Wednesday, May 7, 2025
Home Blog Page 12315

ब्रँड फॅक्टरी ‘फ्री शॉपिंग वीकेंड’ ला प्रारंभ; नाशिककरांचा प्रचंड प्रतिसाद

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक ।  प्रतिनिधी
ब्रॅण्ड फॅक्टरीच्या ‘फ्री शॉपिंग वीकेंड’ला बुधवार (दि.4) पासून प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी सुमारे दीड हजाराहून अधिक ग्राहकांनी योेजनेचा फायदा घेत मनसोक्त खरेदी केली.

गडकरी चौकातील पिनॅकल मॉल येथे बॅ्रण्ड फॅक्टरी ‘फ्री शॉॅपिंग वीकेंड’ ला नाशिककरांनी मोठा प्रतिसाद देत खरेदीचा आनंद घेतला. 8 डिसेंबरपर्यंत सुरू असलेल्या या योजनेत ग्राहकांसाठी उत्पादनांवर भरघोस सवलत, कॅशबॅक, फ्यूचर पे व्हॉलेट अशा आकर्षक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.

बँ्रड फॅक्टरीच्या गेल्या हंगामातील सवलत योजनेत चार दिवस सुमारे 18 ते 20 हजार ग्राहकांनी भेट दिली होती. गेल्यावेळी मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा या फ्री शॉपिंग वीकेंडला प्रारंभ झाला. ब्रॅण्ड फॅक्टरीमध्ये 200 हून अधिक भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय बॅ्रण्ड उत्पादनांची खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत असून रुपये 5 हजाराची खरेदी केल्यास ग्राहकांना फक्त 2 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. यासह गिफ्ट व्हाऊचर्स आणि फ्यूचर पेमध्ये 300 रुपयांचा कॅशबॅक असा ट्रिपल धमाका मिळणार आहे.
ग्राहक खरेदीसाठी 250 रुपयांचे तिकीट बुक करून 11 वाजेपूर्वी दालनात खरेदी करून मनसोक्त शॉपिंग करू शकणार आहेत. 100 रुपयांच्या क्लासिक पासवर 11 वाजेनंतर प्रवेश दिला जाणार आहे. तिकीटे बॅ्रण्ड फॅक्टरी दालनात आणि ब्रॅण्ड फॅक्टरी डॉट कॉम या ऑनलाईन संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

दर्जेदार ब्रॅण्डस्
पेपे, जॅक अ‍ॅण्ड जॉन्स, ली-कूपर, लिवाईज, आदिदास, रिबॉक, फिला, अमेरिकन टूरिस्टर, व्हीआयपी, लायन पेरर्स, कॅपलर्स हे आणि असे दर्जेदार, नामांकीत विविध भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डची उत्पादने विक्री साठी उपलब्ध असून जीन्स, शर्ट, कुर्ता पायजामा, शेरवाणी, ब्लेझर, कॅज्यूअल्स, फॉर्मल अशी विविध वस्त्रप्रावरणे, पादत्राणे, पर्स, लगेज बँग, ट्रायव्हलर ट्रॉली यासह विविध उत्पादनांची विस्तृत श्रेणी खरेदीसाठी उपलब्ध आहे.

बेस्ट ऑफर
महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील बेस्ट खरेदी ऑफर ग्राहकांसाठी देत आहोत. पहिल्याची दिवशी ग्राहकांचा उंदड प्रतिसाद मिळला. पूढील चार दिवस नाशिककर मनसोक्त खरेदी करतील इतक्या अविश्वसीय किंमती तसेच फ्यूचर पे, कॅशबॅक सुविधा उपलब्ध आहेत. सुमारे 18 ते 22 हजार ग्राहकांनी चार दिवस भेट देऊन खरेदी करतील अशी आम्हाला आशा आहे.
-आशिष मोरे, फ्लोअर व्यवस्थापक, ब्रॅण्ड फॅक्टरी, नाशिक

श्रीनगर : बर्फाच्या हिमस्खलनात चार सैनिक ठार

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

श्रीनगर : मंगळवारी उत्तर काश्मीरमधील अनेक भागात हिमस्खलनाच्या घटनेत चार सैनिक ठार झाले आहे. कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार सेक्टरमध्ये एका सैनिकी कॅम्प हिमस्खलनाच्या कचाट्यात सापडला. त्यामधील अनेक सैनिक बेपत्ता असल्याचे समजते. या घटनेत भारतीय लष्कराच्या तीन जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर याचवेळी बांदीपोराच्या गुरेझ सेक्टरमध्ये आर्मी पेट्रोलच्या गस्तीत झालेल्या हिमवृष्टीमुळे एक जवान शहीद झाला.

दरम्यान उत्तर काश्मीरमधील बर्‍याच भागात मंगळवारी संध्याकाळी उशिरा हिमस्खलनाच्या घटना घडल्या. काश्मीरमधील कुपवाडा आणि बांदीपोरा जिल्ह्यात हिमस्खलनाच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये अनेक जवान बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. बेपत्ता जवानांना शोधण्यासाठी एआरटीचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत.

नुकत्याच सियाचीन ग्लेशियरमध्ये हिमस्खलनाच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये अनेक जवानांनी आपले प्राण गमावले आहेत. सियाचीन जगातील सर्वात उंचावरील ठिकाण म्हणून ओळखले जाते. तीन दिवसांपूर्वीच सियाचीनच्या दक्षिणेकडील भागात हिमस्खलनात लष्कराचे दोन जवान शहीद झाले होते. यापूर्वी १८ नोव्हेंबर रोजी सियाचीन ग्लेशियर येथे झालेल्या भीषण हिमस्खलनात भारतीय सैन्य दलातील चार सैनिक ठार झाले होते.

सियाचीनमध्येसुद्धा अशा प्रकारच्या अपघातात भारतीय लष्कराच्या शेकडो जवानांनी आपले प्राण गमावले आहेत. आकडेवारीनुसार सन १९८४ पासून सियाचीनमध्ये हिमस्खलनाच्या घटनांमध्ये ३५ अधिकाऱ्यांसह १ हजारहून अधिक सैनिक शहीद झाले आहेत. २०१६ मध्ये अशाच घटनेत मद्रास रेजिमेंटचा शिपाई हनुमानंतप्पा यांच्यासह एकूण १० लष्करी जवानांचा मृत्यू बर्फात अडकल्याने झाला होता.

आयसीसी कसोटी क्रमवारीत कोहली पुन्हा ठरला ‘विराट’

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत प्रथम क्रमांकाचे स्थान मिळविले आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथला मागे टाकले आहे. नुकत्याच बांगलादेशविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केल्याने विराट पुन्हा प्रथमस्थानी आला आहे.

आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत विराट कोहली ९२८ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे, तर स्टीव्ह स्मिथ ९२३ गुणांसह दुसर्‍या स्थानावर घसरला आहे. अ‍ॅशेस मालिकेत उत्कृष्ट कामगिरीनंतर स्टीव्ह स्मिथ प्रथम क्रमांकावर आला होता, परंतु पुन्हा एकदा विराट कोहली या खुर्चीवर विराजमान झाला आहे. विराटने मागील चार कसोटीत एकूण ७७४ धावा केल्या होत्या.

त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा मार्कस लॅबुशेने प्रथमच पहिल्या दहामध्ये पोहोचला असून तो ८ व्या क्रमांकावर आहे. भारताच्या चेतेश्वर पुजाराने चौथ्या क्रमांकावर तर न्यूझीलंडच्या केन विल्यमसनने तिसरे स्थान कायम राखले. गोलंदाजांमध्ये पेसर जसप्रीत बुमराह पाचव्या क्रमांकावर तर ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन ९ व्या क्रमांकावर आहे. पॅट कमिन्स प्रथम क्रमांकावर तर कागिसो रबाडा क्रमांक २ वर आहे.

तीन आयर्नमॅन नाशकात दाखल; गरवारे पाॅइंटवर जंगी स्वागत

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक | प्रतिनिधी 

अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पूर्ण करावी लागणारी ‘आयर्न मॅन’ स्पर्धा नाशिकच्या चौघांनी  पूर्ण करत सातासामुद्रापार तिरंगा फडकवला. यापैंकी आज तीन नाशिककरांचे आज शहरात आगमन झाले. नाशिककरांनी शहराच्या वेशीवर आलेल्या तिघा ‘आयर्न मॅन’चे जंगी स्वागत केले. शहरातील पाथर्डी फाटा परिसरातील गरवारे पाॅइंटवर हा सोहळा पार पडला. यावेळी डॉ. मनीषा रौंदळ यांनी औक्षण केले.

ऑस्ट्रेलियाच्या बसल्टन येथे पार पडलेल्या स्पर्धेत नाशिकच्या चार खेळाडूंनी अतिशय खडतर समजली जाणारी ‘आयर्न मॅन’ स्पर्धा आव्हानात्मक वातावरणात पूर्ण केली.

नाशिक सायकलीस्टचे सदस्य किशोर घुमरे, प्रशांत डबरी, महेंद्र छोरीया आणि अरुण गचाले असे चौघा खेळाडूंचे नावे आहेत. यातील किशोर घुमरे वगळता इतर तिघेजण आज नाशिकमध्ये दाखल झाले.

यावेळी त्यांचे स्वागत करण्यासाठी खास नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, नाशिक सायकलीस्ट असोशिएशनचे पदाधिकारी, शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

स्पर्धेदरम्यान थंड पाण्यात जलतरण, प्रतिरोध करणाऱ्या वाऱ्याचा सामना सायकलिंग आणि रनिंग करावी त्यांना करावी लागली. डॉ. गचाले यांनी शेवटच्या क्षणी अतिशय वेगाने धावून ही स्पर्धा चार मिनिट आधी पूर्ण करत बाजी मारल्याने त्यांचा अनुभव ऐकण्यासाठी अनेकांनी त्यांच्याजवळ गर्दी केली होती.

किशोर घुमरे यांचे मायदेशी ९ नोव्हेंबरला आगमन होणार आहे. प्रशांत डबरी व  महेंद्र छोरीया यांनी मागील वर्षी कोल्हापूर येथे हाफ आयर्न मॅन स्पर्धा यशस्वी पूर्ण केली होती.

तसेच डॉक्टर अरुण गचाले यांनी गोवा येथे हाफ आयर्न मॅन स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात पूर्ण केली होती. याआधी नाशिकचे माजी पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांनीही या स्पर्धेत आपले नाव कोरले होते. या स्पर्धेत विजयश्री प्राप्त करणाऱ्या तिघांना  डॉ. पिंपरीकर यांच्या स्पोर्टमेड रीहाब सेंटरचे डॉ. मुस्तफा टोपीवाला यांचे मार्गदर्शन लाभले.

स्पर्धेचे स्वरूप

या स्पर्धेत 3.9 किलोमीटर समुद्रात पोहणे, 180 किलोमीटर सायकलिंग,  42 किलोमीटर रनिंग असे असून या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 17 तासांचा अवधी  तास दिले जातात.

तरुणाईच्या दिलाची धडकन सोनाली कुलकर्णी हिच्याशी मनमोकळ्या गप्पा

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

तरुणाईच्या दिलाची धडकन, सगळ्यांची लाडकी हिरकणी, म्हणजेच सोनाली कुलकर्णी, ही उत्तम अभिनेत्री आणि नर्तिका म्हणून आपल्याला ठाऊक आहेच. ‘युवा डान्सिंगक्वीन’ या कार्यक्रकामधून आता ती परिक्षकाच्या नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्यानिमित्ताने तिच्याशी मारलेल्या या गप्पा…

१. परीक्षक म्हणून तुझ्या भावना काय आहेत?

एखाद्या टीमसोबत पुन्हा एकदा काम करायची संधी मिळते तेव्हा खूप छान वाटतं. आपण चांगलं काम केलेलं असल्याची ती पावती असते. ‘झी युवा’सोबत पुन्हा एकदा काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.  अप्सरा आली’ या कार्यक्रमापेक्षा निराळा असा हा कार्यक्रम करण्याची संधी मिळणार आहे. एका वेगळ्या प्रयोगाचा मी भाग आहे याचा मनापासून आनंद आहे.

२. हिरकणी’नंतर पुन्हा एकदा तू प्रेक्षकांसमोर येणार आहेस.  आता तुला परिक्षकाच्या खुर्चीत बसायचे आहे. या भूमिकेविषयी काय सांगशील?

‘युवा डान्सिंग क्वीन’बद्दल मी खूप उत्सुक आहे. अभिनय क्षेत्रातून आपल्या सगळ्यांसमोर आलेल्या तारका, आता डान्सर म्हणून पाहायला मिळणार आहेत. त्यांच्या ‘रील लाईफ’सोबतच,  रिअल लाईफ’ सुद्धा यातून पाहायला मिळेल. वेगवेगळ्या रुपात दिसणाऱ्या या तारकांचा नृत्याविष्कार पाहणं, नक्कीच आवडेल. या सर्व स्पर्धकांकडून मलाही खूप काही शिकायला मिळेल अशी आशा आहे. परीक्षक म्हणून काम करायचा अनुभव मस्तच असेल, याची खात्री वाटते.

३. परीक्षण करत असताना, नेमके कोणते मुद्दे तुझ्या दृष्टीने महत्त्वाचे असणार आहेत?

स्पर्धक त्यांच्या प्रवासात काय काय प्रयोग करतात, त्यांच्यात कशी सुधारणा होते हे माझ्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. सगळ्याच जणी उत्तम डान्सर्स आहेत. काहींनी नृत्य शिकलेलं नाही, त्यांना या प्रवासात शिकायला मिळेल याची खात्री आहे. स्पर्धक काय काय नवीन घेऊन येतात, याकडे सुद्धा माझं लक्ष असेल. जे स्पर्धक, या कार्यक्रमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मंचावर नृत्य सादर करणार आहेत, त्यांचा ‘अंडरडॉग ते स्टार’ असा होणार असलेला प्रवास सुद्धा माझ्यासाठी महत्त्वाचा असेल.

४. मयूर वैद्य तुझ्याबरोबरीने परीक्षण करणार आहे. त्याच्याविषयी काय सांगशील?

मयूर वैद्य हा माझा खूप लाडका मित्र आहे. त्याच्यासोबत याआधी मी काम केलेलं आहे. तो एक अत्यंत गोड व्यक्ती आहे, हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. सध्या शूटिंगला सुरुवात झालेली आहे. एकत्र काम करायला आम्हाला खूप मजा येते आहे. अर्थात, मयूर कथ्थकचा गुरू आहे, त्यामुळे त्याच्याकडून कथ्थक शिकायला सुद्धा मला खूप आवडेल. शूटिंग सुरू झाल्यापासूनच इतकी मजा येत असल्याने, मयूर सोबत काम करत असताना आणखी काय काय अनुभवायला मिळेल याची मला उत्सुकता आहे.

५. या कार्यक्रमाची संकल्पना खास आणि वेगळी आहे. त्याविषयी तुझं मत काय आहे?

स्पर्धकांना एकमेकींना वोटआऊट करण्याची संधी या कार्यक्रमात मिळणार आहे. ही या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची खासियत ठरेल. स्पर्धकांमध्ये चुरस आणि स्पर्धा तर असतेच, याशिवाय त्यांना एकमेकांकडून शिकायला मिळते, त्यांच्यात मैत्री होते. केवळ एखादा स्पर्धक आपल्यापेक्षा उजवा आहे, म्हणून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न न करता, खिळाडूवृत्तीने या वोटआऊटचा वापर त्या कशा करतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे.  यासगळ्यामुळे पुढे नक्की के घडेल, हे परीक्षक म्हणून पाहणं सुद्धा रंजक ठरेल. आपण सगळेजण मिळून हा फॉरमॅट कसा हाताळू हे बघण्याची मला आता खूप स्तसूक्त आहे. याशिवाय इतरही अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी पाहायला मिळतील. हा कार्यक्रम प्रेक्षकांनी अवश्य पहावा.

मखमलाबाद येथे अज्ञाताकडून दुचाकीची जाळपोळ

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मखमलाबाद : येथील परिसरात बुधवारी पहाटे दिडच्या सुमारास पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी जाळण्यात आल्याची घटना घडली आहे. फाेटाेग्राफर नेमिनाथ जाधव यांची दुचाकी असून याप्रकरणी म्हसरूळ पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान परिसरातीलच संशयित सुशांत साेनवणे याने ही दुचाकी जाळल्याची प्राथमिक माहिती आहे. संशयित सोनवणे गायब असून या घटनेत जाधव यांच्या घराच्या खिडकीच्या काचा, बाजेचे नुकसान झाले आहे.

शहर परिसरात समाजकंटकांकडून दुचाकी जाळण्याचे प्रकार कायम घडत असून या प्रकाराला काही अंशी आळा बसला होता. परंतु पुन्हा या प्रकाराने डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

छत्तीसगढ : सुट्टी मिळण्याच्या वादातुन झालेल्या गोळीबारात सहा जवानांचा मृत्यू

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

छत्तीसगढ : नारायणपूर येथील इंडो-तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी) शिबिरात धक्कादायक घटना घडली असून घटना घडली. जवानांमधील परस्पर वादानंतर झालेल्या गोळीबारात तब्बल सहा सैनिकांचा मृत्यू झाला असून २ जवान जखमी आहेत. बुधवारी (दि. ०४) सकाळच्या सुमारास हि घटना घडली. सुट्टीच्या वादानंतर ही सनसनाटी घटना घडली आहे.

दरम्यान नारायणपूर या ठिकाणी इंडो-तिबेट सीमा पोलीस कॅम्प चालू असतांना हि घटना घडली. सुट्टीच्या कारणावरून हि घटना घडल्याचे प्राथमिक माहिती आहे. जखमी सैनिकांना हेलिकॉप्टरने रायपूर येथे हलविण्यात आले आहे.

बस्तर जिल्ह्याचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी म्हणाले की, नारायणपूर जिल्ह्यातील काडेनर गावात आयटीबीपीच्या ४५ व्या बटालियनच्या कॅम्पमधील सैनिकांमध्ये गोळीबार झाला. एका कॉन्स्टेबलने या गोळ्या घातल्या असून हल्ल्यानंतर स्वतःही गोळी मारल्याची माहिती मिळते आहे. या घटनेनंतर आर्मी कॅम्पमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गुगल बनविणाऱ्याने सोडले पद; सुंदर पिचाई होणार अल्फाबेटचे सीईओ

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

भारतीय-अमेरिकन वंशाचे गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांच्यावर आणखी मोठी जबाबदारी आली आहे. गुगलचीच मूळ कंपनी असलेल्या अल्फाबेटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाची जबाबदारीही आता सुंदर पिचई पाहणार आहेत.

या जबाबदारीसोबतच सुंदर पिचई आता जगातील सर्वात शक्तीशाली कॉर्पोरेट व्यक्तीमत्व बनले आहेत. गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन यांनी अल्फाबेटचं नेतृत्त्व करणार नसल्याची घोषणा केली आहे.

गूगलचे सीईओ भारतीय वंशांचे सुंदर पिचाई यांना नवी जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे. गूगलची उपकंपनी असलेल्या एल्फाबेटचे सीईओ पदाची जबाबदारी देण्यात येणार आहे.

गूगल बनविणाऱ्या लैरी पेज और सर्गेई ब्रिन कुटुंबाला वेळ देण्याचे कारण देत आपले पद सोडले आहे. त्यामुळे या पदाची जबादारी सुंदर पिचाई यांना देण्यात आली आहे.

पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; सशर्त जामीन मंजूर

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मुंबई : कॉंग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना आज सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. हा जामीन सशर्त असून २ लाखांच्या जातमुचलक्यावर पी. चिदंबरम यांची आज दिल्लीच्या तिहार जेलमधून सुटका होणार आहे.

दरम्यान आयएनएक्स मीडिया हाऊस या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चिदंबरम यांना आज सकाळी जमीन मंजूर करण्यात आला. २१ ऑगस्ट रोजी त्यांना दिल्ली येथील निवासस्थानाहून अटक करण्यात आली होती. त्यानंतर जामीनासाठी केलेल्या अर्जावर वारंवार सुनावणी झाली मात्र त्यांचा सुटकेचा मार्ग मोकळा होत नव्हता. परंतू आज ईडी गुन्ह्यामधून चिदंबरम यांना दिलासा मिळाला आहे.

हे प्रकरण म्हणजे आयएनएक्स मीडिया मनी लॉन्ड्रिंग होय. यामध्ये पी.चिदंबरम यांचे पुत्र ईडीने कार्ती चिदंबरम याना ईडीने डंका देत ५४ कोटींची संपत्ती जप्त केली होती. यावेळी पी. चिदंबरम हे गायब झाल्याने पोलिसांनी त्यांनी राहत्या घरी अटक केली.

जळगाव : दूरदर्शन टॉवरजवळ कंटेनरने महिलेला चिरडले ; महामार्गावरील खड्ड्यांनी घेतला जीव

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

अंबुलन्स तासभर न आल्याने मृतदेह जागेवरच

जळगाव –

जळगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या दूरदर्शन टॉवरजवळ आज सकाळी १०.१५ वा. झालेल्या अपघातात कंटेनरने ५० वर्षीय महिलेला चिरडल्याची घटना घडली.

याबाबत सविस्तर असे की, भुसावळ उस्मानीया कॉलनीतील रहिवाशी शेख चाँद शेख उस्मान (वय ६०) व नजमाबी शेख चाँद (वय ५०) हे दाम्पत्य ॲटीव्हा टूव्हीलर  क्र. एम.एच.- ७१७९ ने भुसावळ येथून जळगावकडे जात असताना दूरदर्शन टॉवरजवळ हरियाना पासिंगचे कंटेनरने धडक दिल्याने हे दाम्पत्य कोसळले व त्यात नजमाबी शेख चाँद ही महिला कंटेनरच्या चाकाखाली आली व चिरडल्या गेल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर पती शेख चाँद शेख उस्मान हे जखमी झाले.

ॲब्युलन्सची प्रतिक्षा

घटना घडताच महामार्ग पोलीस घटनास्थळी पोहचले त्यांनी अंबुलन्स बोलावण्याचा प्रयत्नही केला मात्र घटना घडून एक तास झाला तरी घटनास्थळी अंबुलन्स न पोहचल्याने सदर महिलेचा मृतदेह जागेवरच पडून होता.

शहर वाहतुक अधिकाऱ्यांची भेट

जळगाव शहर वाहतुक पोलीस अधिकारी एपीआय श्री.कुनगर व पीएसआय दिलीप पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत झालेली वाहतुकीची कोंडी दूर करत अंबुलन्स बोलवून प्रेत शासकीय रूग्णालयात रवाना केले. तसेच नशिराबाद पोलीस ठाण्याचे सपोनी प्रविण साळुंखे यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

मुलाचे भान हरपले

अपघाताचे वृत्त नातेवाईकांना कळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली यात त्यांचा जळगाव येथे राहणारा मुलगा पोहचताच आईचा मृतदेह बघून त्याचेही भान हरपले होते.

नजमाबी यांना त्यांचे पती शेख चाँद शेख उस्मान हे जळगाव येथे दवाखान्यात नेत होते शेख चाँद हे रेल्वेत कर्मचारी असून त्यांची या महिनाअखेर सेवानिवृत्ती होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खड्ड्यांनी घेतला बळी

जळगाव-नशिराबाद दरम्यान महामार्गावर अनेकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे आतापर्यंत अनेक अपघात होऊन अनेकांचा बळी घेतला आहे. आजही खड्ड्यांमुळेच हा बळी गेल्याचे घटनास्थळी जमलेल्या जमावाने संताप व्यक्त केला.