Wednesday, June 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजOscar 2026 : यंदाचा ऑस्कर पुरस्कार 'या' चित्रपटाला; सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री कोण...

Oscar 2026 : यंदाचा ऑस्कर पुरस्कार ‘या’ चित्रपटाला; सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री कोण ठरले?

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

मनोरंजन विश्वातील सर्वात प्रतिष्ठित आणि मानाचा समजला जाणारा ९८ वा अकादमी पुरस्कार (Oscars 2026) सोहळा अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. यंदा अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Actor Priyanka Chopra) पुन्हा एकदा ऑस्करच्या मंचावर ‘प्रेझेंटर’ म्हणून झळकल्याने हा सोहळा भारतीयांसाठी विशेष ठरला आहे. यावेळी तिच्यासोबत हॉलिवूड कलाकार रॉबर्ट डाउनी ज्युनियर, अ‍ॅन हॅथवे यांसारख्या दिग्गजांनी मंचावर विजेत्यांची नावे जाहीर करून पुरस्कार प्रदान केले.

- Advertisement -

यंदाच्या ऑस्कर चित्रपटांमध्ये ‘वन बॅटल आफ्टर अनदर’ (One Battle After Another) या चित्रपटाने सर्वाधिक सहा ऑस्कर पुरस्कार जिंकून सोहळ्यावर नाव कोरले. सिनर्स या चित्रपटाला सर्वाधिक १६ नामांकने मिळाली होती, त्याने ४ ऑस्कर जिंकले. तर १३ नामांकने मिळवणाऱ्या ‘वन बॅटल आफ्टर अनदर’ने सर्वाधिक सहा ऑस्कर जिंकले आहेत. तर पॉल थॉमस अँडरसन यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि त्यांच्या ‘वन बॅटल आफ्टर अनादर’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार (Award) मिळाला आहे.

तसेच रायन कूगलरच्या ‘सिनर्स’ (Sinners) ने ४, तर ग्विलर्मो डेल टोरोच्या ‘फ्रँकेन्स्टाईन’ (Frankenstein) ने ३ पुरस्कार जिंकले आहेत. याशिवाय ऑस्करच्या ‘इन मेमोरिअम’ (In Memoriam) यादीत भारतीय दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे नाव समाविष्ट करण्यात आले होते, परंतु मुख्य सोहळ्यातील व्हिडिओमध्ये त्यांना स्थान मिळाले नसल्याचे बोलले जाते.

जेसी बकली ठरली ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’

‘हॅमनेटा (Hamnet) या चित्रपटातील भूमिकेसाठी जेसी बकली हिला ‘सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेत्री’चा पुरस्कार देण्यात आला. गेल्या वर्षी ‘अनोरा’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकणारी अभिनेत्री मायकी मॅडिसन हिने ऑस्कर प्रदान केला.

मायकल बी. जॉर्डन हा ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

मायकल बी. जॉर्डनला ‘सिनर्स’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर देण्यात आला. गेल्या वर्षी ‘द ब्रुटलिस्ट’मधील आपल्या अभिनयासाठी हा पुरस्कार जिंकणाऱ्या अभिनेता ॲड्रियन ब्रोडीने मायकलच्या नावाची घोषणा केली.

F1 ला ‘सर्वोत्कृष्ट ध्वनी’चा पुरस्कार

दिग्दर्शक जोसेफ कोसिन्स्की यांच्या ‘F’ या चित्रपटाचा हा पहिलाच विजय ठरला असून, या क्रीडा-नाट्यपटाने ‘सर्वोत्कृष्ट ध्वनी साठीचा अॅकॅडमी पुरस्कार पटकावला. या चित्रपटाला एकूण चार नामांकने प्राप्त झाली होती.

अँडी जर्गेनसेन यांना सर्वोत्कृष्ट चित्रपट एडिटिंगचा ऑस्कर

अँडी जर्गेनसेन यांना वन बेंटल आफ्टर अनादर या त्यांच्या कामासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट संपादनाचा एडिटिंगचा पुरस्कार मिळाला आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : तुकाराम मुंढेंचा झंझावात आता शिर्डीत!

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोरांविरोधात धडक कारवाया सुरू केली असल्याने या झंझावाताचे लोण...