Wednesday, May 20, 2026
HomeनगरSangamner : कांदा व्यापार्‍याची 19 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक

Sangamner : कांदा व्यापार्‍याची 19 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

डिसेंबर 2024 मध्ये संगमनेरात कुसूर (ता.जुन्नर, जि.पुणे) येथील कांदा व्यापार्‍याची केरळ व तामिळनाडूच्या दोन व्यापार्‍यांनी तब्बल 19 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुसूर येथील विक्रम रमेश बोचरे (वय 32) यांनी केरळमधील एस. के. ट्रेडर्स ओझोलोपॅथीचे काझा मुहम्मद हुसेन (किनारुपल्लम प्रिव्हा, वेल्लानधवलम, ओझोलोपॅथी) यास 13 लाख 70 हजार रुपये आणि तामिळनाडूचे श्री मरियम ट्रेडर्स यास 5 लाख 70 हजार रुपयांचा कांदा पाठवून दिला होता. मात्र, त्या दोन्ही व्यापार्‍यांनी कांदा मालाचे 19 लाख 40 हजार रुपये न देता फसवणूक केली आहे.

याप्रकरणी विक्रम बोचरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील दोन्ही व्यापार्‍यांवर शहर पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिल मोरे हे करत आहे.

ताज्या बातम्या

default-featured-image

Nashik APMC News : नाशिक बाजार समिती उपसभापतीपदी प्रल्हाद काकड

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Nashik APMC News) उपसभापतीपदी प्रल्हाद काकड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. माजी उपसभापती जगन्नाथ...