Tuesday, May 5, 2026
Home Blog Page 13301

चार होमगार्ड तैनात असतानाही गेटचे कुलूप तोडून पारनेरच्या ‘तहसील’मधून डंपर पळवला

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

पारनेर (प्रतिनिधी)- पारनेर तहसील कार्यालयाच्या आवारात शनिवारी अवैध वाळू वाहतूक करणार्‍या डंपरवर कारवाई करून तो उभा केला होता. परंतु कार्यालयाच्या आवाराच्या गेटचे कुलूप तोडून सदरचा डंपर पळवून नेल्याची घटना सोमवारी दि .9 डिसेंबर रोजी रात्री घडली.
विशेष म्हणजे तेथे चार होमगार्ड सुरक्षेसाठी तैनात असूनही असे घडल्याने जनतेतून आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत तहसीलदार ज्योती देवरे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तहसीलदार देवरे व महसूल कर्मचारी यांनी रुई छत्रपती येथील नदीतून अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर (क्र. जे.एच. 05 ए .5571) वाळूसह पकडला. तो थेट तहसील कार्यालयाच्या आवारात आणून लावला. विशेष म्हणजे कार्यालयाच्या आवरला गेट असून त्या गेटला कुलूप लावले होते. मात्र रात्री गेटचे कुलूप तोडून संबंधित डंपर मालकाने पळवून नेला आहे. या डंपरमध्ये सुमारे सात ब्रास वाळू होती. वाळूसह मालकाने हा डंपर पळवून नेला आहे. याबाबत तहसीलदार ज्योती देवरे यांनी पांडुरंग गरुड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोलेच्या शेतकर्‍यांची मुंबईतील व्यापार्‍यांकडून लाखोंची फसवणूक

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मुंबई – एकीकडे अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले असतानाच दुसरीकडे एपीएमसीत जीवापाड जपून वाढवलेल्या शेतमालाची किंमत न देता व्यापारी वर्गाकडून लाखो रुपयांना गंडा घालण्याचा प्रकार समोर आला आहे. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमधील भाजीपाला व्यापार्‍यांनी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील शेतकर्‍यांची लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप शेतकर्‍यांकडून करण्यात आला आहे.

मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात राहणार्‍या 25 शेतकर्‍यांनी आपला भाजीपाला विक्रीसाठी नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये पाठवला होता. आपल्या शेतात तळहातावर पिकविलेला कोबी विकण्यासाठी या शेतकर्‍यांनी व्यापारी वर्गाच्या हवाली डोळे झाकून दिला होता. मालाला चार पैसे आल्यानंतर घेतलेले कर्ज आणि पोरांबाळांची शिक्षणाचा खर्च भागवता येईल अशी भाबडी आशा या बळीराजाने मनाशी केली होती.

मालाचे लाखो रूपये देण्याऐवजी भाजीपाला मार्केटमधील काही व्यापार्‍यांनी त्यांना चालढकल केली. शेतकर्‍यांचे एकूण 13 लाख 50 हजार रूपयांची देणी देण्यास टाळाटाळ करून दिलेला 12 लाख रूपयांचा चेकही वटला नव्हता. यानंतर 6 लाख रूपये रोख देत 7.5 लाख रूपयांची देणी थकीत ठेवली होती. अखेर सात महिने उलटल्यानंतर आपल्या मालाचे पैसे मिळत नसल्याने शेतकर्‍यांनी एपीएमसी प्रशासनाचे कार्यालय गाठले. पण त्या ठिकाणीही त्यांना योग्य तो न्याय मिळत नसल्याने अखेर मुख्यमंत्री कार्यालयाकडे व्यापार्‍यांच्या विरोधात शेतकर्‍यांनी तक्रार केली आहे.

एपीएमसी प्रशासनाकडे तक्रार गेल्यानंतर 7.5 लाख रुपयांचा धनादेश व्यापार्‍यांना देण्यास सांगण्यात आले असून तो न वटल्यास पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याचे एपीएमसी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तर आपल्या कुटुंबातील प्रमुखांचे निधन झाल्याने पैसे देण्यास उशीर झाल्याचे व्यापार्‍यांकडून सांगण्यात आले आहे.

जळगावात रिक्षाच्या धडकेत दुचाकीवरील दोघे मित्र ठार

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

जळगाव  – 

राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव रिक्षाने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत दोन मित्र जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास खोटेनगर ते बांभोरी दरम्यानच्या पोद्दार शाळेजवळील हॉटेल गिरणाईजवळ घडली.

बांभोरीकडून जळगावकडे मोटारसायकलने निघालेल्या विवेक उर्फ विक्कीबाबा पंढरीनाथ नन्नवरे (वय 31) व हेमंत चंद्रहास ललवाणी (वय 34, आहुजानगर) या दोघं तरुण मित्रांना समोरुन येणार्‍या भरधाव रिक्षाने  जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळाजवळ रिक्षा कलंडली असून रिक्षाचालक पसार झाल्याचे काही जणांनी सांगितले. तर याच वेळी मोटारसायकलला धडक मारुन ट्रक पसार झाल्याचेही काही जणांचे म्हणणे आहे.

मृत विवेक हा अगोदर जळगावातील एका खासगी कंपनीत होता. तर सध्या वाळूचे ट्रॅक्टरवर अथवा मिळेल ते काम तो करीत होता. विवेकच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण, पत्नी, चार वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. तो एस.टी.तील चेकर पंढरीनाथ नामदेव नन्नवरे यांचा मुलगा होत.

या घटनेतील दुसरा मृत हेमंत चंद्रहास ललवाणी हा अविवाहित तरुण होता. तो जैन पाइप कंपनीत ठेकेदारामार्फत  कामाला होता. त्याच्या वडिलांचे एक वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. त्याच्या पश्चात आई, लहान भाऊ असा परिवार आहे.

नातेवाईकांचा आक्रोश

याबाबत  कळताच   मृत तरुणांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. या रुग्णालयातील शवविच्छेदनगृहाजवळ पोहचताच तरुणांचे मृतदेह बघून त्यांच्या नातेवाईकांनी आक्रोश केला. तर या घटनेमुळे काही जणांना ग्लानी आली. घटनास्थळी नागरिक आणि मृतांच्या नातलगांची गर्दी झाली.या अपघाताप्रसंगी महामार्गावर बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती. शहर वाहतूक नियंत्रण शाखा व पाळधी दूरक्षेत्राच्या पोलिसांनी काही वेळाने वाहतूक सुरळीत केली. यासंदर्भात जिल्हा रुग्णालयातील  वैद्यकीय अधिकारी डॉ.अतुल पाटील यांनी खबर दिली.

खड्ड्यांमुळे वाढताय अपघात

घटना स्थळावरील राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांमुळे अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. या महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाढत्या अपघातांमुळे त्या मार्गाने ये-जा करणार्‍या वाहनचालक, प्रवाशांनी संताप व्यक्त केला. खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात होणाऱे अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणीही त्या भागातील नागरिक, वाहनचालकांमधून जोर धरत आहे. तर याप्रकरणी आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

तरुण तलाठ्यावर प्राणघातक हल्ला

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

राहुरी तालुक्यातील धक्कादायक घटना

उंबरे (वार्ताहर) – राहुरी तालुक्यातील कात्रड- गुंजाळे येथील तलाठी सतीश सुभाष पाडळकर (वय 35) या तरुण तलाठ्यावर चार तरुणांनी प्राणघातक हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही. घटना उंबरे-कात्रड-गुंजाळे रस्त्यावर काल मंगळवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

मध्यंतरी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यानंतर त्वरित पंचनामे करून तलाठी पाडळकर यांनी पुढील कार्यवाही केली. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांना मदतही प्राप्त झाली. त्यामुळे शेतकर्‍यांच्यावतीने त्यांचा काल सत्कार करण्यात आला. त्यानंतर ते वांबोरीमार्गे निघाले होते. गुंजाळेपासून ते 1 किमी अंतरावर आपल्या मोटारसायकलवर जात असताना, तेथे पल्सर मोटारसायकलवर दाढी असलेले दोघे उभे होते. पाडोळकर जवळ येताच, या दोघांनी त्यांना दगड मारले. त्यात एक दगड लागल्याने पाडोळकर जागीच थांबले. नेमकी हीच संधी साधून या दोन तरुणांनी त्यांच्यावर सळई आणि सत्तूरसदृश हत्याराने हल्ला केला.

ही मारहाण चालू असताना तलाठ्याने आरडाओरड केला. आवाजाच्या दिशेने काहीजण धावले. काहीजण येत असल्याचे पाहताच या हल्लेखोरांनी धूम ठोकली. पांढरी पुलाच्या दिशेनेही दोनजण त्यांच्या पाळतीवर होते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

दरम्याने तलाठी पाडळकर अचानक झालेल्या जबर हल्ल्यात बेशुध्द झाले होते. त्यांना त्वरित वांबोरी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. पण तेथे डॉक्टर नसल्याने त्यांना नगर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान घटनेची माहिती कळताच तहसीलदार शेख व अन्य तलाठी घटनास्थळी धावले. रात्री तलाठी शुध्दीवर आल्याची माहिती तहसीलदारांनी दिली. घटनेमागे काय हेतू होता, याची माहिती समजू शकली नाही.

जळके शिवारात आढळलेल्या मृत महिलेचा घातपातच

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

गळा आवळून खून; गंगापूर व नेवाशाच्या चौघा आरोपींना अटक प्रेमसंबंधांतून एका खुनाची माहिती झाल्याने ब्लॅकमेलिंग केल्याचा प्रकार

नेवासा (शहर प्रतिनिधी) – नेवासा तालुक्यातील जळके शिवारात शनिवारी आढळलेल्या अज्ञात महिलेच्या घातपाताचा संशय असलेल्या मृतदेहाप्रकरणी शवविच्छेदन अहवालात गळा दाबून खून केल्याचे स्पष्ट झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत स्थानिक गुन्हे शाखा व श्रीरामपूरच्या सायबर गुन्हे विभागाने चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींपैकी दोघे गंगापूर तालुक्यातील तर दोघे नेवासा तालुक्यातील आहेत. मयत महिलेचे नाव मंगल सोमनाथ दुसिंग असे आहे.

याबाबत माहिती अशी की नेवासा तालुक्यातील जळके खुर्द शिवारात पाटाच्या कडेला राजेंद्र जानकू सोनकांबळे यांच्या शेतालगत एका अंदाजे 35 वर्षे वयाच्या महिलेचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत पोलीस पाटील नारायण शिंदे यांच्या खबरीवरुन नेवासा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. या महिलेचा घातपात झाल्याचा संशय होता. तिच्या शवविच्छेदन अहवालानंतरच त्याबाबत स्पष्ट होणार होते. नगरच्या जिल्हा ग्रामीण रुग्णालयाकडून आलेल्या शवविच्छेदन अहवालात महिलेचा गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे पोलीस हवालदार के. आर. साळवे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा रजिस्टर फर्स्ट 748/2019 भारतीय दंड विधान कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याची माहिती प्राप्त होताच प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्यासह घटनास्थळी पाहणी करून तपासासाठी नेवासा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक तयार केले.

सदर गुन्ह्याच्या तपासात पोलीस नाईक श्री. यादव यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरुन तसेच श्रीरामपूरच्या सायबर सेलच्या मदतीचे गुन्ह्याचा तांत्रिक पद्धतीने तपास करुन आरोपी अमिन रज्जाक पठाण (वय 35) रा. बोलठाण ता. गंगापूर जि. औरंगाबाद यास ताब्यात घेतले. त्यास गुन्ह्याबात विचारपूस करता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या इतर साथीदारंची नावे रतन छबुराव थोरात (वय 28) रा. तांदूळवाडी ता. गंगापूर, सोनाली सुखदेव थोरात (वय 22) रा. तांदूळवाडी ता. गंगापूर हल्ली रा. गिडेगाव ता. नेवासा व राजू भाऊसाहेब उघाडे (वय 50) रा. गिडेगाव ता. नेवासा असे असल्याचे सांगितले.

यातील आरोपींची विचारपूस करता आरोपी क्र. 1 याचे आरोपी क्र. 4 हिच्याशी प्रेमसंबंध होते. तसेच अटक आरोपी क्र. 1, 2 व 3 यांनी 11 नोव्हेंबर 2018 रोजी यातील आरोपी सोनाली थोरात हिचा पती सुखदेव थोरात याला प्रेमसंबंधाबाबत माहिती झाल्याने त्यास जीवे ठार मारले.

सुखदेव थोरात यास मारल्याबाबत यातील मृत मंगल सोमनाथ दुसिंग हिला माहिती झाल्याने ती यातील आरोपी अमिन पठाण यास ब्लॅकमेल करुन पैसे मागत असे तिच्या पैशाच्या मागणीला कंटाळून तिला वरील आरोपींनी त्यांच्या अन्य एका फरार साथीदारासह तिला जोगेश्‍वरी-वाळुंज रस्त्यावर गळा आवळून तोंड दाबून जीवे ठार मारले व पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जळके खुर्द शिवारात आणून टाकले.

सदर आरोपींना गुन्ह्यात अटक करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्यासह हवालदार विठ्ठल गायकवाड, जयसिंग आव्हाड, कैलास साळवे, यादव कुदळे आदी पुढील तपास करत आहेत.

अटकेतील चौघे आरोपी
राजू भाऊसाहेब उघाडे (वय 50) गिडेगाव ता. नेवासा
सोनाली सुखदेव थोरात (वय 22) गिडेगाव ता. नेवासा
रतन छबुराव थोरात (वय 28) तांदूळवाडी ता. गंगापूर
अमिन रज्जाक पठाण (वय 35) बोलठाण ता. गंगापूर

बंद दाराआडची चर्चा गुलदस्त्यात

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मुंबई – 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर भाजप नेते एकनाथराव खडसे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी 40 मिनिटे चर्चा केली. या बंद दाराआड झालेल्या चर्चेनंतर खडसे यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडले.

भाजपचे सरकार असतानाही गेल्या पाच वर्षांत भाजप नेते दिवंगत गोपिनाथ मुंडे यांचे स्मारक उभारता आले नाही, अशा शब्दात खडसे यांनी हल्ला चढवला. आपण नाराज नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

एकनाथराव खडसे यांनी सोमवारी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी सुमारे पाऊण तास चर्चा केली होती. त्यानंतर मंगळवारी मुंबईत आल्यावर त्यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा केली.

या दोन्ही नेत्यांना भेटल्यावर आज त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दुसरीकडे खडसेंची नाराजी दूर करण्यासाठी भाजपने माजी अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि विनोद तावडे यांच्यावर जबाबदारी सोपवल्याने खडसे अद्यापही नाराज असल्याचं बोलले जात आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथराव खडसे म्हणाले की, आपण नाराज असल्याची बातमी चुकीची आहे. शरद पवार यांची मी जळगावमधील सिंचन प्रकल्पाविषयी चर्चा करण्यासाठी गेला होतो.

उद्धव ठाकरेंशीही त्याबाबतच चर्चा केली. तसेच 12 तारखेला गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे यांच्याकडून स्वाभिमान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे निमंत्रण देण्यासाठी आपण आलो होतो.

गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक औरंगाबाद येथे उभे राहावे यासाठी आपण जमीन उपलब्ध करुन दिली होती. मात्र स्मारक अद्याप उभे राहू शकलेले नाही. या स्मारकासाठी जास्त नाही 30 ते 40 कोटींचा खर्च आहे.

मी उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या माध्यमातून घोषणा व्हावी अशी विनंती केली असल्याची माहिती त्यांनी दिली. उद्धव ठाकरे यांनी ही मागणी मान्य केली आहे. आम्ही प्राधान्याने स्मारकासाठी निधी उपलब्ध करुन देऊ असे आश्वासन त्यांनी दिले आहे. अशी माहिती एकनाथराव खडसे यांनी दिली.

नवीन ‘माधवम’ पक्षाची चर्चा

भाजपमधील नाराज मंडळी पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, विनोद तावडे व इतर एकत्र येऊन 12 डिसेंबर रोजी माधवम पक्षाची स्थापना करणार असल्याची चर्चा भाजपमध्ये सुरु आहे. सोशल मीडियावर यासंदर्भात संदेश व्हायरल होत आहे. मात्र, खरच असा पक्ष तयार होणार का? हे 12 डिसेंबर रोजीच दिसणार आहे.

मनोहर जोशींचा बॉम्बगोळा

भाजपा आणि शिवसेना यांची विचारसरणी सारखीच असून भविष्यात भाजपा-शिवसेना एकत्र आल्यास आश्चर्य वाटायला नको, अशी प्रतिक्रिया माजी

मुख्यमंत्री व शिवसेना नेते 

मनोहर जोशी यांनी व्यक्त केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जोशींच्या या वक्तव्यावर आघाडीच्या नेत्यांची अद्याप प्रतिक्रिया येणे बाकी आहे.

केंद्रात सेनेचे तळ्यात-मळ्यात

लोकसभेत शिवसेनेने नागरिकत्व विधेयकाच्या बाजुने मतदान केल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे शिवसेनेने आपली भूमिका बदलविली असून राज्यसभेत या विधेयकाला विरोध करणार असल्याचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

बलात्काराच्या आरोपीचे श्रीरामपुरातून पलायन

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

पोलिसांची धावपळ ; काही तासांत पुन्हा ताब्यात

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – येथील ग्रामीण रुग्णालयात वैैद्यकीय तपासणीसाठी आणलेल्या आरोपीने पोलिसांना गुंगारा देऊन रुग्णालयातून बेडीसह धूम ठोकली. त्यामुळे रुग्णालयात मोठी धावपळ उडाली. रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारत आरोपी पसार झाला. मात्र सायंकाळी पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला गोंधवणी शिवारात शिताफीने पकडले.

राहुल गणेश शिंदे असे आरोपीचे नाव आहे. काल मंगळवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान तो ग्रामीण रुग्णालयातून बेड्यांसह पसार झाला. यावेळी तिघा पोलीस कर्मचार्‍यांनी त्याला वैैद्यकीय तपासणीसाठी आणले होते. तपासणी झाल्यानंतर पोलिसांना गुंगारा देत मुख्य प्रवेशद्वारातून त्याने रुग्णालयाच्या मागील बाजूने भिंतीवरून उडी मारत पळ काढला. यावेळी पोलिसांसमवेत रुग्णालय कर्मचारीही त्याच्या मागे पळाले. शिरसगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत तो पळाला.

यानंतर थोड्याच वेळात पोलिसांची कुमक त्याठिकाणी दाखल झाली. शहरातील खिलारी वस्ती भागात नुकताच एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. या घटनेतील तो आरोपी आहे. त्याच्यावर प्रारंभी मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला गेला. त्यानंतर बलात्काराचाही गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिसांना विचारणा केली असता आरोपी पळाल्याच्या घटनेला त्यांनी दुजोरा दिला होता.

दरम्यान आरोपी पळून गेल्यानंतर श्रीरामपूर पोलिसांनी तपास मोहीम राबवून गोंधवणी शिवारात आरोपीला जेरबंद केले असल्याची माहिती तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांनी दिली.

प्रधानमंत्री मातृवंदना नोंदणीत धुळे जिल्हा राज्यात दुसरा

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

धुळे  – 

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या लाभार्थी नोंदणीत धुळे जिल्हा राज्यात दुसर्‍या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र महिलांनी आरोग्य विभागाकडे तत्काळ नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.

माता व बालकांच्या आरोग्यात सुधारणा होवून माता व बालमृत्यू नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या महिला व बालविकास विभागातर्फे प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबविण्यात येत आहे.

प्रथमत: गर्भवती महिला व स्तनदा माता ज्यांची गर्भधारणा 1 जानेवारी 2017 रोजी अथवा त्यानंतर झाली असेल अशा पात्र महिलांना या योजनेचा लाभ पहिल्या जीवित अपत्यासाठी दिला जातो. या योजनेंतर्गत तीन टप्प्यात पाच हजार रुपयांचे अनुदान थेट लाभार्थ्याच्या बचत खात्यात जमा केले जाते.

पहिल्या हप्त्यासाठी लाभार्थी महिलेला मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून 100 दिवसांच्या आत गर्भधारणा नोंदणी करणे आवश्यक आहे. दुसरा हप्ता गर्भधारणेच्या सहा महिन्यानंतर प्रसूतीपूर्व तपासणी केल्यास आणि तिसरा हप्ता प्रसूतीनंतर झालेल्या अपत्याची जन्म नोंदणी व बालकास संपूर्ण लसीकरण व व त्या अनुषांगिक लसीकरणाचा पहिला खुराक दिल्यानंतर लाभार्थ्याच्या आधार लिंक बँक खात्यात जमा केला जातो.

जिल्ह्यात 2 ते 8 डिसेंबर 2019 या कालावधीत मातृवंदना सप्ताह राबविण्यात आला. एकूण 28 हजार 403 पैकी 26 हजार 988 लाभार्थ्यांची नोंदणी झाली. त्यानुसार नोंदणीचे 95 टक्के काम पूर्ण झाले. नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांपैकी 23 हजार 808 लाभार्थ्यांना 10 कोटी 66 लाख 31 हजार रुपयांचे अनुदान ऑनलाइन पध्दतीने वितरीत करण्यात आले. उर्वरित लाभार्थ्यांच्या नोंदणीसाठी आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.

धुळे जिल्ह्यातील सर्व पात्र प्रथम खेपेच्या गर्भवती मातांनी आरोग्य विभागातील आशा, एएनएम, कर्मचार्‍यांकडे त्वरीत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी केले आहे.

श्री क्षेत्र देवगड येथे आज दत्तजयंती सोहळा

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

जय्यत तयारी; सोहळा पाहण्यासाठी मोठ्या पडद्यांची व्यवस्था

देवगड फाटा (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे आज 11 डिसेंबर रोजी दत्तजयंती निमित्त सायंकाळी सहा वाजता लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री दत्त जन्म सोहळा होणार असून सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे.

श्री क्षेत्र देवगड गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते व साधुसंत, राजकीय नेतेमंडळी, प्रशासकीय अधिकारी व लाखो भक्तांच्या उपस्थित विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. देवगड येथे दत्तमंदिर प्रांगणात दत्तजयंती सोहळा होणार आहे. सोहळा सर्वांना पाहता यावा यासाठी मोठ्या पडद्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

यात्रा काळात सर्व ठिकाणी बंदोबस्त लावण्याची तयारी केली आहे. तसेच अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी सांगितले. एसटी महामंडळाच्या वतीने नगर, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर, गंगापूर, पैठण, औरंगाबाद या आगारांतून अतिरिक्त बस गाड्या सोडण्यात येणार आहेत.

भास्करगिरी महाराज, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक रणजित डेरे व यात्रा समिती सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे. एसटी पार्किंग, मोटारसायकल पार्किंग, चारचाकी पार्किंग व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आली आहे.

काही खासगी जागा असणार्‍या शेतकर्‍यांना पार्किंग नियमावली सांगून पार्किंगचे नियोजन करण्यास सांगितले आहे. श्री क्षेत्र देवगडचा दत्तजयंती उत्सव हा सर्वात मोठा उत्सव असतो. या सप्ताह काळात राज्य भरातून लाखो भाविक हजेरी लावतात. विशेषतः दत्तजयंतीच्या दिवशी लाखो भाविक दर्शन घेतात. 5 डिसेंबरपासून दत्त जयंती महोत्सव सुरु आहे. सप्ताह काळात विविध धार्मिक कार्यक्रम होतात. सोहळ्याची सांगता उद्या गुरुवार 12 डिसेंबर रोजी सकाळी महंत भास्करगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे.

सकाळी क्षेत्रप्रदक्षिणा
समर्थ किसनगिरी बाबांच्या प्रतिमा व पादुका असलेल्या पालखीची मिरवणूक महंत भास्करगिरी महाराज व हजारो भाविकांच्या उपस्थितीत देवगड येथे सकाळी 7 वाजता क्षेत्र प्रदक्षिणा करणार आहे. दरम्यान काल क्षेत्र प्रदक्षिणेसाठी पालखी बनवण्यात आली.

धुळ्यात कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा, 21 जनावरांची सुटका

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

धुळे  – 

शहरातील गल्ली नंबर 6, महादेवपुरा परिसरातील अवैधरीत्या सुरू असलेल्या कत्तलखान्यावर अतिरिक्त पोलिस अधीक्षकांच्या पथकाने काल रात्री छापा टाकला.

त्यात त्यांना 110 किलो मांस जप्त करण्यात आले. तर 25  जनावरांची सुटका करण्यात आली. तेथून मांससह चाकू, सुरे, कुर्‍हाड, वजन काटा असा एकूण 88 हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे

माधवपुरा परिसरात राहणारा नियाज अहमद अन्सारी हा गेल्या काही दिवसापासून अवैधरित्या कत्तलखाना चालवत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार काल रात्री अकरा वाजता अप्पर पोलीस अधीक्षक राजु भुजबळ, एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक उगले, सैय्यद, सहारे, हे.कॉ पाटील, बापू कोकणी, शोयब बेग, आतीफ शेख यांनी अन्सारीच्या घरावर छापा टाकला.

तेव्हा 110 किलो मांस व 25 जनावर व इतर साहित्य आढळून आले. याप्रकरणी नियाज अन्सारी याच्यासह तीन साथीदाराविरूध्द आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.