Friday, September 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात दीड वर्षीय बालकाचा मृत्यू

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात दीड वर्षीय बालकाचा मृत्यू

- Advertisement -

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

शहरासह महामार्ग लगतच्या वसाहतीत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव अधिकच वाढला आहे.भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या शहरातील लबैक हॉटेल जवळील एकादीड वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने शहरात संतापाचे वातावरण पसरले आहे

शहेजाद कलिम शेख ( वय दीड वर्ष) हे त्या मयत बालकाचे नाव आहे. शहेजाद याचे आई – वडील घरात झोपलेले होते.तो घराजवळच खेळत असतांना त्याच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवित त्याला जखमी केले. तो रक्तबंबाळ झाला. त्याचे कुटुंबीय व लगतच्या नागरिकांनी त्याची कुत्र्याच्या तावडीतून मुक्तता करत जखमी अवस्थेत सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

बालरोग तज्ञ डॉ. वीरेंद्र पाटील यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले.मात्र त्याच्या जखमा खोलवर असल्याने तसेच अतिरक्तश्राव झाल्याने त्याची प्रकृती अधिक बिघडल्याने त्याला धुळे येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

या घटनेने सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शहरात भटक्या कुत्र्यांचा मोठया प्रमाणात उपद्रव वाढला आहे. महानगरपालिके मार्फत यावर कोणतीच उपाययोजना केली जात नाही. या कुत्र्यांच्या दहशतीमुळे महिला व लहान मुलांना बाहेर पडणे अवघड झाले आहे. पालिका प्रशासनाने यासंदर्भात तातडीने कारवाई करीत या भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी शहरातून होत आहे.

ताज्या बातम्या

Nashik ZP News : जिल्हा परिषदेचे सन २०२६ चे गुणवंत शिक्षक...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने नाशिक जिल्हा परिषदेच्यावतीने...