Thursday, March 13, 2025
Homeनाशिकदीड लाखांच्या रोख रकमेवर चोरट्यांचा डल्ला

दीड लाखांच्या रोख रकमेवर चोरट्यांचा डल्ला

येवला | प्रतिनिधी Yeola

- Advertisement -

येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत कॅश काऊंटरवरून काढलेली एक लाख 49 हजार रुपयांची रक्कम तरुणाच्या बॅगेतून अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.

तालुक्यातील धुळगाव येथील शुभम दत्तात्रय खोडके हा तरुण शेतीकामासाठी गरज असल्याने बुधवारी, (दि. ११) दुपारी २ वाजेच्या दरम्यान रक्कम काढण्यासाठी येवला स्टेट बँक शाखेत आला होता. पैसे काढण्यासाठी कॅश काऊंटरला चेक देवुन रक्कम रुपये १ लाख ४९ हजार रुपये इतकी रक्कम शुभमने काढली व आपल्या जवळील बॅगेत ठेवली. त्यानंतर सदर रक्कमेतुन काही रक्कम आईचे नांवे असलेल्या बँक खात्यात वर्ग करायची असल्याने स्लीप भरुन पैसे कॅश काऊंटरला जमा करण्यासाठी शुभमने बॅग उघडली असता बॅगेत पैसे नसल्याचे दिसुन आले. बँकेत व बँकेबहेर शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु अज्ञात चोरटे रक्कमेसह पसार झाले होते.

शुभम खोडके यांच्या तक्रारी वरून शहर पोलीसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस सीसीटिव्ही फुटेज वरून संशयित चोरट्यांचा शोध घेत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या