Saturday, May 9, 2026
Home Blog Page 13305

डॉ. वंदना मुरकुटे यांचा सभापतिपदाचा मार्ग मोकळा

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील पंचायत समितीच्या पुढील अडीच वर्षांसाठी सभापती पदासाठी आरक्षण सोडत काल निघाली. त्यात श्रीरामपूर पंचायत समितीचे सभापतिपद नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओ.बी.सी.) महिलेसाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे टाकळीभान पंचायत समिती राखीव गणातून निवडून आलेल्या ससाणे गटाच्या डॉ. वंदना ज्ञानेश्वर मुरकुटे यांची सभापतिपदी वर्णी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

श्रीरामपूर पंचायत समितीमध्ये आठ सदस्य संख्या आहे. त्यात चार महिला सदस्य तर चार पुरुष सदस्य आहेत. गेल्या अडीच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत मुरकुटे-ससाणे या दोन गटाचे समसमान चार-चार सदस्य निवडून आले होते. पहिली अडीच वर्षे सभापतीपद खुले असल्याने मुरकुटे (महाआघाडी) गटाकडून दीपक पटारे तर ससाणे (काँग्रेस) गटाकडून अरुण पाटील नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र दोन्ही उमेदवारांना समसमान चार-चार मते मिळाल्याने चिठ्ठी टाकण्यात आली होती. त्यावेळी सभापतीपदी दीपक पटारे यांची लॉटरी लागली होती.

महिला सदस्यांपैकी दत्तनगर गणातील संगीता सुनील शिंदे या सर्वसाधारण खुल्या महिला प्रवर्गातून निवडून आलेल्या आहेत. उक्कलगाव गणातील कल्याणी सतीश कानडे या अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून तर उंदिरगाव गणातील वैशाली अशोक मोरे या अनु.जाती महिला प्रवर्गातून निवडून आलेल्या आहेत. नव्याने झालेल्या आरक्षण सोडतीत नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असे आरक्षण निघाल्याने टाकळीभान (ना.मा.प्र.महिला) राखीव गणातून निवडून आलेल्या डॉ. वंदनाताई मुरकुटे यांचीच सभापतीपदी लागणार हे निश्चित झाले आहे.

पुढील अडीच वर्षासाठी सभापती पदाची माळ डॉ.वंदना मुरकुटे यांच्या गळ्यात पडणार असल्याने सोशल मीडियातून त्यांच्यावर आभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला आहे. डॉ. मुरकुटे या ससाणे गटाच्या कट्टर समर्थक असल्याने पुढील अडीच वर्षासाठी पंचायत समितीची सत्ता ससाणे गटाकडे जाणार हे उघड झाले आहे.

अनधिकृत सावकारकीचे लोण ग्रामीण भागापर्यंत; शेतकर्‍यांच्या जमिनी घशात

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) – शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात खाजगी सावकाराचा सुळसुळाट सुरू असल्याने अनधिकृतपणे खाजगी सावकार शेकडा 20 ते 40 टक्के व्याजदराने पैसे देत आहेत. दिलेले पैसे वसुलीसाठी वेळप्रसंगी दहशत आणि घेतलेल्या कोर्‍या धनादेशाचा गैरवापर करून थेट कोर्ट केसेस करण्याच्या धमक्या देत असल्याचे अनेकांनी सांगितले. मात्र तक्रार केल्यास नसती आफत ओढवून घेण्यापेक्षा गप्प बसलेले बरे असे असताना तालुक्यातील ग्रामीण भागातून देखील अशा सावकारांच्या जाचाला कंटाळून जमिनी सावकारांच्या घशात गेल्या असल्याच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.

दैनिक सार्वमत मध्ये दोन दिवसांपासून अनधिकृत सावकारांच्या बाबत बातम्या प्रसिद्ध होत आहे. शहरात अनेकांनी बातम्याचे कात्रण करून ठेवले असताना ग्रामीण भागातील अशा प्रकारे सावकारांच्या जाचाला कंटाळून वेळप्रसंगी जमीन जायदाद लिहून द्यावी लागली असल्याच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. मात्र एवढा अन्याय होऊनही तक्रार का दाखल केल्या नाहीत असे विचारले असताना एकमेव कारण हे या सावकारांच्या दहशत हेच असल्याचे समोर आले आहे. अशा तक्रारी केल्यास आधार कुणाचा नसल्याने अन्याय सहन करणारे गप्प आहेत.

शहरात आणि तालुक्यात अनेक तरुण छोटे मोठे व्यवसाय करत आहेत. या व्यवसायात आपली आर्थिक गरज भागवण्यासाठी अनेक वेळा बँक, पतसंस्थाच्या कडे कर्ज घ्यावे लागते. हे कर्ज अनेकांना उपलब्ध होते. मात्र अनेक जणांना कुठली पत नसल्याने सहज कर्ज उपलब्ध होत नाही अशी परिस्थिती असल्याने आपली गरज पूर्ण करण्यासाठी कुणापुढे तरी हाथ पसरावे लागत असतात. बँक, पतसंस्थामधून गरज सुटत असली तरी सगळ्यांना कर्ज मिळतेच असे नाही.

यापुढे जाऊन ऐन वेळी कुणी कर्ज देते असे ही नसल्याने तातडीने पैसे उपलब्ध होण्यासाठी अनेक वेळा खाजगी सावकारांच्या दारात जावे लागत असल्याने शहरात असे कर्ज देणारे अनेक जण आहेत. यांच्याकडे कुठला परवाना नाही मात्र ऐन वेळी कुणाच्या तरी मध्यस्थी ने पैसे दिले जात असले तरी एक महिन्यासाठी शेकडा पंधरा ते वीस टक्के प्रमाणे हे सावकार पैसे देत आहेत हे कर्जापेक्षा व्याज जास्त होत असल्याने अनेक तरुण या ओझ्याखाली दबले आहेत असे असले तरी ग्रामीण भागात आदिवासी भटक्या समाजाचे काही व्यक्तीकडून घेतलेले कर्ज फेडता आले नसल्याने वेळप्रसंगी दुपटीने पैसे देऊनही जमीन लिहून द्यावी लागली असल्याचे सांगितले आहे.

कारवाई करणार :सहायक निबंधक
श्रीगोंदा तालुक्यात 10 सावकारांना अधिकृत लायसन्स आहेत, पण अनेक जण खाजगी सावकारकीचा व्यवसाय करतात अशी चर्चा आहे. जे लोक खाजगी सावकाराच्या जाळ्यात अडकले त्यांनी तात्काळ तक्रार द्यावी. सावकारांवर कारवाई करण्यात येईल असे सह्ययक निबंधक रावसाहेब खेडकर यांनी सांगितले.

तक्रार द्या मुसक्या आवळणार : पोलीस निरीक्षक
श्रीगोंदा तालुक्यातील ज्यांनी खाजगी सावकाराकडून पैसे घेतले आहेत, त्यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल कराव्यात. लगेच त्यांच्या मुसक्या आवळ्या जातील असे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी सांगितले.

राहाता पालिकेच्या डिझेल व पेट्रोलमध्ये दोन लाख 16 हजारांची अफरातफर

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

औषध फवारणी करणार्‍या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल; चौघे अटकेत

राहाता (तालुका प्रतिनिधी) – राहाता पालिकेचे डास प्रतिबंधक फॉगिंग करताना चार जणांना डिझेल व पेट्रोलची अफरातफर करताना प्रभारी आयएएस महिला मुख्याधिकारी यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले. 100 दिवसांत दोन लाख 16 हजार रुपयांची अफरातफर केल्याचा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ही घटना राहाता शहरात जंगल प्रभागात बुधवारी 10 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक दीपक जग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादी वरून राहाता पोलिसांनी किरण बाळासाहेब थोरात, ललित सुनील निकाळे, अविनाश कैलास निकाळे, सागर राजू कासार या चार जणांना या अफरातफर प्रकरणी तसेच पालिकेचे वाहन घंटा गाडी विना परवानगी स्वत:च्या फायद्यासाठी वापरले म्हणून अटक केली.

याबाबतची हकीगत अशी की राहाता पालिकेच्या डास प्रतिबंधक फॉगिंगचे टेंडर एका खाजगी कंपनीला दि 10 जानेवारी 2019 पासून दिले होते. त्यासाठी लागणारे डिझेल व पेट्रोल पालिका पुरवीत होती. विश्वसाने दररोज दिल्या जाणार्‍या पेट्रोल व डिझेलमधे अफरातफर करून टेंडर दिल्यापासून ते 11 डिसेंबर 2019 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत असे 100 दिवसांत डिझेलच्या दोन हजार लिटरचे 1 लाख 36 हजार रुपये व पेट्रोलच्या एक हजार लिटरच्या 80 हजार रुपयांची अशी एकूण 2 लाख 16 हजार रुपयाची अफरातफर केली. तसेच पालिकेच्या मालकीचे वाहन घंटा गाडी विना परवानगीने स्वत:च्या फायद्यासाठी त्याचा वापर केला. या प्रकरणी चौघा जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करन्यात आला असून चारही जणांना अटक करन्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

गेल्या तीन महिन्यापासून राहाता शहरात डेंग्यू मलेरिया, थंडी ताप या साथीच्या रोगाने संपूर्ण राहाता शहराला विळखा घातला असताना शहरात फॉगिंग करावी अशी मागणी केली जात होती; मात्र प्रत्यक्षात औषध फवारणी होत नव्हती. यामुळे शेकडो नागरीक आजारी पडले. हजारो रूपये दवाखान्यात उपचारावर खर्च करावे लागले. या प्रश्नी सर्वच नगरसेवकांनी तक्रारी करूनही पालिका प्रशासन लक्ष देत नव्हते. कधी तरी एखाद्या प्रभागात तात्पुरती फवारणी केली जात असे. मात्र त्यासाठी लागणारे डिझेल व पेट्रोल रोज पालीकेकडून घेतले जात होते.

गेल्या आठ महिन्यांपासून पालिकेला मुख्याधिकारी नसल्याने येथे मनमानी कारभार सुरू होता. प्रभारी मुख्याधिकारी पालिकेकडे फिरकत नव्हते. या संधीचे पालिकेच्या काही अधिकारी व पदाधिकारी व ठेकेदार यांनी सोनं करून अनेक वेळी फवारणी न करता रोज डिझेल व पेट्रोल घेऊन अफरातफर केली. नुकत्याच पालिकेत मुख्याधिकारी म्हणून आलेल्या आयएएस महिला अधिकारी यांना संशय आल्याने त्यांनी या फॉगिंग करणार्‍या ठेकेदाराच्या माणसांवर लक्ष ठेवण्यासाठी एक गोपनीय पथक नेमले. सर्व माहिती व काय प्रकार होते हे लक्षात घेऊन सदर महिला अधिकारी यांनी बुधवारी 9:45 वाजेच्या सुमारास ज्या परिसरात औषध फवारणी सुरू होती तेथे पथकासह जाऊन ही चोरी पकडली. सदर कारवाईचे सर्व नगरसेवक व नागरीकांची स्वागत केले असून कर्तव्यदक्ष महिला अधिकारी असीमा मित्तल यांचे अभिनंदन केले आहे.

बड्या माशांवर कारवाईची मागणी
गेल्या 100 दिवसांपासून हा प्रकार राजरोस घडत होता. पाालिकेचे प्रमुख अधिकारीच संबंधितांना डिझेलसाठी पेट्रोल पंपावाल्याना लेखी चिठ्ठी देत होते. तर यावर देखरेख करणारे अधिकारी कोठे होते? ज्या कंपनीने हा ठेका घेतला होता त्यांचा कोणीच माणूस येथे नव्हता. मग हे काम कोण करत होते याचाही शोध घेण्याची गरज असून ज्या चार तरुणांना या गुन्ह्यात अटक केली ते बेरोजगार तरुण असल्याचे कळते. त्यातील काहीजण पहिल्यांदाच हे औषध फवारणी करीत गेले होते. यात अनेक बडे मासे गुंतले असून त्यांची चौकशी होणे गरजेचे असून जे अधिकारी याला जबाबदार आहे, त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे असल्याचे नगरसेवक व नागरिकांचे म्हणणे आहे.

शेततळ्यात बुडून बाप-लेकाचा मृत्यू

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

सिन्नर । वार्ताहर

सिन्नर तालुक्यातील दापूर शिवारात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या बाप-लेकाचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज (दि.12) दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

विष्णू एकनाथ पवार (40) व मुलगा प्रतीक विष्णू पवार (6) अशी मृतांची नावे आहेत. तालुक्यातील चिंचोली येथील विष्णू पवार हे मुळचे रहिवाशी आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून सासरवाडी असलेल्या दापूर येथे ते कुटुंबियांसह रहात होते.

दुपारी 12 वाजता विष्णू पवार हे आपल्या दोन्ही मुलांसह शेळ्या चारण्यासाठी दरा शिवारात गेलेले होते. या भागात संभाजी शिवाजी आव्हाड यांचे शेततळे असून प्रतीक हा शेततळ्यातील पाणी पाहण्यासाठी डोकावला असता, त्याचा पाय घसरला आणि तो थेट तळ्यात पडला.

मुलाला वाचविण्यासाठी विष्णू यांनी तळ्यात उडी घेतली. ही घटना घडत असताना दुसरा आठ वर्षांचा मुलगा काठावर होता. त्याने तातडीने घराकडे धाव घेत घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना बाहेर काढले. त्यानंतर उपचारांसाठी खासगी दवाखान्यात हलवले.

मात्र, उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला होता. वावीचे सहाय्यक निरीक्षक रणजित गलांडे, पोलिस हवालदार प्रवीण अढांगळे यांनी घटनास्थळी भेट देत दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी दोडी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. रात्री दोघांवर शोकाकूल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आरोग्य विज्ञान विद्यापीठ जवळ झालेल्या अपघात एक ठार, दोन जखमी

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील रहिवासी असलेले चौघे युवक पंचवटी येथून आपापल्या गाव, पाड्यांवर दुचाकीने जात होते. यावेळी दिंडोरीकडून भरधाव नाशिककडे येणाऱ्या पिकअप जीपने यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. हा अपघात आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अलीकडे गुरुवारी (दि.12) रात्री 9 वाजेच्या सुमारास घडला. अपघातात एक दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाला तर तिघे तरुण गंभीरपणे जखमी झाले.

याबाबत म्हसरूळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिंडोरी तालुक्यातील वणी खुर्द, वळखेड, निळवंडी, पाडा येथिल रहिवासी असलेले विशाल संजय गोडे, अनिकेत रामभाऊ माळेकर, वैभव वायकांडे, सचिन सुरेश सताळे (24) हे चौघे दिंडोरीच्या दिशेने दुचाकी ने (एमएच15 ई डी 6454) जात होते. यावेळी समोरून ओव्हरटेक करत पिकअप जीप (एमच41 जी 2942) भरधाव वेगाने आल्याने हे भांबावून गेले व जीप ने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की हे चौघे लांब अंतरावर फेकले गेले.

सताळे याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तसेच गोडे, माळेकर, वायकांडे हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना एक टेम्पोत तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातप्रकरणी पिकअप जीपचालक समाधान उल्हास भीरे (रा. दिंडोरी) यास म्हसरूळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

त्र्यंबकेश्वर: हरसूल भागात ८०व्या वाढदिवसानिमित्त ८० पातळाचे वाटप

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

हरसूल l प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ८० वा. वाढदिवस त्र्यंबकेश्वर तालुक्यात विविध ठिकाणी साजरा करण्यात आला. तसेच हरसूल भागात शरद पवार यांच्या ८०व्या. वाढदिवसानिमित्त फळे व गोरगरिबांना ८० पातळाचे (वस्त्र) वाटप करण्यात आले.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथील ग्रामीण रुग्णालयात शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना केळी, सफरचंद, चिकू आदी फळांचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बहिरु मूळाने, जिल्हा उपाध्यक्ष अरुण मेढे, माजी त्र्यंबकेश्वर पंचायत समिती सभापती मोतीराम दिवे, सामजिक कार्यकर्त्यां भारती भोये, महिला तालुकाध्यक्षा भारती खिरारी, हरसुलच्या सरपंच सविता गावित आदींच्या हस्ते रुग्णासह नातेवाईकांना वाटप करण्यात आले. तसेच ८० व्या. वाढदिवसानिमित्त ८० पातळाचे (वस्त्र) हरसूल जवळील वैतागवाडी, पवारपाडा, अंबोली, पिंपरी (त्र्यंबक) येथे मान्यवरांनी वाटप केले. तसेच त्र्यंबकेश्वर येथील तुपादेवी फाटा आधारतीर्थ याठिकाणी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

या प्रसंगी हरसूल रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी चेतन ठोबरे, गोकुळ बत्तासे, योगेश देवरगावकर, हरसूल ग्रामपंचायत सदस्य अनिल बोरसे, शकील पठाण, सलमा शेख, छाया पवार, संजय आहेर, छबिलदास बाविस्कर, रमेश हिलीम, उषा सकटे, संजू भोये, विनया वाघ, कुलकर्णी, अर्चना खाडे आदींसह रुग्ण, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शरद पवार यांचा जन्मदिवस बळीराजा कृतज्ञता दिन म्हणून साजरा

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

 कोटी पन्नास लाखाचा कृतज्ञता कोष प्रदान; शुभेच्छा देण्यासाठी लोटला कार्यकर्त्यांचा जनसागर

मुंबई:

आपली बांधिलकी शेवटच्या माणसाशी, समाजातील तरुण पिढीशी आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी काम करायला हवं असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. शरद पवारांच्या ७९व्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बळीराजा कृतज्ञता दिन साजरा करण्यात आला. यावेळी अभीष्टचिंतन कार्यक्रमात त्यांनी समर्थकांशी संवाद साधला.

“माझा जन्मदिवस माझ्या लक्षात राहत नाही. परंतु माझ्या आईचा जन्मदिवस म्हणून लक्षात राहतो. माझ्या पत्नीचा जन्मदिवस १३ डिसेंबर आहे. ज्येष्ठ अभिनेते व माझे जवळचे मित्र दिलीपकुमार यांचा ११ डिसेंबर आहे,” याची आठवण शरद पवार यांनी सांगितली.

“माझ्या आईने कष्टाने आम्हाला शिकवलं. १९३६ साली लोकल बोर्डावर निवडून आली. महिलांसाठी काम केले. मुलींचे शिक्षण व्हावे असा तिचा आग्रह होता,” अशी माहिती शरद पवार यांनी सभागृहात दिली.

“सार्वजनिक जीवनात यश मिळते. संकटे येतात. त्यावेळी दोन वर्ग माझ्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे माझी आई आणि दुसरा माझा सर्वसामान्य माणूस,” आहे असेही शरद पवार म्हणाले. “आज जो धनादेश दिला तो वेलफेअर ट्रस्टच्या वतीने गरजू आणि संकटकाळात सापडलेल्या शेतकर्‍यांसाठी दिला जाईल.

शिवाय आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाच्या आईच्या नावावर बॅंकेत ५० हजार रुपये फिक्स डिपॉझिट म्हणून जमा केली जाईल. रक्कम वाढेल त्यावेळी त्याची व्याप्ती वाढवली जाईल,” असेही शरद पवार यांनी सांगितले. “शेतकर्‍यांची मुलं सज्ञान व आत्मसन्माने उभी कशी राहील यासाठी प्रयत्न केला जाणार,” असे आश्वासन यावेळी शरद पवार यांनी दिले. यावेळी पवार साहेबांचा प्रवास सांगणारी चित्रफितही दाखवण्यात आली.

अवघ्या 16 वर्षांच्या तरूणीचा ‘टाइम पर्सन ऑफ द इयर’ ने गौरव

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मुंबई – हवामान बदलावर आपल्या बुलंद आवाजाने संपूर्ण जगभरात चळवळ उभारणारी स्वीडनमधील पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिला टाइम मॅगझीनने पर्सन ऑफ द इयर पुरस्काराने गौरवले आहे.

ग्रेटा ही अवघ्या 16 वर्षांची असून, हा बहुमान मिळालेली ती आजवरची सर्वात तरुण व्यक्ती ठरली आहे. जगप्रसिद्ध टाइम मासिकाद्वारे 1927 पासून पर्सन ऑफ द इयर निवडण्यात येतो. ग्रेटा थनबर्ग या वर्षाच्या शेवटच्या टाइम मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकली आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातच ग्रेटाने स्वीडनच्या संसदेसमोर आंदोलन केलं होतं. ग्रेटाने मागील वर्षी हवामान बदलांबद्दलच्या जागृती मोहिमेला सुरुवात केली होती. स्वीडनच्या संसदेसमोर दर शुक्रवारी ती निदर्शने करत होती. ग्रेटाच्या या कृत्याची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली.

संपूर्ण जगभरातून ग्रेटाच्या या कृतीचं कौतुक करण्यात येत होतं. मग ते रस्त्यावर उतरून करण्यात आलेली आंदोलनं असो किंवा संयुक्त राष्ट्राची बैठकीत काही देशांविरोधात करण्यात आलेलं तिचं भाषण, ग्रेटाने पर्यावरणाच्या संवर्धनासाठी नेहमी आवाज उठवला आहे.

आंध्रप्रदेशात आता बलात्कार्‍याला 21 दिवसात फाशी

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

हैद्राबाद – महिलांच्या व लहान मुलांच्या सुरक्षेसाठी आंध्र प्रदेश सरकार नवा कायदा आणण्याच्या तयारीत आहे. नव्या कायद्याअंतर्गत बलात्काराचा आरोप सिद्ध होणार्‍या आरोपीला 21 दिवसांमध्ये फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. बुधवारी आंध्र प्रदेशच्या मंत्रिमंडळानं या विधेयकाला मंजुरी दिली.

एफआयआर दाखल केल्यानंतर 21 दिवसांमध्ये ट्रायल पूर्ण करून फाशीची शिक्षाही देण्यात येणार असल्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशच्या विधानसभेत आता हे विधेयक मांडण्यात येणार आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 354 मध्ये दुरूस्ती करून नवं 354 (ई) हे कलम तयार करण्यात आलं आहे.

भारतीय कायद्यामध्ये बलात्काराच्या आरोपात दोष सिद्ध झाल्यानंतर फाशीच्या शिक्षेची तरतूद नाही. हे विधेयक मंजुर झाल्यानंतर बलात्काराच्या गुन्ह्याखाली फाशीची शिक्षा देणारे आंध्र प्रदेश हे पहिले राज्य ठरणार आहे. हा कायदा आंध्र प्रदेश गुन्हे कायद्यात सुधारणा असेल. तसंच याला आंध्र प्रदेश दिशा कायदाफ असं नाव देण्यात आलं आहे.

याव्यतिरिक्त आणखी एका कायद्याच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली आहे. महिला आणि बालकांवर होणार्‍या अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये खटला चालवण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापनाही करण्यात येणार आहे.

केंद्रीय कृषी अधिकाऱ्यांची लासलगाव बाजारसमितीला भेट; कांदा साठवणूक निर्बंधाचा फेरविचार होणार?

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी
लासलगांव | वार्ताहर
गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कांद्याची आवकेत दुपट्टी ने वाढ झाल्याने  केंद्र सरकारने व्यापाऱ्यांवर  लाादलेले कांदा साठवणुक निर्बंधांचा फेरविचार करावा याची वारंवार मागणी लासलगाव बाजार समितीच्या वतीने केंद्र सरकारकडे करण्यात आली होती.  याची दखल घेत केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सहाय्यक संचालक संदीप कोते यांनी आज लासलगाव बाजार समिती भेट देऊन व्यापाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी येण्याचा आणि नाफेडच्या कांदा साठवणुकीची माहिती जाऊन घेतले.
केंद्र सरकारने कांदा साठवणुकीवर घाउक व्यापार्याला 25 टन तर किरकोळ व्यापार्याला पाच टन असलेली मर्यादा उठवावी याकरिता बाजार समिती आणि व्यापारी वर्गाने शासनाकडे मागणी केली होती.
आज या पार्श्वभूमीवर  केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सहाय्यक संचालक संदीप कोते यांनी आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन कांदा आवक परिस्थितीची माहिती घेतली.
गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याच्या दरामध्ये होत असलेल्या चढ-उतार ,बाजार समितित येत असलेली आवक याबाबत बाजार समिती व्यापारी आणि शेतकरी वर्गाची चर्चा करुन माहिती जाणून घेतले. यावेळी लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी कांदा साठवणुकीवर असलेली मर्यादा वाढवावी अन्यथा रद्द करावी अशी मागणी केली आहे.

केंद्र सरकारने घाऊक व्यापाऱ्यांना 25 मेट्रिक टन तर किरकोळ व्यापाऱ्यांना २ मेट्रिक टन कांदा साठवणुकीची मर्यादा दिलेली आहे मुळात सध्या बाजार समिती म्हणते येणारा लाल कांदा याची 20 ते 25 दिवस टिकवण क्षमता असते.

कांद्याला चांगला भाव असल्याने शेतकरी वर्ग अपरिपक्व कांदा विक्रिस आणत असल्याने त्याला वाळविणे, प्रतवारी करने,पॅकिंग करणे याला वेळ लागत असल्याने किमान तीन ते चार दिवस कांदा खळ्यावर  पडत आहे त्यामुळे साठवणुकीची मर्यादा आल्याने याचा थेट परिणाम हा कांदा खरेदीवर होणार आहे.


शेतकऱ्यांना दोन पैसे भेटत आहे तर भेटून द्या गेल्या तीन चार वर्षानंतर शेतमालाला समाधानकारक भाव मिळत आहे.

निवृत्ती न्याहरकर,शेतकरी


कांद्याचे वाढलेले तर लक्षात घेता शहरी ग्राहकांचे हित डोळ्यासमोर ठेवून शासन कांदा बाजार भाव नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. ज्यावेळी कांदा हा मातीमोल भावाने विकला जातो त्यावेळी तुटपुंजी मदत देऊन पाने पुसली जातात. त्यामुळे शासनाने खाणाऱ्या बरोबर पिकवणारा याचाही विचार केला पाहिजे.

मंगेश गवळी, ब्राह्मणगाव