Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूज'एक देश, एक निवडणूक' विधेयक आज लोकसभेत सादर होणार; भाजपने खासदारांना बजावला...

‘एक देश, एक निवडणूक’ विधेयक आज लोकसभेत सादर होणार; भाजपने खासदारांना बजावला व्हीप

नवी दिल्ली | New Delhi

भारतीय जनता पक्षाने (BJP) मंगळवारसाठी आपल्या खासदारांना (MP) तीन ओळींचा व्हिप जारी केला आहे. ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयक आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास संसदेत (Parliament) सादर केले जाणार असून केंद्रीय कायदामंत्री अर्जुन मेघवाल (Arjun Meghwal) हे विधेयक सादर करणार असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, ‘एक देश, एक निवडणुकी’ संदर्भात (One Nation One Election) एनडीएच्या सर्व घटक पक्षांची चर्चा झाली आहे आणि सर्व पक्ष यासाठी अनुकूल आहेत. तसेच विरोधी पक्ष केवळ राजकीय कारणांसाठीच या विधेयकाला विरोध करत आहेत. हे विधेयक संसदीय समितीकडे पाठवण्यास सरकारची कसलीही हरकत नाही. महत्त्वाचे म्हणजे, लोकसभेत मंगळवारचा अजेंडा समोर आल्यानंतर यासंदर्भात सर्व कयास स्पष्ट होतील. गेल्या शुक्रवारी लोकसभेच्या कामकाजाच्या यादीत या विधेयकाचा समावेश करण्यात आला होता आणि त्याच दिवशी या विधेयकाच्या प्रतीही सर्व खासदारांना वाटण्यात आल्या होत्या. मात्र नंतर हे विधेयक लोकसभेच्या सुधारित कामकाजाच्या यादीतून काढण्यात आले होते.

दरम्यान, सरकारने (Government) मागील कार्यकाळात सप्टेंबर २०२३ मध्ये या महत्त्वाकांक्षी योजनेवर काम करण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली होती. कोविंद समितीने एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी मार्चमध्ये आपल्या शिफारशी सरकारला सादर केल्या होत्या. केंद्र सरकारने काही काळापूर्वी समितीच्या शिफारशी स्वीकारल्या. समितीने आपल्या अहवालात दोन टप्प्यात निवडणुका घेण्याची शिफारस केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...