Tuesday, July 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजCM Devendra Fadnavis On Maratha Andolan: रखरखत्या उन्हात मनोज जरांगेंचं आमरण उपोषण,...

CM Devendra Fadnavis On Maratha Andolan: रखरखत्या उन्हात मनोज जरांगेंचं आमरण उपोषण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

नागपूर | Nagpur
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून (३० मे) अंतरवालीत आमरण उपोषण सुरु केले आहे. सातारा संस्थानचा जीआर काढा. गॅझेटरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या, व्हॅलिडीटी द्या, नाही दिली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असा आदेश काढावा, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली. भर उन्हात जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. त्यावरून राज्यात पडसाद उमटत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणाविषयी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

सरकार मराठा आरक्षणाबाबात सकारात्मक आहे. सरकारची भूमीका पारदर्शक आहे. आम्ही सकारात्मक काम करणारे लोक आहे. आम्ही समाजांना एकमेकांनासमोर आणून भांडत नाही, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. तसेच आम्ही समाजाच्या हिताचे निर्णय घेतो. परंतु त्याचवेळी संविधान आणि न्ययालयाच्या निर्णयाच्या आधिन राहून निर्णय घेतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

निर्देशांचे पालन न करता घेतलेला निर्णय फक्त प्रसिद्धी मिळेल
मराठा समाजाच्या संदर्भात पुन्हा एकदा सांगतो, जेवढे निर्णय मी घेतले, शिंदे यांनी घेतले तेवढे इतिहासात कधी झाले नाही. निर्देशाचे पालन न करता निर्णय घेतला तर फक्त प्रसिद्धी मिळेल, त्यातून काही मिळणार नाही. त्यामुळे संविधान आणि न्यायालयाच्या निर्णयाच्या कसोटीवर खरे ठरणारे जे जे निर्णय असतील ते घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मनोज जरांगेंचे अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरु; सरकारला दिला ‘हा’ इशारा, नेमकं काय म्हणाले?

ओबीसी समाजावार कोणताही अन्याय होऊ देणार नाही
एका समाजाचा काढून दुसऱ्या समाजाला द्यायचा असं कधीही केलं नाही, ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही, मराठा समाजाचाही त्या ठिकाणी समाधान करून देण्याकरिता सगळे निर्णय घेऊ परंतु ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. आता चर्चा झालेली आहे पुन्हा एकदा सांगतो न्यायालय, कायदा आणि संविधान याच्या चौकटीत बसून कोणताही निर्णय घेण्यास तयार आहोत, असे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले.

मनोज जरांगे काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्याय देण्याच्या भूमिकेत यावे. एकदा याच ठिकाणी आम्ही आमच्या आई-बहि‍णींना रक्ताच्या थारोळ्यात पाहिलं आहे. पुन्हा असा विचार करु नका. पोलीस लाठीचार्जच्या भानगडीत पडू नका. राज्यात तुम्हाला जड जाईल, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आडवं बोलत नाही, सरकारला पट्ट्यावर घेत नाही आणि पुन्हा आंदोलन थांबणार नाही, असं इशारा मनोज जरांगेंनी दिला. संवाद करून गोडी बोलाविणे मार्ग काढा. हल्ला करायचा नाही, मराठा शांत आहे. देवेंद्र फडणवीस आता दुसऱ्या वेळी हल्ला करणार नाहीत. तरीही मी बोलून दाखवले, असं मनोज जरांगे म्हणाले.

मनोज जरांगेंच्या मागण्या काय आहे?
1) मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना 29 मे च्या आता कुणबी प्रमाणपत्र द्या.
2) सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे, मिरज संस्थांचा GR काढा. 1994 च्या धर्तीवरच GR काढा.
3) महाराष्ट्रातील सर्व सरसकट गुन्हे मागे घ्या.
4) आंदोलनात बलिदान देणाऱ्या कुटुंबीयांना महावितरण आणि MIDC मध्ये नोकरीचा GR काढा.
5) सारथीच्या सर्व योजना पुन्हा सुरू करा.
6) महामंडळाचे सर्व परतावे ताबडतोब वाटप केले पाहिजे.
7) कुणबी प्रमाणपत्र दिलेले त्याची व्हॉलिडिटी द्या.
8) मराठा उपसमिती काही कामाची नाही, अध्यक्षाला काम नाही. उपसमिती बरखास्त करा.
9) स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा.
10) शिंदे समितीला मुदतवाढ देऊन रेकॉर्ड तपासायला लावा.

ताज्या बातम्या

Nashik News : ​ सावळघाटात भीषण अपघात; चार जण ठार, एक...

0
पेठ | प्रतिनिधी Peth नाशिक-पेठ रस्त्यावरील सावळघाटात आज सायंकाळी एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. पेठ-दिंडोरी हद्दीलगत एका भरधाव ट्रकचे ब्रेक फेल...