Saturday, May 30, 2026
Homeदेश विदेशजम्मु काश्मीरच्या कुलगामध्ये सुरक्षा दल दहशतवाद्यांमध्ये चकमक; तीन दहशतवाद्यांना कंठस्नान, सर्च ऑपरेशन...

जम्मु काश्मीरच्या कुलगामध्ये सुरक्षा दल दहशतवाद्यांमध्ये चकमक; तीन दहशतवाद्यांना कंठस्नान, सर्च ऑपरेशन सुरु

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील अखल देवसर भागात सलग तिसऱ्या दिवशीही दहशतवाद्यांविरोधात चकमक सुरू आहे. आज तिसऱ्या दिवशी आणखी एक दहशतवादी मारला गेला आहे. याआधी शनिवारी दोन दहशतवादी ठार झाले होते. अखलच्या जंगलात रात्रभर स्फोट आणि गोळीबार सुरूच होता. या कारवाईत एक जवान जखमी झाला आहे. चार ते पाच अतिरेक्यांचा गट या गावात असल्याचा सशस्त्र दलाचा संशय आहे.

- Advertisement -

तत्पूर्वी शनिवारी झालेल्या कारवाईत दोन अतिरेक्यांना ठार करण्यात यश आल्याचे सैन्यदलाच्या वतीने सांगितले गेले होते. भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने ऑपरेशन अखलची ताजी माहिती देताना म्हटले की, शनिवारी रात्री अधूनमधून गोळीबार सुरू राहिला. शनिवारी कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाचा हरिस नजीरसह दोन दहशतवाद्यांना ठार मारले. तिघेही कुलगाम जिल्ह्यातील अखलच्या जंगलात लपले होते.

या दहशतवादविरोधी कारवाईत तंत्रज्ञानाची देखरेख करणारी यंत्रणा आणि विशेष पॅरा फोर्सचे जवान आहेत. जम्मू आणि काश्मीरचे डीजीपी आणि लष्कराच्या १५ व्या कॉर्प्सचे कमांडर या दहशतवादविरोधी कारवाईवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अखलच्या जंगलात सुरू असलेल्या या दहशतवादविरोधी कारवाईत विशेष ऑपरेशन्स ग्रुप (एसओजी), लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) यांची संयुक्त टीम कारवाई करत आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी लष्कराची कुमक या परिसरात वाढविण्यात आली. त्यानंतर सकाळी पुन्हा एकदा गोळीबार सुरू झाला. ज्यात दोन अतिरेकी ठार झाले. जंगलात लपून बसलेल्या अतिरेक्यांची शोधमोहीम हाती घेतल्यानंतर अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला होता. त्याला जवानांनी प्रत्युत्तर दिले, असे लष्करातील अधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत म्हटेल.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

मनोज

CM Devendra Fadnavis On Maratha Andolan: रखरखत्या उन्हात मनोज जरांगेंचं आमरण...

0
नागपूर | Nagpurमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून (३० मे) अंतरवालीत आमरण उपोषण सुरु केले आहे. सातारा संस्थानचा जीआर काढा....