Thursday, May 14, 2026
Home Blog Page 13358

दहावी-बारावीच्या मार्कशीटवरुन ‘नापास’ हद्दपार!

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

संगमनेर (वार्ताहर) – राज्याच्या माध्यमिक, उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्‍या इयत्ता दहावी व बारावीचे विद्यार्थी तीनपेक्षा अधिक विषयांत अनुत्तीर्ण झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रगती पुस्तकावर यापुढे अनुत्तीर्ण असा शेरा दिला जाणार नाही. त्याऐवजी कौशल्य विकास पात्र असा शेरा नोंदविण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.

यावर्षीचा राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना दहावी-बारावीच्या परीक्षेत नापास होणार्‍या विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करण्याच्या दृष्टीने कौशल्य विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचा शासनाचा विचार होता. त्यानुसार इयत्ता दहावी, बारावीत नापास होणार्‍या विद्यार्थ्यांना यापुढे कौशल्यविकास पात्र असा शेरा मिळाल्याने त्या विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षण मिळण्याचा लाभ होणार आहे.

राज्यात कौशल्य विकास संबंधित सर्व योजना महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मार्फत राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यासाठी ही संस्था म्हणून काम पाहणार आहेत. यासाठीचा कार्यक्रम राज्य कौशल्य विकास सोसायटी व महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहेत. यासाठी दहावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना स्तर-1 व स्तर-2 पूर्ण करणे आवश्यक आहे. इयत्ता बारावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना स्तर-3 व स्तर-4 चार पूर्ण करणे आवश्यक असणार आहेत.

कौशल्य विकास योजनेसाठी लाभार्थी
कौशल्य विकास कार्यक्रमासाठी लाभार्थी ठरविताना इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत 3 पेक्षापेक्षा अधिक विषयांत अनुत्तीर्ण होणे आवश्यक असणार आहे. तो विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असून, राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेऊ पाहणार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा अधिक असता कामा नये.

विद्यार्थ्यांना प्रशिक्षण खर्चापोटी 70 टक्के अनुदान
किमान कौशल्य कार्यक्रमांतर्गत प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांची प्रशिक्षण वर्गात 75 टक्के उपस्थिती दर्शवली असेल तर त्याच्या खर्चाची टप्पानिहाय प्रतिपूर्ती करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 30 टक्के उपस्थिती असल्यास 30 टक्के शुल्क विद्यार्थ्यांनी भरणे आवश्यक असणार आहे. दुसर्‍या टप्प्यात 60 टक्के उपस्थितीची अट लावण्यात आली असून, उमेदवाराचे कौशल्याचे मूल्यांकन प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर 60 टक्के रक्कम प्रशिक्षण संस्थेला अदा करण्यात येणार आहे. तर तिसर्‍या टप्प्यात 10 टक्के उपस्थिती निकष निश्‍चित केला असून उमेदवाराने पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला असल्यास व तशी कागदपत्रे सादर केल्यास उर्वरित निधीचा टप्पा संस्थेचा दिला जाणार आहे. या प्रशिक्षणासाठीचा सत्र खर्च शासनाच्यावतीने उचलण्यात येणार आहेत.

या संस्थांवर असेल जबाबदारी
कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने राज्यातील संस्थांची जबाबदारी निश्‍चित करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांची निवड निश्‍चित करण्याबरोबर मूल्यमापन करण्याची प्रक्रिया देखील निश्‍चित करण्यात आली आहे. यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण परिषद, जिल्हा कौशल्य कार्यकारी समिती यांचा समावेश असणार आहे.

प्लॅस्टिक वापराविरुद्ध मोहीम, लाखाचा दंड वसूल

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

अहमदनगर (प्रतिनिधी) – आयुक्त खमक्या असल्यानंतर महापालिकेचे कर्मचारी कसे काम करतात, याचे उदाहरण गुरुवारी नगरकरांना दिसले. दुपारी आदेश देताच प्लॅस्टिविरोधात मोहीम हाती घेत जवळपास एक लाख रुपयांचा दंड कर्मचार्‍यांनी वसूल केला. जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी ओल्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी आता महापालिका कर्मचार्‍यांना आपल्या घरी घरगुती खत प्रकल्प करण्यासाठी सक्ती केली असून, त्याचे छायाचित्र आस्थापना विभागाकडे सादर करण्याचे आदेश दिल्याने सर्वच कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

शासनाच्या आदेशानुसार प्लॅस्टिक वापरावर बंदी असतानाही अहमदनगर शहरात खुलेआम प्लॅस्टिक विक्री व प्लॅस्टिकचा वापर सुरू आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी महापालिकेची धुरा हाती घेतल्यानंतर विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले. गुरुवारी दुपारी सर्व स्वच्छता निरीक्षकांना पाचारण करून प्लॅस्टिक बंदीची मोहीम तीव्र करतानाच दंडात्मक कारवाईचे आदेश दिले होते. कर्मचार्‍यांनीही लगेच कठोर अंमलबजावणीला सुरुवात करून गुरुवारी (दि.5) दिवसभरात तब्बल 91 हजार 250 रुपयांचा दंड वसूल केला आहे. महापालिकेच्या या आक्रमक कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

स्वच्छता सर्वेक्षणाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी बुधवारी (दि. 5) बैठक घेतली. यात प्लॅस्टिक बंदीच्या अंमलबजावणीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करुन स्वच्छता निरीक्षकांना कारवाई सुरू करण्याची तंबी दिली होती. प्रत्येक स्वच्छता निरीक्षकाला उद्दिष्टही देण्यात आले आहे. त्यानुसार पथक स्थापन करून शहरात तपासणीसाठी छापेमारी करण्यात आली. दिवसभरात प्लॅस्टिक वापरणार्‍यांवर धडक कारवाई करुन दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकही जप्त करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या आदेशानुसार व उपायुक्त सुनील पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. अनिल बोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक राजेंद्र सामल, के. के. देशमुख, आर. एल. सारसर, पी. एस. बीडकर, ए. व्ही. हंस, एस. ई. वाघ, बाळासाहेब विधाते, टी. एन. भांगरे आदींनी ही कारवाई केली.

दुसरीकडे स्वच्छ सर्वेक्षणात थ्री स्टार मिळविण्याच्या दिशेनेही आयुक्त द्विवेदी आक्रमक झाले आहेत. शहरातील ओल्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी घरगुती खत प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणात जोर लावण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या कर्मचार्‍यांना घरगुती खत प्रकल्प सक्तीचे करण्यात आले आहेत.

आपल्या विभागप्रमुखांकडून याबाबत मार्गदर्शन घेऊन तातडीने हे प्रकल्प सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच या प्रकल्पाचे छायाचित्र आस्थापना विभागाकडे सादर करण्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच स्वच्छता अ‍ॅपचा प्रभावी वापर करण्याचेही सांगण्यात आले आहे. प्रत्येक कर्मचार्‍याने किमान दोन तक्रारी या अ‍ॅपवर टाकून विभागप्रमुखांनी आपला अहवाल आस्थापना विभागाकडे सादर करावयाचा आहे.

तर वेतन नाही…
स्वच्छ सर्वेक्षणाबाबत द्विवेदी प्रचंड आग्रही आहेत. ते कर्मचार्‍यांना केवळ सूचना देऊन थांबले नाहीत, तर झालेल्या कामांढचे वस्तुनिष्ठ पुरावे व अहवाल सादर करण्याचे सांगितले आहे. तसेच या कामांची अंमलबजावणी न झाल्यास डिसेंबर महिन्याचे वेतन अदा करण्यात येणार नसल्याची तंबीही दिली आहे. यामुळे महापालिका कर्मचार्‍यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

तत्कालीन कुलगुरु, कुलसचिवांची चाैकशी करण्याचे आदेश

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

जळगाव – 

कवियत्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील हिंदी विभाग प्रमुख डाॅ.बापूराव देसाई यांच्याविरुद्ध प्रा.मुक्ता महाजन लैगिंक अत्याचार प्रकरणाची तक्रार  दाखल झाली हाेती. 

या प्रकरणात प्रा.देसाई यांना बडतर्फे करण्यात अाले हाेते. त्याविरुद्ध प्रा.देसाई यांनी औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली हाेती. त्यांची चाैकशी हाेऊन प्रा.देसाई यांनी निर्दाेष मुक्तता झाली हाेती. 

दरम्यान, या प्रकरणात २६ जणांविरुद्ध गुन्हा  दाखल करण्याची मागणी प्रा.देसाई यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात खटला दाखल करुन केली हाेती. न्यायालयाने या प्रकरणाच्या चाैकशीचे आदेश दिले आहे .

तत्कालीन प्रभारी कुलगुरु शिवाजीराव पाटील, तत्कालीन कुलसचिव राजकिशाेर गुप्ता, तक्रारदार मुक्ता महाजन, विद्यामान व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील यांच्यासह २६ जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रा.देसाई यांनी केली हाेती. 

परंतु कनिष्ठ न्यालयालयाने हा खटला फेटाळून लावला. त्याविराेधात प्रा.देसाई यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल केला. त्यांची न्या.एस.जी. ठुबे यांच्यासमाेर  सुनावणी झाली. 

न्यायालयाने प्रा.देसाई यांचा अर्ज मंजूर करुन फाैजदारी दंडसंहिता कलम २०२ प्रमाणे पाेलिस चाैकशीचे अादेश दिले. डाॅ.देसाई यांच्यातर्फे अॅड.संदीप कापसे यांनी काम पाहिले.

उद्या ना. बाळासाहेब थोरात यांचा नाशिक दौरा

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक | प्रतिनिधी 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा राज्याचे नवनियुक्त कॅबिनेट मंञी नामदार बाळासाहेब थोरात  यांचे उद्या शुक्रवार दि.६ डिंसेबर रोजी सकाळी ९.४५ वाजता पोलिस परेड ग्राउंड,नाशिक येथे हेलिकॅाप्टर व्दारे आगमन होत आहे.त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे-

स.९.४५ वाजता – पोलिस परेड ग्राउंड,नाशिक येथे आगमन

स.९.५० वाजता – गोल्फ क्लब शासकीय विश्रामगृह,नाशिक येथे आगमन

स.१०.३० वाजता – कै.तुकारामजी दिघोळे यांच्या निवासस्थानी भेट

सकाळी ११.०० वाजता- पोलिस परेड ग्राउंड येथुन हेलिकॅप्टरने धुळे जिल्ह्याकडे प्रयान

नाशिक जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या सर्व आजी/माजी पदाधिकारी,लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते  उपस्थित राहणार  असल्याची माहिती  प्रा.ज्ञानेश्वर गायकवाड यांनी दिली.

दहावी, बारावीत ‘नापास’ शेरा नाही; अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर आता ‘कौशल्य विकासास पात्र’चा उल्लेख

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । प्रतिनिधी

दहावी, बारावीच्या परीक्षा आयुष्याला वळण देणारा मोठा टप्पा असतो. या टप्प्यावर विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्यांच्या भविष्याच्या वाटचालीत अडथळे निर्माण होतात. अशा नापास विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढावा आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची क्षमता निर्माण व्हावी यासाठी या विद्यार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी शासनाने ‘कौशल्य सेतू’ कार्यक्रम योजना राबवण्यास मान्यता दिली आहे.

त्यानुसार दहावी, बारावीच्या परीक्षेत तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयांमध्ये उत्तीर्ण (पास) न होऊ शकणार्‍या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर अनुत्तीर्ण (नापास) शेरा न मारता ‘कौशल्य विकासास पात्र’ असे नमूद करण्यात येणार आहे. राज्य सरकारने क्रीडा व शालेय शिक्षण विभागाला याबाबत सूचना दिल्या असून नापास होणार्‍या विद्यार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांच्यासाठी रोजगार / स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या योजनेची राज्यस्तरीय अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषदेमार्फत करण्याचे शासनाने निश्चित केले आहे.

त्यासाठी कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत कौशल्य विकास व उद्योजकता, शालेय शिक्षण विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवस्तरावरील अधिकार्‍यांचा समावेश राहणार आहे. कौशल्य विकास सोसायटीच्या संकेतस्थळावर शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून घेण्यात आलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षेत तीन किंवा त्याहून अधिक विषयात अनुत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेच्या लाभासाठी संबंधित विद्यार्थ्याने स्वतःहून नोंदणी करणे आवश्यक आहे.

या नोंदणीसाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत देण्यात आलेले परीक्षा प्रवेशपत्र किंवा विद्यार्थी अनुत्तीर्ण असलेली गुणपत्रिका जोडणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी कौशल्य विकास सोसायटी, राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषदअंतर्गत उपलब्ध असलेल्या प्रशिक्षण संस्था निवडता येतील. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांची प्रशिक्षण वर्गातील किमान 75 टक्के उपस्थिती असल्यास तो / ती मूल्यमापनास पात्र राहिला. मूल्यमापनानंतर यशस्वी उमेदवारांना त्यांनी निवड केलेल्या अभ्यासक्रमानुसार शिक्षण मंडळ किंवा व्यवसाय प्रशिक्षण परिषद यांचेमार्फत प्रमाणपत्र वितरीत करण्यात येईल.

’कौशल्य सेतू’ अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना दहावी, बारावीच्या प्रमाणपत्र परीक्षेसाठी ट्रान्सफर ऑफ क्रेडिटस्चा लाभ देण्याबाबत शिक्षण मंडळाचे नियम लागू असतील. भाषा विषय वगळता अन्य कोणत्याही विषयांऐवजी स्किल कोर्स केल्यावर या विद्यार्थ्यांना ट्रान्सफर ऑफ क्रेडिटस्चा लाभ घेता येणार आहे.

Video: नगर जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

Video: नाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

रेसिडेन्शिअल हायस्कूलच्या शिपाईनेच केला अल्पवयीन विद्यार्थीनींचा विनयभंग

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

अहमदनगर | प्रतिनिधी

रेसिडेन्शिअल हायस्कूलमधील शिपाईनेच अल्पवयीन विद्यार्थीनींचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात शिपाई विरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पीडित मुलगी ही शाळेत गेली असता शाळेतील शिपाई आत्माराम बापुराव लगड (वय ५८ रा. आठवड ता. नगर) याने मुलीशी शाळेतच अश्लील वर्तन करुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. मुलगी शाळा सुटल्यानंतर घरी गेल्यानंतर आईला घडलेली घटना सांगितली. त्यानंतर पिडीताच्या आईच्या फिर्यादीवरून शिपाई लगड विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी लगड याला तोफखाना पोलीसांनी अटक केली असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मुंडे हे करीत आहेत.

शिपायाचे विद्यार्थिनीशी अश्‍लील चाळे

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

शहरातील नामांकित हायस्कूल मधील प्रकार

अहमदनगर (प्रतिनिधी) – शाळेत आलेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग करणार्‍या चावट शिपायाला पोलिसांनी अटक केली आहे. शहरातील रेसिडेन्शिअल हायस्कूलमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. आत्माराम बापुराव लगड (वय- 58 रा. आठवड ता. नगर) असे अटक केलेल्या शिपायाचे नाव आहे.

पिडित मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमवारी (दि. 2) आणि बुधवारी (दि. 4) अशा दोन वेळेस शिपायाने मुलीशी गैरवर्तन केले. पिडित मुलीची आई धुणीभांडी करते. मुळची बीड जिल्ह्यातील आष्टी येथील असलेले हे कुटुंब उदरनिर्वाहाकरीता नगरमध्ये वास्तव्यास आहे. सावेडी भागात राहणार्‍या या कुटुंबातील मुलगी शहरातील रेसिडेन्शिअल  हायस्कूलमध्ये शिक्षण घेते. सोमवारी (दि. 2) सकाळी ती नेहमीप्रमाणे शाळेत आली. शिपाई असलेल्या लगडने तिच्याशी सातवीच्या वर्गातच लज्जास्पद वर्तन केले. नको त्या ठिकाणी हात लावत तिच्याशी अश्‍लिल चाळे केले.

शिपायाने बुधवारी (दि. 3) परत तसेच कृत्य केले. त्यामुळे मुलीने झालेला प्रकार घरी पालकांना सांगितला. त्यानंतर पिडित मुलीच्या आईने तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. लगड यांच्याविरूद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंडे हे करीत आहेत.शाळेच्या शिपायाकडूनच असे वर्तन होत असेल तर मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

सलग दुसऱ्या दिवशी सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ; महिलांमध्ये भीतीचे वातावरण

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक | प्रतिनिधी

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुटवड नगर परिसरात एका महिलेच्या गळ्यातून दुचाकीवरून हेल्मेट परिधान करून आलेल्या युवकाने सोनसाखळी ओरबाडून गेल्याची घटना घडल्याने घटनास्थळी उपायुक्त विजय खरात अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी व पोलिस अधिकाऱ्यांनी पाहणी करून परिसरात नाकेबंदी करण्यात आली होती.

आज सलग दुसऱ्या दिवशी सारख्याच पद्धतीने पुन्हा एकदा सोनसाखळी ओरबाडून देण्याची घटना घडल्याने परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण असून लवकरच संबंधित आरोपीला ताब्यात घेतले जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.