबत घेऊन सायंकाळी अंबिका शाळेजवळ, भाजी मार्केट येथे छापा टाकला. त्यावेळी संतोष धोंडीराम गुंड नावाचा व्यक्ती पिवळ्या गोणीतून नायलॉन मांजाची विक्री करत असल्याचे पोलिसांना दिसले. खात्री झाल्यावर पोलिसांनी छापा टाकून त्याला जागीच पकडले.

त्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, त्याच्या ताब्यात मोनोकाईट फायटर नावाचे प्रत्येकी एक हजार रूपये किमतीचे 40 नायलॉन मांजाचे बंडल, असा एकूण 40 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. संतोष गुंड याने मांजाची विक्री केल्याचे उघड झाल्याने त्याच्याविरूध्द भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223, 125 सह, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 5, 15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

लिपिक आणि लघुलेखक पदाची फेरपरीक्षा घ्या – जयंत पाटील यांचे उच्च...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत लिपिक आणि लघुलेखक पदांच्या भरती प्रक्रियेदरम्यान १६ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या टायपिंग टेस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडचणी...