Saturday, May 9, 2026
Home Blog Page 13304

त्र्यंबकेश्वर: हरसूल भागात ८०व्या वाढदिवसानिमित्त ८० पातळाचे वाटप

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

हरसूल l प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ८० वा. वाढदिवस त्र्यंबकेश्वर तालुक्यात विविध ठिकाणी साजरा करण्यात आला. तसेच हरसूल भागात शरद पवार यांच्या ८०व्या. वाढदिवसानिमित्त फळे व गोरगरिबांना ८० पातळाचे (वस्त्र) वाटप करण्यात आले.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथील ग्रामीण रुग्णालयात शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना केळी, सफरचंद, चिकू आदी फळांचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बहिरु मूळाने, जिल्हा उपाध्यक्ष अरुण मेढे, माजी त्र्यंबकेश्वर पंचायत समिती सभापती मोतीराम दिवे, सामजिक कार्यकर्त्यां भारती भोये, महिला तालुकाध्यक्षा भारती खिरारी, हरसुलच्या सरपंच सविता गावित आदींच्या हस्ते रुग्णासह नातेवाईकांना वाटप करण्यात आले. तसेच ८० व्या. वाढदिवसानिमित्त ८० पातळाचे (वस्त्र) हरसूल जवळील वैतागवाडी, पवारपाडा, अंबोली, पिंपरी (त्र्यंबक) येथे मान्यवरांनी वाटप केले. तसेच त्र्यंबकेश्वर येथील तुपादेवी फाटा आधारतीर्थ याठिकाणी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

या प्रसंगी हरसूल रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी चेतन ठोबरे, गोकुळ बत्तासे, योगेश देवरगावकर, हरसूल ग्रामपंचायत सदस्य अनिल बोरसे, शकील पठाण, सलमा शेख, छाया पवार, संजय आहेर, छबिलदास बाविस्कर, रमेश हिलीम, उषा सकटे, संजू भोये, विनया वाघ, कुलकर्णी, अर्चना खाडे आदींसह रुग्ण, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शरद पवार यांचा जन्मदिवस बळीराजा कृतज्ञता दिन म्हणून साजरा

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

 कोटी पन्नास लाखाचा कृतज्ञता कोष प्रदान; शुभेच्छा देण्यासाठी लोटला कार्यकर्त्यांचा जनसागर

मुंबई:

आपली बांधिलकी शेवटच्या माणसाशी, समाजातील तरुण पिढीशी आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी काम करायला हवं असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. शरद पवारांच्या ७९व्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बळीराजा कृतज्ञता दिन साजरा करण्यात आला. यावेळी अभीष्टचिंतन कार्यक्रमात त्यांनी समर्थकांशी संवाद साधला.

“माझा जन्मदिवस माझ्या लक्षात राहत नाही. परंतु माझ्या आईचा जन्मदिवस म्हणून लक्षात राहतो. माझ्या पत्नीचा जन्मदिवस १३ डिसेंबर आहे. ज्येष्ठ अभिनेते व माझे जवळचे मित्र दिलीपकुमार यांचा ११ डिसेंबर आहे,” याची आठवण शरद पवार यांनी सांगितली.

“माझ्या आईने कष्टाने आम्हाला शिकवलं. १९३६ साली लोकल बोर्डावर निवडून आली. महिलांसाठी काम केले. मुलींचे शिक्षण व्हावे असा तिचा आग्रह होता,” अशी माहिती शरद पवार यांनी सभागृहात दिली.

“सार्वजनिक जीवनात यश मिळते. संकटे येतात. त्यावेळी दोन वर्ग माझ्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे माझी आई आणि दुसरा माझा सर्वसामान्य माणूस,” आहे असेही शरद पवार म्हणाले. “आज जो धनादेश दिला तो वेलफेअर ट्रस्टच्या वतीने गरजू आणि संकटकाळात सापडलेल्या शेतकर्‍यांसाठी दिला जाईल.

शिवाय आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाच्या आईच्या नावावर बॅंकेत ५० हजार रुपये फिक्स डिपॉझिट म्हणून जमा केली जाईल. रक्कम वाढेल त्यावेळी त्याची व्याप्ती वाढवली जाईल,” असेही शरद पवार यांनी सांगितले. “शेतकर्‍यांची मुलं सज्ञान व आत्मसन्माने उभी कशी राहील यासाठी प्रयत्न केला जाणार,” असे आश्वासन यावेळी शरद पवार यांनी दिले. यावेळी पवार साहेबांचा प्रवास सांगणारी चित्रफितही दाखवण्यात आली.

अवघ्या 16 वर्षांच्या तरूणीचा ‘टाइम पर्सन ऑफ द इयर’ ने गौरव

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मुंबई – हवामान बदलावर आपल्या बुलंद आवाजाने संपूर्ण जगभरात चळवळ उभारणारी स्वीडनमधील पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिला टाइम मॅगझीनने पर्सन ऑफ द इयर पुरस्काराने गौरवले आहे.

ग्रेटा ही अवघ्या 16 वर्षांची असून, हा बहुमान मिळालेली ती आजवरची सर्वात तरुण व्यक्ती ठरली आहे. जगप्रसिद्ध टाइम मासिकाद्वारे 1927 पासून पर्सन ऑफ द इयर निवडण्यात येतो. ग्रेटा थनबर्ग या वर्षाच्या शेवटच्या टाइम मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकली आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातच ग्रेटाने स्वीडनच्या संसदेसमोर आंदोलन केलं होतं. ग्रेटाने मागील वर्षी हवामान बदलांबद्दलच्या जागृती मोहिमेला सुरुवात केली होती. स्वीडनच्या संसदेसमोर दर शुक्रवारी ती निदर्शने करत होती. ग्रेटाच्या या कृत्याची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली.

संपूर्ण जगभरातून ग्रेटाच्या या कृतीचं कौतुक करण्यात येत होतं. मग ते रस्त्यावर उतरून करण्यात आलेली आंदोलनं असो किंवा संयुक्त राष्ट्राची बैठकीत काही देशांविरोधात करण्यात आलेलं तिचं भाषण, ग्रेटाने पर्यावरणाच्या संवर्धनासाठी नेहमी आवाज उठवला आहे.

आंध्रप्रदेशात आता बलात्कार्‍याला 21 दिवसात फाशी

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

हैद्राबाद – महिलांच्या व लहान मुलांच्या सुरक्षेसाठी आंध्र प्रदेश सरकार नवा कायदा आणण्याच्या तयारीत आहे. नव्या कायद्याअंतर्गत बलात्काराचा आरोप सिद्ध होणार्‍या आरोपीला 21 दिवसांमध्ये फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. बुधवारी आंध्र प्रदेशच्या मंत्रिमंडळानं या विधेयकाला मंजुरी दिली.

एफआयआर दाखल केल्यानंतर 21 दिवसांमध्ये ट्रायल पूर्ण करून फाशीची शिक्षाही देण्यात येणार असल्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशच्या विधानसभेत आता हे विधेयक मांडण्यात येणार आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 354 मध्ये दुरूस्ती करून नवं 354 (ई) हे कलम तयार करण्यात आलं आहे.

भारतीय कायद्यामध्ये बलात्काराच्या आरोपात दोष सिद्ध झाल्यानंतर फाशीच्या शिक्षेची तरतूद नाही. हे विधेयक मंजुर झाल्यानंतर बलात्काराच्या गुन्ह्याखाली फाशीची शिक्षा देणारे आंध्र प्रदेश हे पहिले राज्य ठरणार आहे. हा कायदा आंध्र प्रदेश गुन्हे कायद्यात सुधारणा असेल. तसंच याला आंध्र प्रदेश दिशा कायदाफ असं नाव देण्यात आलं आहे.

याव्यतिरिक्त आणखी एका कायद्याच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली आहे. महिला आणि बालकांवर होणार्‍या अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये खटला चालवण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापनाही करण्यात येणार आहे.

केंद्रीय कृषी अधिकाऱ्यांची लासलगाव बाजारसमितीला भेट; कांदा साठवणूक निर्बंधाचा फेरविचार होणार?

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी
लासलगांव | वार्ताहर
गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कांद्याची आवकेत दुपट्टी ने वाढ झाल्याने  केंद्र सरकारने व्यापाऱ्यांवर  लाादलेले कांदा साठवणुक निर्बंधांचा फेरविचार करावा याची वारंवार मागणी लासलगाव बाजार समितीच्या वतीने केंद्र सरकारकडे करण्यात आली होती.  याची दखल घेत केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सहाय्यक संचालक संदीप कोते यांनी आज लासलगाव बाजार समिती भेट देऊन व्यापाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी येण्याचा आणि नाफेडच्या कांदा साठवणुकीची माहिती जाऊन घेतले.
केंद्र सरकारने कांदा साठवणुकीवर घाउक व्यापार्याला 25 टन तर किरकोळ व्यापार्याला पाच टन असलेली मर्यादा उठवावी याकरिता बाजार समिती आणि व्यापारी वर्गाने शासनाकडे मागणी केली होती.
आज या पार्श्वभूमीवर  केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सहाय्यक संचालक संदीप कोते यांनी आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन कांदा आवक परिस्थितीची माहिती घेतली.
गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याच्या दरामध्ये होत असलेल्या चढ-उतार ,बाजार समितित येत असलेली आवक याबाबत बाजार समिती व्यापारी आणि शेतकरी वर्गाची चर्चा करुन माहिती जाणून घेतले. यावेळी लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी कांदा साठवणुकीवर असलेली मर्यादा वाढवावी अन्यथा रद्द करावी अशी मागणी केली आहे.

केंद्र सरकारने घाऊक व्यापाऱ्यांना 25 मेट्रिक टन तर किरकोळ व्यापाऱ्यांना २ मेट्रिक टन कांदा साठवणुकीची मर्यादा दिलेली आहे मुळात सध्या बाजार समिती म्हणते येणारा लाल कांदा याची 20 ते 25 दिवस टिकवण क्षमता असते.

कांद्याला चांगला भाव असल्याने शेतकरी वर्ग अपरिपक्व कांदा विक्रिस आणत असल्याने त्याला वाळविणे, प्रतवारी करने,पॅकिंग करणे याला वेळ लागत असल्याने किमान तीन ते चार दिवस कांदा खळ्यावर  पडत आहे त्यामुळे साठवणुकीची मर्यादा आल्याने याचा थेट परिणाम हा कांदा खरेदीवर होणार आहे.


शेतकऱ्यांना दोन पैसे भेटत आहे तर भेटून द्या गेल्या तीन चार वर्षानंतर शेतमालाला समाधानकारक भाव मिळत आहे.

निवृत्ती न्याहरकर,शेतकरी


कांद्याचे वाढलेले तर लक्षात घेता शहरी ग्राहकांचे हित डोळ्यासमोर ठेवून शासन कांदा बाजार भाव नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. ज्यावेळी कांदा हा मातीमोल भावाने विकला जातो त्यावेळी तुटपुंजी मदत देऊन पाने पुसली जातात. त्यामुळे शासनाने खाणाऱ्या बरोबर पिकवणारा याचाही विचार केला पाहिजे.

मंगेश गवळी, ब्राह्मणगाव

Forest dept seizes khair wood worth Rs 1.5 lakh

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

NASHIK:

The forest department officials raided a vehicle and seized khair wood worth Rs 1.5 lakh from smugglers. They were smuggling the wood from the forest in Harsul. They seized 10 wood lofts of khair tree. Meanwhile, smugglers attacked the forest department personnel.

This incident occurred on December 7 at Devdongri in Harsul tehsil. After receiving an input that some smugglers were smuggling khair wood lofts after axing the trees from Devdongri forest, forest officials Sandip Kale, Kiran Gavali, Sanjay Bhagre and Popat Raut conducted raid. They found that smugglers were carrying khair wood lofts by Qualis which registration is made in Gujarat. When the forest department stopped and asked the suspects, they tried to attack forest officials and employees.

Taking advantage of darkness, vehicle driver and smugglers were succeeded in fleeing away from the spot. Goods over Rs 1.5 lakh have been seized. The action was taken under the guidance of deputy forest conservator of west Nashik S B Phule, assistant forest conservator G A Zole and forest guard Pankaj Garge.

शरद पवारांना वाढदिवसाची अनोखी भेट; अनिल गोटेंचा राष्ट्रवादीत प्रवेश

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मुंबई | प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढ दिवशी आज विकास आघाडी सरकारचा गेल्या १३ दिवसांपासून रखडलेला खातेवाटपाचा तिढा सुटला त्या अर्थाने उध्दव सरकारने ही पवार यांना दिलेली वाढ दिवसाची भेट ठरली आहे. तर पवार यांचे कट्टर विरोधक म्हणून गेल्या अनेक वर्षापासून भाजपमध्ये बुलंद आवाज काढणारे धुळ्याचे माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला त्या अर्थाने पवार यांना ही वाढदिवसांची दुसरी महत्वाची भेट ठरली आहे.

२०१४ मध्ये समृध्दी महामार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात होत असताना गोटे यांनी त्याबाबत जाहीरपणे मते व्यक्त केल्यानंतर त्यांच्यात आणि भाजपच्या नेत्यांमध्ये राजकीय वाद निर्माण झाले होते.

भाजपचे ज्येष्ठ नेते असताना धुळ्यात महापालिका निवडणुखित त्यांना बाजूला ठेवण्यात आल्याने गिरीश महाजन यांच्याशी त्यांचा जाहीर वाद झाला होता. व्यासपिठावर धक्काबुक्की करण्यापर्यंत गोटे यांना भाजपात संघर्ष करावा लागला होता. भाजपने इव्हीएम घोटाळा करून निवडणूकांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता.

त्यानंतर २०१४ मध्ये पक्षाने त्यांचे तिकीट कापले होते. त्यानंतर त्यानी अपक्ष म्हणून निवडणुका लढवण्याचा प्रयत्न केला त्यात केवळ ३हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्यामागे देखीलइवीएन घोटाळा असल्याचा आरोप त्यानी केला होता.

राज्यात उध्दव सरकार सत्तेवर आल्यानंतर भाजपच्या मंत्र्याविरूध्द तसेच मुख्यमंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप त्यानी केले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने आता राजकीय विरोधकांवर गोटे मोठ्या प्रमाणात हल्लाबोल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जाणून घ्या नगर जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या!

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

जाणून घ्या नाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या!

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

अभिनेते स्व. सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार मकरंद अनासपुरे, शेखर गायकवाड, विशाल सोळंकी यंदाचे मानकरी

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

अहमदनगर (प्रतिनिधी) – थिंक ग्लोबल फौंडेशनचा तिसरा राज्यस्तरीय स्व. सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार (2019) सुप्रसिद्ध सिनेअभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते मकरंद अनासपुरे, राज्याचे साखर तथा कृषी आयुक्त शेखर गायकवाड, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना जाहीर झाला आहे. तशी घोषणा फौंडेशनचे अध्यक्ष किरण काळे यांनी केली.

फौंडेशनच्या वतीने दरवर्षी डिसेंबर महिन्यात मूळ नगरचे असणार्‍या अमरापूरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या पुरस्कारांचे वितरण केले जाते. अभिनय आणि सामाजिक कार्य विभागातून अनासपुरे यांना रु. 51000, मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या वर्षी पासून फौंडेशनने प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय कार्य करणार्‍या दोन कर्तबगार अधिकार्‍यांचा देखील गौरव करण्याचे ठरविले आहे. यावर्षी गायकवाड आणि सोळंकी या दोन सनदी अधिकार्‍यांचा त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.

आजवर या पुरस्काराने सुप्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले, लेखिका तथा सामाजिक कार्यकर्त्या दीपा देशमुख, पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना सन्मानित करण्यात आले आहे. मराठवाड्यातील अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या अनासपुरे यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. कोणतीही पार्श्वभूमी नसताना आणि कुणाचाही वरदहस्त नसताना त्यांनी मिळविलेले यश निश्चितच कौतुकास्पद आहे.

नाम फौंडेशनच्या माध्यमातून अभिनेते नाना पाटेकर आणि अनासपुरे यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील दुष्काळ आणि आत्महत्याग्रस्त भागातील शेतकर्‍यांचे अश्रू पुसण्याचे काम केले. त्यांचे आधारवड म्हणून उभे राहिले. अनासपुरेंची ही सामाजिक संवेदनशीलता दखलपात्र आहे. त्यामुळेच त्यांची पुरस्कार्थी म्हणून निवड करण्यात आल्याचे फौंडेशनचे अध्यक्ष किरण काळे यांनी सांगितले. अनासपुरे यांच्यासोबतच राज्याचे साखर तथा कृषी आयुक्त शेखर गायकवाड व स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये रोल मॉडेल म्हणून लोकप्रिय असलेले विशाल सोळंकी यांना दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्य काही दिवसात या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असून पुरस्कारर्थींना सन्मानित करण्यात येणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.