Wednesday, July 24, 2024
Homeक्राईमHit&Run Case: ई- रिक्षाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात स्कूलबसने वृध्दाला चिरडलं

Hit&Run Case: ई- रिक्षाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात स्कूलबसने वृध्दाला चिरडलं

मुंबई | Mumbai
मुंबई, पुण्यानंतर उपराजधानी नागपूर हिट अँड रनमुळे हादरलेय. गेल्या २४ तासांमध्ये हिट अँड रनच्या ३ घटना समोर आल्या आहेत. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या परिसरात २ घटना घडल्यायत. तर नागपूरच्या रघुजीनगर परिसरात रस्त्यावरून जाणाऱ्या ई- रिक्षाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात स्कूलबसने बाजूने चालणाऱ्या सायकलस्वार साठ वर्षीय वृध्द व्यक्तीला धडक दिली. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे.

- Advertisement -

रत्नाकर रामचंद्र दीक्षित यांचे उपचारादरम्यान निधन झालेय. दीक्षित आठ जुलैला सकाळी नऊच्या सुमारास सायकलने छोटा ताजबाग ते तुकडोजी चौक या मार्गाने जात होते. या अपघातामध्ये ते सायकलवरून खाली पडले. ते गंभीर जखमी झाले होते. स्थानिकांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना रत्नाकर दीक्षित यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान ही अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, दीक्षित हे आपल्या सायकलवर चालले असताना मागून येणाऱ्या स्कूल बसनं त्यांना धडक दिल्याचे स्पष्ट दिसत आहेत. ते या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले होते, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या