Thursday, March 13, 2025
Homeनाशिकदोन कार समोरासमोर धडकल्या; एक जणाचा मृत्यू; ४ जखमी

दोन कार समोरासमोर धडकल्या; एक जणाचा मृत्यू; ४ जखमी

उमराणे | वार्ताहर Umrane

आज शनिवार सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उमराणे गावापासून 2 किमी अंतरावर डोंगरगाव चौफुलीजवळ असलेल्या मातोश्री फार्म समोर मालेगाव हुन कळवणच्या दिशेने जात असलेल्या हुंडाई सेंट्रो कार क्रमांक एम एच ४१ ए झेड ७४११ व सप्तशृंगी गडावरून इंदोरकडे जात असलेल्या हेक्टर गाडी क्रमांक एम पी १३ झेड जे ८३१३ या दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला.

- Advertisement -

अपघातात सेंट्रो गाडीतील कळवण येथील देवळा मर्चन्ट बँकेचे व्यवस्थापक गणेश सुभाष ततार वय ३६ हे जागीच ठार झाले, तर हेक्टर गाडीतील मध्य प्रदेशातील एकाच कुटुंबातील पती, पत्नी, १ मुलगी व १ मुलगा असे ४ जण जखमी झाले आहेत.

सदर अपघातात दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले पावजीदादा मंदिर मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अपघात स्थळी मदत कार्य करून जखमींना मालेगाव येथे रुग्णालयात दाखल केले.

सदर अपघाताबाबत पुढील तपास देवळा तालुका पोलीस करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या