Thursday, May 7, 2026
Home Blog Page 13303

उड्डाणपुलासाठी भूसंपादनाची प्रक्रिया दोन आठवड्यांत पूर्ण करा

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे आदेश : खा. डॉ. सुजय विखे यांच्या पुढाकाराने दिल्लीत बैठक

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातील उड्डाणपुलाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या संरक्षण विभागाच्या जागेच्या भूसंपादनाची प्रक्रीया तातडीने सुरू करण्यास केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी हिरवा कंदील दिला असून येत्या दोन आठवड्यात सर्व प्रक्रीया पूर्ण करण्याचे निर्देश अधिकार्‍यांना दिले असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

संसदेच्या सुरू असलेल्या अधिवेशना दरम्यान खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगर शहरातील उड्डाणपुलाच्या व अन्य राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा पाठपुरावा सुरू ठेवला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन नगर शहराच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाकडे त्यांनी लक्ष वेधले होते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन खा. डॉ. विखे यांनी नगर शहरातील उड्डाणपुलासाठी आवश्यक असलेल्या संरक्षण विभागाच्या जमिनीच्या भूसंपादनाचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती.

बुधवारी रक्षा भवन येथे उड्डाणपुला बरोबरच नगर बाह्यवळण रस्ता आणि नगर-करमाळा-सोलापूर या मार्गाचा प्रश्न चर्चिला गेला. या तिन्ही मार्गाचे काम सरंक्षण विभागाच्या जमिनीच्या भूसंपादनाअभावी रखडल्याचे खा. डॉ. विखे यांनी निदर्शनास आणून दिले.संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बैठकीस उपस्थित असलेल्या संरक्षण विभागाच्या व जमीन भूसंपादनाच्या विषयाशी संबंधित असलेल्या अधिकार्‍यांकडून माहिती जाणून घेतल्यानंतर या सर्व जमिनीच्या भूसंपादन विषयास मंजुरी दिली. याची कार्यवाही दोन आठवड्यातच पूर्ण करण्याचे मंत्र्यानी सूचित केले असल्याचे खा. डॉ. विखे यांनी सांगितले.

कामातील अडथळा दूर
भूसंपादनाच्या कारणामुळे गेली अनेक वर्षे नगर शहरातील उड्डाणपुलाचे काम रखडले होते.सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे या कामातील अडथळा दूर झाला असून यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे खा. डॉ. विखे नगरच्या जनतेच्या वतीने आभार मानतो.
– खा. डॉ. सुजय विखे पाटील

मी भाजपा सोडते आहे, या वावड्या कुठून आल्या – पंकजा

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

बीड । वृत्तसंस्था

मी भाजपा सोडते आहे या वावड्या कुठून आल्या? असा प्रश्न भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी विचारला आहे. मी नाराज नाही असेही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. इथे सगळे आम्ही एकत्र काम केलेले लोक आहोत.

त्यांच्यावर काय नाराज व्हायचं? असाही प्रश्न पंकजा मुंडे यांनी विचारला आहे. एवढेच नाही तर मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री असे काहीही म्हटले नव्हते. अकारण नसताना या सगळ्या गोष्टी पसरवल्या गेल्या असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

पंकजा मुंडे यांनी मध्यंतरीच्या काळात एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये पंकजा मुंडे यांनी भगवान गडावर मोठी घोषणा करणार असल्याचे संकेत दिले होते.

आता 12 डिसेंबरच्या म्हणजे गुरुवारच्या एक दिवस आधी पंकजा मुंडे यांनी मी भाजपा सोडणार या वावड्या कुणी उठवल्या असा प्रश्न त्यांनी विचारला. तसंच जे काही अंदाज लढवण्यात आले ते मीडियाने लढवले. मी त्याकडे शांतपणे पाहात होते असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

मी पुन्हा येईनवरही भाष्य

‘मी पुन्हा येईन’ ही घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्यावर बरीच टीका झाली. या घोषणेतून कुठेतरी गर्व डोकावतो अशा स्वरुपाची टीका करण्यात आली. तसंच या घोषणेची खिल्लीही उडवण्यात आली. त्याबाबत विचारण्यात

आलं असता पंकजा मुंडे म्हणाल्या की,  मी पुन्हा येईन ही घोषणा निवडणूक प्रचाराचा एक भाग होती. त्यात गर्व कुठेही डोकावलेला आम्ही तरी पाहिला नाही. आता लोक या कँपेनची खिल्ली उडवली जाते आहे. पराभव झाला की अशा घोषणांची खिल्ली उडतेच  असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष,उपाध्यक्ष पदासाठी वरिष्ठांकडे फिल्डिंग

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

जळगाव – 

जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष पदासाठी भाजपच्या सदस्यामध्ये रस्सीखेच सुरु झालेली आहे. महिला सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर महिला  सदस्यांची नावे आता चर्चेत येत आहेत.

भाजपामधील काही सदस्यांनी वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेत फिल्डींग लावली जात आहे. मात्र, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे आणि माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सुचविलेल्या उमेदवारांना जिल्हापरिषदेत सत्तेचे सोपान सर करता येणार आहे. तर दुसरीकडे राज्यात सत्ता परिवर्तनचा पॅटर्न जिल्हापरिषदेतही यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडीच्या गटनेत्यांची मोर्चे बांधणी सुरु आहे.  त्यामुळे राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मिनीमंत्रालय संबोधल्या जाणार्‍या  जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी भाजपच्या सदस्यांमध्ये दावेदारी सुरू झालेली आहे. त्यादृष्टीने एक गट भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथराव खडसे आणि दसरा गट माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे फिल्डींग लावत असल्याच्या हालचाली गतीमान झालेल्या असल्याचे चित्र दिसून येत आहे.

जिल्हापरिषदेतील भाजपच्या गटनेत्याकडून नाराज सदस्यांची मनधरणी करुन अतिरिक्त कामे देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, यापूर्वीही सत्ताधारी पक्षातील सदस्यांना निधी वाटपात डावलण्यात आले असून या नाराजीचा उद्रेक या निवडीत उमटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

त्यामुळे भाजप सदस्यांना एकसंघ राहण्याचे मोठे आव्हान भाजपच्या सदस्यांसह गटनेत्यांना पेलावे लागणार आहे. दरम्यान, भाजपमध्ये दोन गट पडले असून एक गट खडसे तर दुसरा गट महाजन यांना मानणारा आहे.

त्यामुळे कोणत्या गटाचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होणार याविषयी चर्चांना उधान आले आहे. भाजपच्या एका गटाकडून गुप्त बैठक घेऊन वेगळी मोट बांधण्याच्या हालचाली होत असल्याची चर्चा आहे.

जिल्हा परिषदेवर भाजप पुन्हा आपले वर्चस्व ठेवण्यात यशस्वी होणार की महाविकास आघाडीच्या माध्यमातून परिवर्तन घडणार याविषयी 21 डिसेंबर रोजी चित्र स्पष्ट होईल.

महिलांच्या मदतीसाठी पोलीसदादांची हेल्पलाईन

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

जळगाव  – 

शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींसह अन्य तरुणी व महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस दलातर्फे हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. मोबाइल क्रमांक  9860501091) व जिल्ह्यातील नागरिकांकरिता आपत्कालीन, तत्काळ सेवेकरिता मोबाइल क्रमांक  8956715100  व व्हाट्सअप क्रमांक  9422210701, पोलीस नियंत्रण कक्ष (जळगाव)येथे कार्यान्वित आहेत.

विद्यार्थिनी, महिलांच्या सुरक्षिततेसाठी तसेच त्यांना तत्काळ पोलीस मदत मिळावी, म्हणून जिल्ह्यात महिला पोलिसांचे निर्भया पथक , दामिनी पथक कार्यान्वित आहेत. या पथकासाठी स्वतंत्र वाहन असून त्यात वाहनचालक, पोलीस अधिकारी व कर्मचारीही महिलाच आहेत.

शहरातील शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक ठिकाणी हे पथक सकाळी 9 ते रात्री 9 दरम्यान  गस्त घालत असतात. पोलिसांकडे विद्यार्थिनी, तरुणी, महिलांच्या तक्रारी आल्यास तातडीने घटनास्थळी पोहचून मदत केली जाते. पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या संकल्पनेतून पोलीस नियंत्रण कक्ष जळगाव येथे  हेल्पलाइन मोबाइल क्रमांकाची सुविधा  कार्यान्वित केली.

मोबाइल क्रमांक 9860501091 विद्यार्थिनींसह  महिलांच्या सुरक्षिततेसाठी तसेच त्यांना तत्काळ मदतीसाठी सुविधा आहे. मोबाइल क्रमांक 8956715100 जिल्ह्यातील नागरिकांकरिता आपत्कालीन, तात्काळ सेवेकरिता मोबाइल क्रमांक 9860501091 जिल्ह्यातील नागरिकांकरिता आपत्कालीन सेवेसाठी ही सोय आहे.

प्रत्येक पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी हे त्या- त्या पोलीस ठाण्यांतर्गत शाळा, महाविद्यालय यांना दररोज भेट देऊन  प्राचार्य, मुख्याध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचे समवेत सुरक्षिततेबाबत चर्चा करणार आहेत.

शाळा व महाविद्यालयात घडणार्‍या विविध गुन्हेगारी घटना ( रॅगिंग , अंमली पदार्थ सेवन , सायबर गुन्हे , मुलींची छेडखानी आदी ) वर वेळेत नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस व विद्यार्थी नाते तयार करण्यासाठी पोलीस स्टेशन स्तरावर  पोलीस काका, पोलीस दीदी ही योजना राबविली आहे.

वेगळ्या कंपन्या, आयटी हब  व महत्त्वाच्या ठिकाणी जिथे रात्री उशिरापर्यंत महिला काम करतात, अशा महिलांना सुरक्षिततेची भावना प्रदान करण्यासाठी  र्इीववू उेि  संकल्पना पोलीस स्टेशन स्तरावर राबविली आहे.

महावीजनिर्मिती केंद्रातील बजेट निम्म्यावर

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

प्रकाश  तायडे : दीपनगर, ता.भुसावळ । 

राज्यातील महाविजनिर्मिती केंद्रातील यंदाचा बजेट हा निम्यावर आल्याने वीजनिर्मितीवर याचा मोठा परीणाम होणार असल्याचे चित्र आहे. त्याच प्रमाणे या वीजनिर्मिती केंद्रावर अवलंबून असलेल्या कंत्राटदार व मजूरांवर ही उपासमारीचे संकट कोसळणार आहे.

दीपनगर केंद्राला सन 2018 मध्ये संच क्रमांक 4 आणि 5 साठी वार्षिक 105 कोटी रुपयांचा तर जूना 210 संच क्रमांक 3 करीता 19 कोटींचा बजेट देण्यात आला होता. आता या वर्षी संच क्रमांक 4 आणि 5 साठी फक्त 67 कोटी रुपयांचा बजेट मुख्यालयाकडून मंजूर झाला आहे. तब्बल 38 कोटी रुपयांचा बजेट कमी केला. तर जुन्या 210 संचा करीता 14  कोटी रुपयांचा बजेट मंजूर झाला आहे. असा एकुण 43 कोटींचा एका वर्षात बजेट कमी केल्याने याचा फटका सहाजिकच वीजनिर्मितीवर होणार आहे.

येथील वीजनिर्मिती केंद्रात सद्या 500 मेगावॉटचे दोन संच कार्यान्वित आहे. तर 210 मेगावॉटचे संच क्रमांक 2 आणि 3 बंद आहे. यातील संच क्र.दोन कायमचा बंद करण्यात आला आहे.

तिसरा संच विजेची मागणी वाढली तरच सुरु होतो. बजेट मध्ये मोठ्या प्रमाणत कपात झाल्यामुळे संच चालवावे कसे म्हणून मुख्यअभियंता यांनी प्रत्येक विभागाच्या वार्षिक कामात 20 टक्के कपात करण्याचे आदेश दिले. त्याच प्रमाणे अत्यावश्यक कामे करावे असे सबंधित विभागाचे अधिकारी यांना सुचना दिल्या जाते आहे. मात्र याचा परिणाम कामगारांवर होत आहे.

या ठिकाणी जवळपास दोनशेच्यावर कंत्राटदार नोंदणीकत आहेत. त्यांच्याकडे परीसरातील जवळपास दोन ते तीन हजार कंत्राटी कामगार काम करतात. आधीच संच क्रमांक 1,2,3 बंद असल्याने अनेक कंत्राटी कामगार घरी बसले आहेत. आता अजून बजेट कमी करण्यात आला असल्याने अजून कंत्राटी कामगार आपोआपच कमी होतील. त्यांच्यासह कंत्राटदारांवर उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.

एमईआरसी ने दिलेल्या आदेशाचे पालन आम्ही करीत आहे. त्यांनी ठरवून दिलेल्या बजेटमधे वीजनिर्मितीचे संच पुर्ण क्षमतेने कार्यान्वित  आहे. आमच्याकडे जेवढा बजेट उपलब्ध आहेत. त्यामध्ये चांगले काम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुख्यालयाकडे बजेट वाढवून मिळवण्यासाठी विनंती केली आहे.

– पंकज सपाटे

मुख्यअभियंता दीपनगर विज निर्मिती प्रकल्प.

भवरलालजी: जैन महान शैक्षणिक तत्वज्ञ

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

‘कृषी, शिक्षण आणि उद्योग

या क्षेत्राला आपण नवसंजीवनी दिली

देशाभिमान राखताना आपण

ग्रामीण भागात जनतेला दूरदृष्टी दिली…’

भवरलाल जैन यांच्या कृषि संशोधन व शेक्षणिक कार्यामध्ये आधिक तंत्रज्ञान, नवीन पीक पद्धती, ठिबक सिंचन पद्धत, उती-संवर्धन यामुळे पाण्याची व विजेची बचत होऊन मालाचा दर्जा सुधारून गुणवत्ता वाढल्याने मालाची निर्यात होऊन शेतकर्‍यांची आर्थिक उन्नती झाली.

भवरलाल जैन यांनी शेतकर्‍यांना स्वयंरिद्ध बनविले. पाण्याचे व्यवस्थापन व नियोजन केले. ठिबकच्या माध्यातून काटकसरीने पाणी वापर पर्यारणाचे संरक्षण व संवर्धन केले. भवरलालजी जैन यांनी जळगाव जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले.

कृषी तज्ज्ञाबरोबर ते शिक्षणतज्ज्ञ ही होते. महान तत्वज्ञ म्हणून मला त्यांची प्रचिती आली. त्यांचे शिक्षणा विषयीचे मत आजच्या काळाची गरज आहे त्यांच्या 12 डिसेंबर जन्मदिनाच्या औचित्याने त्यांचे केलेले हे स्मरण.

आज शिक्षणाचा ग्रंथाच्या जगाशी संपर्क तुटला आहे. श्रमाशी शिक्षणाचा संबंध राहिलेला नाही, श्रमाने आत्मोन्नती आणि आत्मशुद्धी होते. या थोर विचारवंताच्या श्रद्धांना आजच्या शिक्षण क्षेत्रात थारा नाही. चांगला माणूस तयार करण्याच्या कामापासून शिक्षण-क्षेत्र दूर गेलेले आहे. श्रमप्रतिष्ठेला महत्त्व देणारी प्रणालीमध्ये सुनियोजित कार्यक्रम केला आहे. शिकण्यातील फक्त नोकरदार तयार न करता नोकरी देणारा मालक तयार करणे. हे भवरलालजी स्वप्न होते व ते त्यांनी यशस्वी करून दाखविले.

नव्या पिढीच्या पालकांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, सर्व विद्यार्थ्यांच्या जीवनात शिस्त, स्वावलंबन, निसर्ग देश, मानव, पक्षी व प्राणी, यांच्या बद्दल प्रेम निर्माण होण्यासाठी ते स्वयंपूर्ण होण्यासाठी त्यांनी अनुभूतीची स्थापना केली होती. शिक्षक हा शिल्पकार असतो आणि तो शिल्पातून विद्यार्थ्यांची मूर्ती आकाराला आणतो उत्कृष्ट शिक्षकाला प्रत्येक विद्यार्थ्यात एक देखणे शिल्प दिसते.

शिक्षकांचे ध्येय हे राष्ट्र बांधणीचे असते. राष्ट्राची बांधणी हे देशाच्या आदर्श आणि देश प्रेमी नागरिकांवर अवलंबून असते आपल्या विद्यार्थ्यांमधून असे देश प्रेमी नागरिक घडविणे हे शिक्षकाचे काम असते. शिक्षकांचे विद्यार्थ्यावर प्रेम नसणे हा शिक्षणातला सर्वात मोठा अडथळा आहे. शिक्षणाची आवड या निकषावरच शिक्षकांची निवड व्हायला पाहिजे शिक्षक हे समर्पित व सहनशीलता असणारे हवेत जो शिक्षक विद्यार्थ्यांना विषयाची ओळख करून देतो, त्याला विषयाची गोडी लावतो, आणि स्वतंत्रपणे तो विषय समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेम करतो व त्याच्या सुप्तगुणांना वाव देतो तोच खरा शिक्षक भारताला जर शक्तिशाली आणि सामर्थ्यवान राष्ट्र बनवायचे असेल शिक्षण हेच प्रभावी साधन आहे. त्यासाठी आपली शिक्षण व्यवस्था उत्कृष्ट असायला पाहिजे.

भवरलाल जैन यांच्या साहित्यावर मूल्यांचा जबरदस्त प्रभाव आहे. समाजातील ढासळत्या मूल्यांमुळे त्यांचे संवेदनशील मन अस्वस्थ होते. या अस्वस्थपणाला त्यांनी आपल्या लिखाणाद्वारे मोकळी वाट करून दिलेली आहे 1986 च्या नवीन शैक्षणिक धोरण आणि सांगितलेल्या 10 मूल्य विषयक विचारांचा शोध भवरलाल जैन यांच्या साहित्यात आढळतो.

शैक्षणिकमुल्य  वैज्ञानिक दृष्टिकोन, राष्ट्रभक्ती, श्रमप्रतिष्ठा, राष्ट्रप्रेम, वक्तशीरपणा सर्वधर्मसमभाव, नीटनेटकेपणा, स्त्री-पुरुष समानता संवेदनशीलता सौजन्यशीलता. शिक्षक हा भावनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा कसा विकास होईल त्याच्या अंगी माणुसकी कशी रुजेल आणि डोक्याचा वापर करण्यापेक्षा मनाचा आणि हृदयाचा उपयोग कसा करू शकतील.  याची उत्तरे देणार्‍या पद्धतीचे शिक्षण विद्यार्थ्यांना देणे ही काळाची गरज आहे. प्रथम माणूस घडवा त्याला सुशिक्षित सुसंस्कातीत करा, असे झाले तर राष्ट्र आपोआपच घडेल शिक्षण हे भवितव्याची आणि भविष्याची गुंतवणूक असते. मानवी स्वभावाचे आणि चारित्र्याची बधणे शालेय जीवनातच मिळतात.

प्रत्यक्ष कृतीवर आधारितच भविष्याशी निगडीत शिक्षण देणारी शिक्षक पाहिजेत.भवरलाल जैन यांनी आपल्या लेखनातून व व्याख्यानांतून समाज प्रबोधनाची ज्योत सतत प्रज्वलित ठेवलेले आहे. त्यांचे जीवन कार्य आणि विचार प्रेरणादायी असून ते समर्पित सेवेची उदारणच नाही तर त्यांनी केलेले जीवन समर्पण आणि त्यातून निर्माण झालेला सामाजिकता जीवनाला प्रेरणादायक आहे.

महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात पडला होता. गांधीतीर्थ निर्मिती म्हणजे भवरलाल जैन यांनी जपलेल्या दीर्घकालीन स्वप्नाची पूर्तता हे महात्मा गांधीजींच्या सत्य अहिंसा प्रेम या विचारांनी नवसंजीवनी देत नव्या पिढीसाठी गांधी विचारांना अजमर करण्याचा प्रयत्न त्यांनी गांधीजींच्या भव्य वस्तू आणि इतिहासिक वास्तूच्या माध्यमातून करण्यात आला. आज 12 डिसेंबर हा पद्मश्री भवरलाल जैन यांचा जन्मदिन त्यांच्या पवित्र स्मृतिना त्रिवार अभिवादन.

सामाजिक आणि संवेदनषीलता

आपण आयुष्यभर जपत आलात.

या वरूनच भारताचा यषस्वी आधारस्तंभ

आपण क्षणोक्षणी घडवत आतात….

(लेखिका प्राचार्या  डॉ.  संगीता. आर. बाफणा यांनी भवरलाल जैन यांच्या कार्य, व्यक्तिमत्त्वावर पीएच. डी. केलेली आहे.)

डॉ. संगीता बाफणा

फुले मार्केट हॉकर्सने केले मनपासमोरच ठिय्या आंदोलन

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

जळगाव – 

शहरातील फुले मार्केट हॉकर्स बांधवांनी मनपासमोर ठिय्या मांडला. यावेळी हॉकर्स मोठ्या संख्येने मनपा प्रांगणात उपस्थित होते. यावेळी हॉकर्स बांधवांनी आयुक्तांकडे आपल्या मागण्यांचे निवेदनही सादर केले.

फेरीवाला धारणानुसार आम्हाला कायमस्वरुपी व्यवसाय करण्यास परवानगी मिळावी असेही या हॉकर्सचे म्हणणे आहे. त्यानंतर मात्र अद्याप तीन आठवडे उलटल्यानंतरही फुले मार्केट हॉकर्स बांधवांना तेथे परत बसू दिले जात नसल्याने हॉकर्स बांधवांनी काल बुधवारी मनपात मोठ्या संख्येेने ठिय्या मांडला होता.

तत्पूर्वी काल सकाळी फुले मार्केटमध्ये जे हॉकर्स बजावल्यानंतर ही पुन्हा बसले होते अशांवर कारवाई करीत त्यांचे साहित्य मनपा अतिक्रमण विभागाने जप्त केले होते. तसेच बी. जे. मार्केटमधूनही हॉकर्स बांधवांवर मनपा अतिक्रमण विभागाने कारवाई करीत तेथील साहित्य जप्त करुन आणले होते.

यानंतर मात्र दोघा मार्केटमधील हॉकर्स धारकांंनी काल मनपात येवून ठिय्या मांडला होता.  गेल्या 15 दिवसापासून आमचा रोजगार बुडाल्याचे हॉकर्स बांधवांनी बोलून दाखविले.

आयुक्तांना दिले निवेदन

तत्पूर्वी हॉकर्स बांधवांनी तास दीड तास ठिय्या मांडल्यानंतर हॉकर्सनी आयुक्तांना निवेदन दिले. आम्हाला बसायला परवानगी द्या अशी मागणी पुन्हा हॉकर्स नी दिले. यावेळी हॉकर्सचे एक शिष्टमंडळ आयुक्तांच्या भेटीस गेेले होते. यावेळी नंदू भावसार, मनोज चौधरी, रविंद्र चौधरी, गोपाल कटारीया, गोविंद कुंभार, राजेंद्र नन्नवरे व इतर हॉकर्स उपस्थित होते.

दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो…; दत्तजयंती उत्सव साजरा; एकमुखी दत्तमंदिरात भाविकांची रीघ

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । प्रतिनिधी

श्री दत्तजयंतीनिमित्त बुधवारी शहरातील वेगवेगळ्या दत्तमंदिरांत ‘दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो, दिगंबरा…दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या जयघोषात दत्तजयंती उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

गोदाघाटावरील प्रसिद्ध एकमुखी दत्तमंदिर, ढगे महाराज समाधी मंदिर, शिंगाडा तलाव येथील दत्तमंदिर, राष्ट्र संत जनार्दन स्वामी आश्रमासह सर्वच दत्तमंदिरांमध्ये दर्शनासाठी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती. लघुरुद्राभिषेक, श्री दत्त जन्म सोहळा, महाआरतीसह विविध कार्यक्रम यावेळी घेण्यात आले.

घरोघरी सप्ताह, मंदिरांमधील पारायणाची सांगतादेखील झाली. दत्तजयंती उत्सवानिमित्त शहरातील विविध भागातील दत्तमंदिरांवर आकर्षक सजावटीसह विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सकाळपासून या मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

जयंती उत्सव, आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे भाविकांना वाटप करण्यात आले. तसेच शहरातील व जिल्ह्यातील काही पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या दत्तमंदिरातदेखील उत्सव साजरा करण्यात आला.

अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दत्तात्रय यांचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला असल्याचा उल्लेख विविध ग्रंथांत आहे. दत्ताच्या मंदिरांत गुरुचरित्राचे पायायण, भजन, लघुरुद्राभिषेक, दत्त जन्म सोहळा महाआरती, पालखी मिरवणूक आदी कार्यक्रम झाले. यानिमित्त ठिकठिकाणी श्री गुरुचरित्र पारायण सप्ताहदेखील घेण्यात आला.

दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी होती. आठ दिवसांपासून मंदिर 24 तास खुले आहे. अखंड हरिनाम सप्ताहाचा दत्तजयंतीला समारोप झाला.

– मयूर बर्वे, मुख्य पुजारी, एकमुखी दत्तमंदिर

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नवी दिल्ली – संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेले नागरिकत्व दुरुस्ती विधेयक प्रचंड विरोधानंतरही लोकसभेपाठोपाठ अखेर राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे. विधेयकाच्या बाजूने 117 मते पडली तर विधेयकाविरोधात 92 मते पडली.

लोकसभेत विधेयकाच्या बाजूने मतदान करणार्‍या शिवसेनेने राज्यसभेत मतदानावेळी सभात्याग करून आपला विरोध दर्शविला आहे. राज्यसभेतही हे विधेयक मंजूर झाल्याने देशातील सर्व राज्यांमध्ये हे विधेयक लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मात्र अनुच्छेद 370 नंतर एक महत्त्वाचा निर्णय मोदी सरकारने राज्यसभेत मान्य केला आहे. भाजपाचा हा एक महत्त्वाचा संकल्प होता जो पूर्ण झाला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही आज दुपारी 12 वाजता हे विधेयक मांडलं. या विधेयकावर 6 तासाहून अधिक वेळ चर्चा केल्यानंतर रात्री 8 नंतर मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. आधी चिकित्सा समितीकडे विधेयक पाठवण्यासाठी मतदान घेण्यात आले आणि बहुमताने राज्यसभेने ही मागणी फेटाळून लावली.

पंधराशे रुपयांची लाच घेताना तलाठी जाळ्यात

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नांदगाव | प्रतिनिधी 

पंधराशे रूपयांची लाच घेतांना तलाठी राजकुमार उत्तमराव देशमुख याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. नांदगाव तालुक्यातील मांडवड येथे तलाठी म्हणून कार्यरत असणाऱ्या देशमुख याने शेतीच्या ड उताऱ्यात फेरफार करण्याच्या बदल्यात पंधराशे रुपयांची लाच फिर्यादी कडे मागितली होती.

त्यानंतर तक्रारदाराने याबाबतची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली होती. ठरल्याप्रमाणे नांदगाव शहरातील रेल्वे फाटकाजवळ लाचेचे पंधराशे रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुनील पाटिल, पोलिस हवालदार सुभाष हांडगे, पोलिस नाईक राजेंद्र गीते यांच्या पथकाने देशमुखला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून पंधराशे रुपये हस्तगत करण्यात आले. याप्रकरणी नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वी सापळा रचला.

जाळ्यात आलेल्या तलाठींचे नोकरीचे अवघी चार वर्षे शिल्लक आहेत. दुसऱ्यांदा त्यांना लाच प्रकरणात ताब्यात घेतल्याची माहिती प्रतिनिधीकडून मिळाली आहे. लाचलुचपतच्या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.