Thursday, April 16, 2026
Home Blog Page 13275

ढगाळ वातावरणामुळे पिके धोक्यात: खरीपाबरोबर रब्बी हंगामाला बुरे दिन; करपा व मावा रोगाचा प्रादुर्भाव

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

इगतपुरी | जाकीरशेख

तालुक्याच्या विविध भागात अवकाळी पावसानंतर दररोज होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे शेतीतील उभ्या व नुकतीच काढणी झालेल्या पिकावर विविध रोगाचा प्रदुभाव होऊ लागल्याने शेतकरी चिंतातुर झाला असून शेतातील पीक वाचिवण्यासाठी औषधची फवारणी करीत पिके वाचिवण्याचा प्रयत्न करीत आहे.

चालू वर्षी परतीच्या पाऊसासह अवकाळी पाऊसाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातल्याने शेतातील खरीपाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यात हाताशी आलेल्या भात, वरई व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या अवकाळी पाऊसामुळे शेतात सतत पंधरा दिवस पाणी साचले व नंतर पंधरा दिवस शेतात मोठ्या प्रमाणात ओलावा असल्याने शेती तयार करता येत नव्हती. त्यामुळे शेतात मोठया प्रमाणात गवत झाले होते. तेव्हा शेतकऱ्यांनी आहे तसे आवरून शेतातील गवताची साफसफाई करून शेती तयार करून गव्हू, हरभरा, कांदे व भाजीपाला पिकाची लागवड केली आहे.

अवकाळी पाऊसाच्या आठ दिवस आधी काही शेतकऱ्यांनी कांद्यासह इतर पिकांची लागवड केलेली होती. ती पाऊस उघडल्यानंतर बऱ्यापैकी होती. तेव्हा शेतकऱ्यांनी पाऊस उघडल्याानंतर औषधाची फवारणी करून कांदा पिकात सुधारणा झाली होती. परंतु आता या ढगाळ वातावरणामुळे पिके पिवळी पडून त्यांच्यावर करपा व मावा रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. काही शेतकऱ्यांनी कांद्याचे महागडी असे बियाणे आणून टाकले होते.

तालुक्यात किरकोळ प्रमाणात कांद्याचे पिक घेतले जाते. सध्याच्या परिस्थितीत कांद्याचे बियाणे उगवून एक महीन्याचे झाले आहे. आता एवढया पंधरा दिवसात उन्हाळी कांद्याची लागवड करण्यासाठी वेळ आहे. परंतु या ढगाळ वातावरणामुळे कांद्याच्या रोप पिवळी पडून अगरे करपू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी त्याच्यावर बुरशीजन्य औषधाची फवारणी करुन रोपं व इतर पिके जगवण्याची धडपड करीत आहे.

दरम्यान, दरवर्षी नोंव्हबर महीन्यात थंडीत सुरवात होत असते व डिसेंबर महीन्यात मोठ्या प्रमाणात थंडी राहत असे ही थंडी रब्बी हंगामातील गव्हू, कांदे, हरभरा व भाजीपाला पिकासाठी पोषक असते. परंतु चालू वर्षी डिसेंबर महीना सुरु असला तरीही थंडीची चाहूल दिसत नाही. अवकाळी पाऊस उघडल्यानंतर कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरणामुळे पिकांवर फारशी तेजी दिसत नाही.

गेल्या दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने याचा फटका गहू व हरभरा या पिकांना बसण्याची शक्यता आहे .या हवामानामुळे मावा, अळी बरोबरच रोगांचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. अनेक शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्रांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. हतबल होत शेतकऱ्यांना महागडी औषधे घेऊन ती पिकावर फवारणी करत आहे.

– सतिश बांबळे, शेतकरी टाकेद

केंद्र सरकार जीएसटी वाढवणार ?

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नवी दिल्ली – महसूल घटल्याने केंद्र सरकार वस्तू आणि सेवा करामध्ये वाढ करण्याच्या तयारीत आहे. नव्या धोरणानुसार सध्या ज्या वस्तूंवर 5 टक्के जीएसटी आकारला जातो. तो आता 10 टक्के होण्याची शक्यता आहे. तर 12 टक्के जीएसटी असलेल्या वस्तूंवर थेट 18 टक्के जीएसटी लागू होईल. यामुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार आहे. आधीच रोजगाराचा प्रश्न त्यात महागाई आणि आता वस्तू आणि सेवा करामध्ये वाढीची शक्यता यामुळे सामान्य जनतेला मोठा झटका बसणार आहे. पण केंद्र सरकाराच्या या धोरणामुळे देशात एक लाख कोटींचा महसूल सरकारच्या तिजोरीत जमा होईल.

जीएसटी अर्थातच वस्तू आणि सेवा कर हा संपूर्ण देशभरात लागू केला जाणार असून, व्हॅटसह इतर सर्व कर रद्द होणार आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या करप्रणालींना पर्याय म्हणून जीएसटीकडे पाहिलं जात आहे. जीएसटी ही भारतातील सर्वात मोठी आर्थिक सुधारणा आहे. या करप्रणालीमुळे करचुकव्यांना चाप बसणार असून राज्य सरकार तसेच सर्वसामान्यांना यामुळे कोणताही त्रास होणार नाही.

या करप्रणालीमुळे सेंट्रल सेल्स टॅक्स, सेवा कर, एक्साइज टॅक्स, लक्झरी टॅक्स, मनोरंजन कर, व्हॅटसारखे सर्व कर रद्द होणार आहेत. ही करप्रणाली लागू झाल्यानंतर केंद्र आणि राज्यसरकारला यातील समान वाटा मिळणार आहे.

या वस्तूंवर 5 ऐवजी 10 टक्के जीएसटी
चांगल्या प्रतीचं धान्य, पीठ, पनीर, पामतेल, ऑलिव्ह ऑईल, पिज्जा, इकोनॉमी क्लासमधील विमान प्रवास, प्रथम-द्वितीय आणि एसी क्लासच्या रेल्वे तिकीट, सुका मेवा, सिल्क कापड, पुरुषांचे सूट, क्रूज यात्रा, रेस्टॉरंट, आऊटडोअर कॅटरिंग

या वस्तूंवर 12 ऐवजी 18 टक्के जीएसटी
मोबाईल फोन, बिजनेस क्लासमधील विमान प्रवास, लॉटरी, महागडी चित्रं, पाच ते साडेसात हजारंपर्यंतचे हॉटेल रुम्स

पारोळा : बोळे फाट्यावर अपघात ; एक जागीच ठार

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मयत धरणगाव तालुक्यातील

पारोळा प्रतिनिधी-

तालुक्यातील बोळे येथे दि ७ रोजी दुपारी १ वाजे दरम्यान रस्त्याच्या फाट्यावर उभ्या असलेल्या एकास भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटरसायकलने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत गणेश उत्तम सोनवणे रा.वाघळूद ता.धरणगाव यांनी पारोळा पोलीस स्टेशनला माहिती दिली कि तो व त्याचा मित्र रवींद्र गायबू पाटील रा.अकुलखेडा ता.चोपडा हे दोन्ही पल्म्बिंगची कामे करतात दि ७ रोजी ते दोन्ही जण धुळे येथे कामानिम्मित गेले होते.

कामाचा शोध घेवून ते परतीच्या मार्गावर असताना ते शिरूड मार्गे बोळे फाट्यावर दुपारी एक वाजता आले असता दुसऱ्या वाहनांची वाट बघत गणेश हा मोबाईल बघत होता तर रवींद्र हा लघु शंका करण्यासाठी जात असताना तामसवाडी कडून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात मोटरसायकल ने त्यास जोरदार धडक दिली त्यात त्याच्या डोक्यास जबर मार लागल्याने तो रस्त्यातच रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच मयत झाला.

याबाबत गणेश सोनवणे च्या तक्रारी वरून अज्ञात मोटरसायकल चालक विरोधात गुन्हा दाखल होयून पुढील तपास हे कॉ बापू पाटील करत आहे.

शहरात रेल्वेखाली सापडून दोघांचा मृत्यू

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक। रेल्वे अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यातील एकाने आत्महत्या केल्याचे समोर येत आहे.

रेल्वेतून पडल्याने २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी (दि.६) सकाळच्या सुमारास एकलहरा परिसरातील रेल्वेमार्गावर हा प्रकार घडला. यात मृत्यू झालेल्या युवकाची ओळख पटलेली नाही. रेल्वेतून पडल्याने युवकास तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सैय्यद पिंप्री येथील रेल्वे रुळावर एकाने आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.६) सायंकाळी उघडकीस आला. सखाराम पांडु भडांगे (57, रा. सैय्यद पिंप्री) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

किर्तांगळीच्या उपसरपंचपदी सुरेखा चव्हाणके यांची निवड

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

वडांगळी | वार्ताहर

किर्तांगळी ता. सिन्नर येथील एकलहरे गट ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुरेखा चव्हाणके यांची बिनविरोध निवड झाली आहे. सरपंच दगु चव्हाणके अध्यक्षस्थानी होते. विद्यमान उपसरपंच प्रभाकर चव्हाणके यांनी आवर्तन पध्दतीने राजीनामा दिला.

यावेळी ग्रामसेवक सूनिल तुपे संपत चव्हाणके, ग्रामपंचायत सदस्य मोहन चव्हाणके, ज्ञानेश्वर चव्हाणके, साधना चव्हाणके, कल्पना चव्हाणके, प्रमोद चव्हाणके, नवनाथ चव्हाणके, बाबुराव काडेकर, दशरथ गोसावी, दौलत चव्हाणके, लिपीक नारायण गोसावी उपस्थित होते.

सुरेखा चव्हाणके ह्या प्रगतशील युवा शेतकरी रविंद्र चव्हाणके यांच्या पत्नी आहे. संत हरिबाबा पँनलचे नेते संपत तात्या चव्हाणके, सरपंच दगू चव्हाणके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

विद्युतदाहिनी सुरू, सुरक्षा रक्षकही नियुक्त

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

अमरधामच्या सुरक्षेसाठी महापालिका सरसावली

अहमदनगर (प्रतिनिधी) – अमरधामची अवस्था उघड झाल्याने महापालिका प्रशासनाने तेथील सोयीसुविधांकडे लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसापासून बंद अवस्थेत असलेले विद्युत दाहिनीतील एक युनिट सुरू करण्यात आले असून दररोज स्वच्छता व साफसफाई करण्यात येत आहे.

गेल्या चार दिवसांपूर्वी अमरधाम येथे अर्धवट जळालेला मृतदेह मोकाट कुत्र्यांनी बाहेर आढून काढला होता. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. काही स्थानिक नागरिकांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेत महापालिका प्रशासनान बाबत संताप व्यक्त केला होता. दिवसेंदिवस अमरधाम येथे अंत्यसंस्कारासाठी कमी लोखंडी जाळ्या कमी पडत आहे. त्यातच अमरधाम येथे मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे.

तर गेल्या काही महिन्यापासून विद्युत दाहिनीदेखील बंद अवस्थेत असल्याचे मागील घटनेमुळे हे प्रश्न समोर आले. या प्रकराची महापालिका प्रशसानाने तातडीने गंभीर दखल घेत महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. दररोज अमरधामची स्वच्छता करा, सुरक्षा रक्षक नेमण्याचे आदेश देत प्रस्तावित केलेल्या विविध सोयीसुविधांसाठीची मोजमापेही घेतली. गेल्या दोन दिवसात बंद विद्युत दाहिनीची दुरुस्ती वेगाने हाती घेत दोनपैकी एक विद्युतदाहिनी सुरू केली गेली तसेच दुसर्‍या विद्युतदाहिनीचे नवे साहित्यही आले असून, तिचीही दुरुस्ती सुरू केली गेली आहे. तेथे सुरक्षा रक्षक हजर झाले असल्याचे समजते.

दरम्यान अमरधाम येथे अमरधाममध्ये अनाथ व्यक्तीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्याचे नाव-गाव यांची माहिती कोणाला नसते. त्यामुळे शहर हद्दीतील बेवारस मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे काम महापालिकेने सरकार सर्व्हिसेस या संस्थेला दिला आहे. हे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश संबधित संस्थेला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शहरासाठी एकमेव असलेल्या नालेगावातील अमरधाममध्ये रोजच अनेकांचा अंत्यविधी होतो. रात्री काही उपद्रवी लोकांचा येथे नियमित वावर असतो. त्यामुळे येथे कायमस्वरूपी सुरक्षा नेमण्याची गरज आहे.

– सागर लोखंडे

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी दोन मंत्री समन्वय ठेवणार- मुख्यमंत्री

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मुंबई | प्रतिनिधी

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला वेग देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सर्व संबंधित वकिलांची तातडीने बैठक घेण्याचे तसेच सर्वश्री एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांची समन्वयक मंत्री म्हणून नेमणूक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मुख्यमंत्री स्वत: यासंदर्भामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांच्याशी देखील चर्चा करणार आहेत.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आज मंत्रालयात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी मंत्री सर्वश्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, नितीन राऊत, आमदार सर्वश्री हसन मुश्रीफ, राजेश पाटील, अनिल परब आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर तातडीने सीमाप्रश्नी मंत्रालयात बैठक बोलावून एकीकरण समितीला निमंत्रण दिले, यावरून याप्रश्नी महाराष्ट्राची बाजू अधिक मजबूत करण्याची आपली इच्छा असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्यासाठी कोणतेही राजकीय मतभेद न ठेवता सर्वांनी एकत्र यावे. सीमाभागातील गावे महाराष्ट्रात येण्यासाठी सुरू असलेल्या कायदेशीर लढ्यात राज्याची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी कालबद्ध रितीने जाण्याच्या देखील सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

सीमाप्रश्नासंबंधी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री म्हणाले, सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात सध्या कायदेशीर लढा सुरू आहे. हा खटला जलदगतीने संपविण्यासाठी राज्य शासनातर्फे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. यासाठी या खटल्यातील वकिलांची तातडीने संयुक्त बैठक घेण्यात येईल. तसेच खटल्याच्या पुढील सुनावणीस ज्येष्ठ विधीज्ञ हरिष साळवे यांनी बाजू मांडावी, यासाठी त्यांना विनंती करण्यात येईल.

यावेळी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी,  सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव अंशू सिन्हा, ॲड. शिवाजी जाधव, ॲड. संतोष काकडे, दिनेश ओऊळकर, महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार मनोहर किणेकर, माजी आमदार अरविंद पाटील, दिगंबर पाटील, बेळगाव तरूण भारतचे संपादक किरण ठाकूर,  प्रकाश शिढोळकर यांच्यासह एकीकरण समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

दरवर्षी 35 हजार पासपोर्टची मागणी; परदेशी जाण्यामध्ये नाशिककरांचा कल वाढला

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । शिक्षण, नोकरी तसेच व्यावसायासाठी उपलब्ध होत असलेल्या परदेशी संधींमुळे नाशिककरांचा परदेशी जाण्याचा कल वाढत आहे. अशातच पासपोर्टसाठी कमी कागदपत्रे व ऑनलाईन पद्धती यामुळे नाशिकमधून दरवर्षी सरासरी 35 हजार पासपोर्टची मागणी होत असून यामध्ये दरवेळी वाढ होत आहे.

पासपोर्ट अपॉइंटमेंट मिळण्यापासून ते पोलिस व्हेरिफेकशनपर्यंत येणार्‍या अनेक अडचणींवर ऑनलाईन पद्धतीने मात केल्याने पासपोर्ट काढण्याकडे नाशिककरांचा कल वाढला आहे. पासपोर्ट काढणे म्हणजे एक आव्हान असते, अशी पासपोर्ट कार्यालयाची काही वर्षांपूर्वीपर्यंत ख्याती होती. मात्र, गेल्या पाच वर्षांत केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयातर्फे घेण्यात आलेले महत्त्वपूर्ण निर्णय ‘टीसीएस’च्या सहभागातून सुरू झालेल्या पासपोर्ट सेवा केंद्रांमुळे पासपोर्ट प्रक्रिया सुलभ झाली आहे.

गेल्या दोन वर्षांत अपॉइंमेंटची संख्या वाढविण्याबरोबरच कागदपत्रांमध्येही अनेक सवलती दिल्याने पासपोर्ट काढणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच अपॉइंटमेंट मिळण्याचा कालावधी घटल्यामुळे लोक तत्काळ ऐवजी दैनंदिन अपॉइंटमेंटला प्राधान्य देत आहेत. गेल्या वर्षात नाशिक विभागाकडे पासपोर्ट कार्यालयाकडे तब्बल 28 हजार लोकांनी पासपोर्टसाठी अर्ज दाखल केले. यातील 26 हजार 506 नागरिकांना पासपोर्ट वितरित करण्यात आले. चालू वर्षी आतापर्यंत सुमारे 32 पासपोर्टची मागणी करण्यात आली होती. त्याची कागदोपत्री पुर्तता पुर्ण करून बहूतांश लोकांना पासपोर्ट मिळाले आहेत.

गेल्या काही वर्षांत परदेशात उच्च शिक्षण आणि नोकरीसाठी जाण्याच्या संधी वाढल्या आहे. उच्च शिक्षण, नोकरीच्या मुलाखतीदरम्यानही अलीकडे पासपोर्टची विचारणा केली जाते. त्यामुळे विद्यार्थी आणि तरुण नोकरदार वर्ग गरज म्हणून पासपोर्ट काढून ठेवतो आहे. परदेश पर्यटनही अनेकांच्या आवाक्यात आल्याने लोक पासपोर्टची मागणी करीत आहे. परिणामी दरवर्षी पासपोर्टच्या अर्जांची संख्या वाढते आहे.

प्रतिष्ठचे लक्षण
परदेशी शिक्षण, खेळ व नोकरी याची अगामी काळातील नियोजन म्हणुन बहूतांश नागरीक पासपोर्ट काढून ठेवतात. परंतु आता आपल्याकडे पासपोर्ट असेण हे आता प्रतिष्ठेचेही लक्षण झाले आहे. अनेक नागरीकांनी केवळ जवळ पासपोर्ट असावा म्हणुन पासपोर्ट काढून ठेवले जात आहेत. तर अनेकांनी केवळ सर्वात मोठा रहिवाशी पुरावा म्हणून पासपोर्ट काढले आहेत. कोणत्याही कार्यालयात पासपोर्ट दिला तर इतर रहिवाशी पुराव्याची मागणी होत नाही.

प्रतिसाद वाढला
केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्टसाठी लागणारी कागदपत्रे कमी केल्याने लोकांचा प्रतिसाद वाढला आहे. पोलिस व्हेरिफिकेशनमध्ये वापरण्यात येणार्‍या अद्ययावत तंत्रज्ञानामुळे तपासणीचा कालावधी घटला आहे. परिणामी पासपोर्टसाठी अपॉइंमेंट ते पोलिस व्हेरिफेकशनची प्रकिया सुटसुटीत झाली असून अल्पावधीत पासपोर्ट वितरित करण्यास यश आले आहे. परिणामी नागरीकांचाही मोठा प्रतिसाद वाढला असल्याचे पासपोर्ट अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

शेतकरी संघटनेचे 12 डिंसेबरला आंदोलन

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

अहमदनगर (प्रतिनधी) – राज्यातील शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा करणे, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देणे अशा काही मागण्यांसाठी 12 डिसेंबरला राज्यव्यापी निर्बंधमुक्ती आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली.

घनवट यांनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत जाहिरनाम्यात संपूर्ण कर्जमाफी व सात-बारा उतारा कोरा करण्याचे आश्वासन देणारे पक्ष सत्तेत आले आहेत; मात्र, त्याची अंमलबजावणी अद्याप होताना दिसत नाही. याशिवाय अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन होणार आहे. या दिवशी शेतकरी रस्त्याच्याकडेला एकत्र येऊन शेतकर्‍यांच्या मागण्या व सरकारकडून अपेक्षा या विषयावर आपली मते व्यक्त करतील. कोठेही रास्ता रोको अगर रहदारीला अडथळा करण्याचा प्रयत्न होणार नाही.

सकाळी 11 ते दुपारी चारपर्यंत हे आंदोलन ठिकठिकाणी सुरू राहणार आहे. त्यानंतर सरकारला दहा दिवसांचा कालावधी देण्यात येणार आहे. त्यामध्ये या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मात्र बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

नगरचे व्यापारी कारवाईने अन् भिंगारकर पाणीप्रश्नाने हैराण… परेशान…

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेच्या प्लॅस्टिक विरोधी कारवाईने नगरमधील व्यापारी हैराण झालेत, तर छावणी मंडळाच्या वेळकाढू धोरणामुळे भिंगारकर पाण्यासाठी परेशान आहेत. हैराणी-परेशानी सोडविण्यासाठी आ. संग्राम जगताप यांनी आज शनिवारी कलेक्टर अन् कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सीईओंची भेट घेत लक्ष वेधले.

महापालिकेच्या पथकाचा झोल

धोरण निश्चित करण्याची सूचना

महापालिकेने प्लॅस्टिक वापराविरोधात सुरू केलेल्या कारवाईत झोलझाल होत असल्याचा आरोप आमदार संग्राम जगताप यांनी केला आहे. कलेक्टर तथा प्रभारी आयुक्तांनी यात लक्ष घालण्याची मागणी आ. जगतापांनी आज शनिवारी केली.

गुरूवार, शुक्रवार सलग दोन दिवस महापालिकेने नगर शहरात प्लॅस्टिक वापरणार्‍या व्यापारी, व्यावसायिकांविरोधात कारवाई राबविली आहे. या कारवाईदरम्यान सुमारे सव्वा लाख रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. मात्र महापालिकेचे पथक व व्यापारी वर्गात खटके उडत आहे. 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकवर कारवाई करणे अपेक्षित असताना पथक त्याची कोणतीच खातरजमा न करता सरसकट कारवाई करत आहेत. व्यापार्‍यांकडून आकारण्यात येणारा दंड ही नियमानुसार आकारला जात नाही. व्यापारी वर्गावर हा अन्याय असल्याची भावना निर्माण झाली आहे. शासन नियमानुसार कारवाई करण्यात यावी तसेच दंडाची रक्कम वसूल करण्याचे धोरण निश्चित करावे अशी मागणी आ. जगताप यांनी कलेक्टर राहुल द्विवेदी यांच्याकडे केली आहे.

पाणीबाणी अन् हेळसांड

स्वतंत्र पाणीयोजना राबविण्याची केली मागणी

भिंगारमध्ये बिकट बनलेला पाणी प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना राबविण्यात यावी. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांपासून भिंगारकर वंचित असल्याचे सांगत त्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात यावेत, अशी मागणी आ. संग्राम जगताप यांनी केली आहे. कॅन्टोमेंटच्या सीईओंची भेट घेत आ. जगताप यांनी यासंदर्भात चर्चा केली.

भिंगार छावणी मंडळाच्या हद्दीत विकासाचा मोठा अनुशेष आहे. आमदार निधी तोकडा असल्याने भिंगारमध्ये विकास कामे करताना मर्यादा येतात. केंद्र शासनाने देशातील छावणी मंडळांना क वर्ग नगरपालिकेचा दर्जा दिलेला आहे. राज्य शासनाच्या विविध योजना राबविणे सोईस्कर व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. छावणी मंडळाचे त्याकडे दुर्लक्ष झाले असून अजूनपर्यंत केंद्राच्या संरक्षण खात्याची तसेच मान्यता घेऊन पाठपुरावाही केलेला नाही. पर्यायाने भिंगारकर राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांपासून वंचित असल्याचे निदर्शनास आल्याचे आ. जगताप यांनी छावणी मंडळाच्या सीओंचे लक्ष वेधले. भिंगारच्या नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी पाठपुरावा आवश्यक असून त्यातून भिंगारमध्ये मुलभूत सुविधा राबविणे शक्य होणार आहे.

भिंगारमध्ये कॅन्टोमेंटचे रुग्णालाय आहे, पण तेथे डॉक्टर आणि कर्मचार्‍यांची संख्या अपुरी असल्याने रुग्णांची हेळसांड सुरू असल्याचा आरोप आ. जगताप यांनी केला आहे. रुग्णांवर वेळेवर आणि योग्य उपचार होत नसल्याचे सांगत तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचारी वाढविण्याची मागणी आ. जगताप यांनी केली.

जॉगिंग ट्रॅकमध्ये योगा केंद्र उभारा
भिंगारमध्ये भगवान गौतम बुध्द जॉगिंग ट्रॅक आहे. तेथे सकाळी सकाळी भिंगारकर योगासने करतात. मात्र तेथे कोणतीच सुविधा नाही. छावणी मंडळाने तेथे योगासने ओटे बांधावे किंवा योगा केंद्र उभारण्याची मागणी आ. जगताप यांनी कॅन्टोमेंटच्या सीईओंकडे केली आहे.