Sunday, October 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजलक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; 'ओबीसी जनता पार्टी' नवा राजकीय पक्ष स्थापन करणार

लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; ‘ओबीसी जनता पार्टी’ नवा राजकीय पक्ष स्थापन करणार

मुंबई |

- Advertisement -

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मोठी घोषणा केली आहे. हाके नवीन राजकीय पक्ष काढणार आहेत. ओबीसी जनता पार्टी असं त्यांच्या पक्षाचं नाव असणार आहे, याबाबतची माहिती लक्ष्मण हाके यांनी दिली आहे. ओबीसींचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आगामी काळात या पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

हाके यांनी पक्ष स्थापनेची घोषणा करताना सांगितले की, ओबीसी समाजाच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने स्वतंत्र राजकीय पर्याय उभा करण्याची गरज निर्माण झाली आहे. ओबीसी आरक्षण, जातनिहाय जनगणना, शिक्षण, रोजगार, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधित्व आणि सामाजिक न्याय हे पक्षाच्या अजेंड्यावरील प्रमुख मुद्दे असतील.

भाजपचा डीएनए हा ओबीसी राहिला नाही, आता कारखानदारांचा झाला आहे, अशी टीका देखील हाके यांनी केली. पांडुरंगाकडे एकच मागणे आहे महापुजेला येणार्‍या मुख्यमंत्र्यांना एकच सद्बुद्धी मिळावी, फोडोफोडी बंद करावी. आता सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नावर काम करायला सुरुवात करा, सत्ता येऊन बरेच दिवस झाले आहेत असेही हाके म्हणाले.

ताज्या बातम्या

कोलकाता शहरात दुर्गापूजेदरम्यान चेंगराचेंगरी; १७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

0
कोलकाता पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात दुर्गापूजेच्या उत्सवादरम्यान शनिवारी (१७ ऑक्टोबर) मोठी दुर्घटना घडली. उत्तर कोलकात्यातील चोरबागान सार्वजनिक दुर्गापूजा मंडपात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान १७ जणांचा...