Tuesday, May 6, 2025
Home Blog Page 20

Nashik Accident : भाविकांची गाडी उलटल्याने भीषण अपघात; २६ जण जखमी, ५ गंभीर

0

वणी \ नांदुरी | वार्ताहर | Vani – Nanduri 

सप्तशृंगी गडावर (Saptshrungi Gad) नवस पूर्तिसाठी जाणार्‍या भाविकांची (Devottes) गाडी दरेगाव फाट्यानजीक उलटल्याने २६ जण जखमी (Injured) झाले आहेत. तर इतर जखमी भाविकांना पुढील उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ” आज (मंगळवारी) सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास पाथर्डी नाशिक येथून नवसपूर्तीसाठी सप्तशृंगी गडावर जाणरी पिकअप क्रं. एमएच.१५ जि.व्ही.४५३८ ही दरेगाव, ता.कळवण, जि. नाशिक फाट्यानजीक वळणावर चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात लहान मुलांसह एकूण २६ भाविक जखमी झाले.

या अपघाताची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिकेद्वारे जखमींना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचारासाठी आणण्यात आले. जखमींवर उपचार करण्यासाठी शहरातील खाजगी डॉक्टरांना देखील पाचारण करण्यात आले होते. वणी ग्रामीण रुग्णालयात (Vani Rural Hospital) डॉ.विराम ठाकरे,डॉ.अनिल पवार, डॉ. प्रकाश देशमुख, डॉ. योगेश पाटील वणी ग्रामीण रुग्णालयातील डॉ. किशोर मोरे यांनी जखमींवर प्रथमोपचार केले. तर कळवण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बेगाळ यांनी वणी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन जखमींची पाहणी केली.

तर आशाबाई केशव खडसे वय ३५, रोशनी गणेश बांगरे वय १९, प्रियांश अनिल जाधव वय ४, खुशी अनिल बोरकर वय ५,  तनु निंबाजी खंदारे वय ०५, अनिल नामदेव बोरकर वय ३०, आयोध्या अनिल जाधव वय २० , विलास पुंडलिक पारवे वय ४५, नंदा विलास पारवे वय ४०, ओम रामकृष्ण गायकवाड वय १६ , गणेश अंबादास बोरकर वय ७ , हर्षदा अंबादास बोरकर वय २ , शारदा अंबादास बोरकर वय २५ , अंबादास ज्ञानोबा बोरकर वय ३० , रंजना एकनाथ हिवराळे वय ४८ , सखाराम सुदामराव पारवे, वय ३३, राधा सखाराम पारवे वय २५, मनकर्णाबाई शिवाजी खंदारे वय ६०, मनीषा अनिल बोरकर वय २० , गणेश श्रीकांत बांगरे वय २३ , छाया भगवान तांबे वय ३५ , एकनाथ भगवान हिवराळे वय ६५ , शिवाजी तुकाराम खंदारे वय ६० , अर्चना विलास पालवे वय १८ , शोभा निंबाजी खंदारे अशी जखमींची नावे असून, हे सर्व भाविक नाशिक व जालना (Nashik and Jalna) जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

दरम्यान, यातील ५ जण गंभीर जखमी असून, जिल्हा रुग्णालयात (District Hospital) अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. तसेच अपघाताची माहिती मिळताच कळवण पोलीस स्टेशन व नांदुरी आऊट पोस्टचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर जखमींना मदत करण्यासाठी परिसरातील नागरीकांनी धाव घेतली. तर अपघात स्थळापासून जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्याकरिता डॉ. मानटे, डॉ. दिघोळे, डॉ. राठोड, डॉ. भोपळे यांच्यासह रुग्णवाहिका चालक राजेश परदेशी, प्रशांत चव्हाण, प्रशांत पाटील यांनी मदत केली.

Pahalgam Terror Attack : हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख देणार; कॅबिनेटच्या बैठकीत CM फडणवीसांचा मोठा निर्णय

0

मुंबई | Mumbai

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली आज (मंगळवारी) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. या बैठकीत जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील सहा नागरिकांच्या कुटुंबियांना मदत (Help) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबतच इतरही महत्त्वाचे निर्णय आजच्या बैठकीत झाले आहेत.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील (Pahalgam Terror Attack) मृतांच्या नातेवाईकांना ५० लाखांची मदत देण्यात येणार आहे. तसेच या कुटुंबियांच्या (Families) शिक्षण, रोजगाराकडेही राज्य सरकार लक्ष देणार असून,या हल्ल्यात मृत्यू (Death) झालेल्या संतोष जगदाळे यांच्या मुलीला शासकीय नोकरी देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत फडणवीसांनी घेतला आहे.

 

IPL 2025 : Vaibhav Suryavanshi ची वादळी शतकीय खेळी; दिग्गजांकडून पाठीवर कौतुकाची थाप, कोण काय म्हणालं?

0

मुंबई | Mumbai 

आयपीएल २०२५ स्पर्धेत १४ वर्षीय राजस्थान रॉयल्सचा फलंदाज वैभव सूर्यवंशीने आपल्या तुफान फटकेबाजीने हवा केली आहे. काल (सोमवारी) जयपूर येथे राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) फक्त ३५ चेंडूत १०० धावा करत शतक पूर्ण केले. यासह, तो आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय खेळाडू बनला आहे. त्याने आयपीएलमध्ये 37 चेंडूत शतक ठोकणाऱ्या युसूफ पठाणला मागे टाकले. वैभवने केलेल्या या आक्रमक खेळीचे भारतीय संघातील माजी खेळाडूंनी कौतुक केले असून, भारताचा कर्णधार रोहित शर्माने देखील इंस्टाग्राम अकाऊंटवरून स्टोरी शेअर करून त्याचे अभिंनदन केले आहे.

रोहित शर्माने (Rohit Sharma) वैभव सुर्यवंशीची वादळी खेळी पाहून इन्टाग्रामवर पोस्ट करत त्याचे कौतुक केले.’क्लास’ या एका शब्दात रोहित शर्माने आपल्या सर्व भावना मांडल्या आहेत. फक्त आयपीएलच नव्हे तर टी-ट्वेंटी इंटरनॅशनलमध्ये देखील कुणालाच १४ व्या वयात अशी कामगिरी करता आली नव्हती. वैभव सुर्यवंशीची खेळी पाहून मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडूलकर, युवराज सिंग, सुर्यकुमार यादव, एमएस धोनी, हरभजन सिंग, मयंक अग्रवाल, शिखर धवन, युसुफ पठाण यांनी देखील वैभवचे गोडवे गायले असून, त्याच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Image

सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) एक्स अकाउंटवर वैभव सूर्यंवशीच्या वादळी खेळीचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना सचिनने ट्विटमध्ये म्हटले की, वैभवचा निडर दृष्टिकोन, बॅट स्विंगची गती, चेंडूचा टप्पा कुठं पडणार हे ओळखण्याच कसब आणि चेंडू मारताना त्याने लावलेली ताकद हाच त्याच्या सुंदर खेळीचा मंत्र होता, अशा शब्दांत सचिन तेंडुलकरने त्याचे कौतुक केले आहे.

तसेच युसूफ पठाण (Yusuf Pathan) याने वैभव सूर्यंवशीचे अभिनंदन करतांना म्हटले की, वैभवला माझ्या शुभेच्छा आहेत. माझा विक्रम राजस्थानच्या ताफ्यातून खेळणाऱ्या खेळाडूने मोडला त्यामुळे हा विक्रम आणखी खास ठरतो, असे त्याने म्हटले आहे. युसूफ पठाण याने राजस्थानकडून खेळताना २०१० मध्ये ३७ चेंडूत शतक झळकावले होते. तर युवराज सिंगने (Yuvraj Singh) वैभव सूर्यंवशीच्या शतकी खेळीला दाद देत म्हटले की, “हा लहान मुलगा डोळ्याची पापणीही न लावता जगातील सर्वोत्तम गोलंदाजांचा सामना करताना पाहायला मिळतो. वैभव सूर्यंवशी हे नाव लक्षात ठेवा. तो अगदी बिनधास्त खेळताना दिसत असून, नव्या पिढीतील प्रतिभा अभिमानास्पद वाटते, अशा शब्दांत त्याने वैभव सूर्यंवशीच्या खेळीचे कौतुक केले आहे.

टी-२० मध्ये शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू

वैभव सूर्यवंशी टी-२० मध्ये शतक ठोकणारा सर्वात तरुण फलंदाज बनला आहे. त्याने हे काम १४ वर्षे आणि ३२ दिवसांच्या वयात केले. यापूर्वी, विजय झोल १८ वर्षे ११८ दिवसांच्या वयात टी-२० क्रिकेटमध्ये शतक करणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला होता. २०१३ मध्ये महाराष्ट्र विरुद्ध मुंबई यांच्यातील सामन्यात विजय झोलने ही कामगिरी केली होती. वैभव सूर्यवंशीने ३८ चेंडूत १०१ धावांची खेळी केली. यात ७ चौकार आणि ११ षटकारांचा समावेश होता. आयपीएल २०२५ मध्ये मेगा ऑक्शनमध्ये वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्सने १ कोटी १० लाख बोली लावून विकत घेतले होते.

Congress News : संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा, काँग्रेसचे पंतप्रधान मोदींना पत्र

0

दिल्ली । Delhi

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेचे विशेष अधिवेशन तातडीने बोलावण्याची विनंती केली आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून ही मागणी केली. हल्ल्याविरोधात देशाच्या सामूहिक इच्छाशक्तीचा निर्णायक आवाज संसदेत उमटावा, यासाठी हे अधिवेशन बोलावणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

२२ एप्रिल रोजी अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये झालेल्या गोळीबारात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. या क्रूर दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. अशा परिस्थितीत एकतेचा संदेश देण्यासाठी आणि ठोस उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले जावे, अशी काँग्रेसची भूमिका आहे.

खर्गे यांनी पत्रात स्पष्ट केले आहे की, “हा हल्ला केवळ एका भागावरील नव्हे, तर देशाच्या एकात्मतेवरील हल्ला आहे. याला तोंड देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावे लागेल.” संसद ही लोकशाहीचा सर्वोच्च मंच असून, अशा प्रसंगी तिच्यातूनच ठोस निर्णय घ्यावेत, असे काँग्रेसचे मत आहे.

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते असलेले खर्गे आणि राहुल गांधी यांनी संयुक्तपणे या पत्रात सरकारला तातडीने अधिवेशन घेण्याची विनंती केली आहे. त्यात, “दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देण्याची गरज असून, त्यासाठी सामूहिक संकल्प महत्त्वाचा आहे,” असे म्हटले आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी हे पत्र ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले. त्यांनी लिहिले की, “संकटकाळात संसदेला गप्प बसता येणार नाही. जनतेच्या भावना संसदेत उमटायला हव्यात. त्यामुळे काँग्रेसने ही जबाबदारीची भूमिका घेतली आहे.”

हल्ल्यानंतर देशात सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, त्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विस्तृत चर्चा होणे आवश्यक आहे. काँग्रेसने अधिवेशनाद्वारे राष्ट्रीय सुरक्षेची रणनीती, गुप्तचर यंत्रणांचे अपयश आणि भविष्यातील धोरणांवर सुस्पष्ट चर्चा व्हावी, अशी मागणी केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्याकडून या मागणीला कोणती प्रतिक्रिया मिळते, याकडे आता देशाचे लक्ष लागले आहे.

Nashik Crime : युवकाची डोक्यात दगड घालून हत्या

0

नवीन नाशिक | New Nashik

कामटवाडे गावासमोरील (Kamtwade Village) अमरधाम रस्त्यावर एका अल्पवयीन मुलाचा (Boy) तीन ते चार जणांच्या टोळक्याने डोक्यात दाड व फरशी टाकून खून केल्याची घटना सोमवारी (दि.२८) दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. मार्च महिन्यात गंगापूर पोलीस ठाण्याच्या (Gangapur Police Station) हद्दीत संत कबीर नगर येथे झालेल्या खुनाचा बदला घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

करण उमेश चौरे (वय १७, संत कबीरनगर) हा अल्पवयीन तरुण गेल्या आठवडाभरापूर्वी खुनाच्या गुन्ह्यातून (Murder Case) बालसुधारगृहातून सुटून आला होता. स्वतःच्या जीवाला धोका असल्याबाबत करण याने आई-वडिलांना सूचित करून तो दोन दिवसांपूर्वीच कामटवाडे येथे त्याच्या मित्राकडे वास्तव्यास आला होता.

सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास तो कामटवाडे गावासमोरील स्मशानभूमी रस्त्याकडे जात असताना त्याठिकाणी पाळत ठेवून असलेल्या तीन ते चार जणांच्या टोळक्याने त्याच्यावर हल्ला चढवला. यावेळी रस्त्याच्या बाजूला असलेल्या दगड व फरशी टोळक्याने करणच्या डोक्यात टाकल्याने त्याचा जागीच मृत्यू (Death) झाला.

दरम्यान, घटनेची माहिती समजताच उपायुक्त परिमंडळ २ मोनिका राऊत, सहायक आयुक्त अंबड विभाग शेखर देशमुख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राकेश हांडे, चुंचाळे पोलीस चौकीचे वरिष्ठ निरीक्षक मनोहर कारंडे, गुन्हे शाखा युनिट २ चे सहायक निरीक्षक हेमंत तोडकर यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. करणचा खून नेमका कशामुळे झाला, याचा पोलीस (Police) शोध घेत आहे. मारेकऱ्यांच्या शोधासाठी अंबड पोलीस ठाणे व गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आले आहे.

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी पाकिस्तानचा माजी ‘पॅरा कमांडो’

0

दिल्ली । Delhi

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे भीषण दहशतवादी हल्ला झाला. पाच ते सहा दहशतवाद्यांनी पर्यटनासाठी आलेल्या लोकांवर अचानक गोळीबार केला. या क्रूर हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

हल्ल्यानंतर काश्मीरसह संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. विविध ठिकाणी नागरिकांनी निषेध व्यक्त केला आहे. या घटनेने देशाचे मन हेलावून टाकले असून, सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यामागे पाकिस्तानचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. हल्ला करणारे दहशतवादी हे पाकिस्तानचे माजी पॅरा कमांडो होते, असे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. विशेषतः, या कारवाईत हाशिम मूसा नावाच्या पाकिस्तानच्या नागरिकाचा प्रमुख सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

हाशिम मूसा हा पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपचा (SSG) माजी पॅरा कमांडो आहे. सैन्यातील कारकीर्दीनंतर त्याने लष्कर-ए-तैयबा या कुख्यात दहशतवादी संघटनेशी हातमिळवणी केली. गुप्तचर संस्थांच्या माहितीनुसार, मूसा याला विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते आणि त्याला भारतात हल्ला घडवून आणण्याचे आदेश देण्यात आले होते.

मूसा फक्त हल्लेखोर नव्हता, तर हल्ल्यासाठी आवश्यक असणाऱ्या साधनसामग्री आणि प्रशिक्षण पुरवणाऱ्या टीमचा देखील भाग होता. त्याने जम्मू-काश्मीरमध्ये बाहेरून आलेल्या नागरिकांवर, पर्यटकांवर तसेच सुरक्षादलांवर लक्ष केंद्रित करून हल्ला करण्याचे नियोजन केले होते.

या घटनेमुळे भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय तपास संस्थांनी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. तसेच, पाकिस्तानकडून प्रायोजित दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी देशभरातून होत आहे.

सध्या पहलगाम परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू असून, उर्वरित दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी कमालीची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

Pahalgam Terror Attack : मोठी बातमी! भारतीय लष्कराने पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना घेरलं

0

नवी दिल्ली | New Delhi

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू (Death) झाला होता. त्यामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर भारतीय लष्कराकडून गेल्या सात दिवसांपासून फरार असलेल्या या हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध सुरु होता. अखेर या फरार दहशतवाद्यांचा शोध लागला असून, त्यांना भारतीय लष्काराने (Indian Army) घेरल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कारातील अधिकाऱ्यांनी काश्मीरमधील जंगलात लपलेल्या पहलगाम हल्ल्यातील (Pahalgam Terror Attack) सहा दहशतवाद्यांना घेरल्याचे समजते. या दहशतवाद्यांसोबत चकमक सुरु आहे. परंतु, ही चकमक नेमकी कुठं सुरु आहे, त्याबाबत अजून माहिती मिळालेली नाही.

तसेच पहलगाव हल्लामागे दहशतवादी हाशिम मूसाचा हात असल्याचे पुरावे भारतीय तपास संस्थांना मिळाले आहे. मूसा हा पाकिस्तानी नागरिक (Pakistani Citizen) आहे. तो स्पेशल फोर्सेजचा पूर्व कमांडो आहे. त्याला पाकिस्तानच्या स्पेशल सर्विस ग्रुपकडून विशेष प्रशिक्षण मिळाले आहे. त्यानंतर तो लश्कर-ए-तैयबामध्ये सक्रीय झाला.

दरम्यान, पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अद्याप पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये (Kashmir) पोहचले नसल्याचे बोलले जात आहे. त्या दहशतवाद्यांचा शोध गेल्या आठवडाभरापासून सुरु होता. मंगळवारी ते दहशतवादी काश्मीरच्या जंगलांमध्ये सापडले. डोंगराळ भाग असल्यामुळे दहशतवाद्यांना वाहन वापरणे शक्य नव्हते. यामुळे हे दहशतवादी चालतच पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये जात होते, अशी माहिती समोर आली आहे.

Ahilyanagar : राजूरमध्ये आरोग्य विभाग अलर्ट मोडवर!

0

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अकोले तालुक्यातील राजूर गावात दूषित पाण्यामुळे काविळसह जलजन्य आजारांचा उद्रेक झाला असून या ठिकाणी आरोग्य विभागाकडून 35 पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकात 50 आरोग्य सेवक, 9 आशा सेविका, 10 आरोग्य पर्यवेक्षक आणि 10 मेडिकल ऑफिसर यांचा समावेश असून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दोनदा राजूर गावात भेट दिली आहे. दरम्यान 140 बाधितांवर उपचार सुरू आहेत.

राजूर गावाला पाणीपुरवठा करणारे पाण्याचे स्त्रोत दूषित झाल्याने गावातील काविळ आणि जलजन्य आजारांचा उद्रेक झाला. यात 140 मुलांना काविळसह अन्य जलजन्य आजाराची बाधा झाली. यात एका रुग्णाचा मृत्यू झाला असून काही रुग्णांवर गरजेनुसार मुंंबई, पुणे आणि संगमनेर या ठिकाणी उपचार सुरू आहेत. गावात सध्या आरोग्य विभागाच्या 35 पथके कार्यरत असून ते घरोघरी जावून नागरिकांना पाणी उकळून प्यावे आणि आजाराशी काही लक्षणे दिसून आल्यास गरजेनूसार पुढील वैद्यकीय उपचार करण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नागरगोजे यांनी सांगितले.

या ठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी भेट दिली असून गावात दुषित झालेल्या पाणी स्त्रोताची पाहणी त्यांनी केली. तसेच गावातील पाणी शुध्दीकरण प्रकल्प कार्यान्वित करून घेतला असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. सध्या राजूर गावात 35 पथकात 50 आरोग्य सेवक, 9 आशा सेविका, 10 सुपरवायजर आणि 10 मेडिकला ऑफिसर काविळच्या उद्रेकावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत.

ग्रामीण रुग्णालयात जादा डॉक्टरांची नेमणूक
राजूर या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय कार्यरत आहे. याठिकाणी जलजन्य आजारांच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी तीन अतिरिक्त डॉक्टरांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. यात फिजिशियन, बालरोग तज्ज्ञ आणि आणखी भूलतज्ज्ञ अशा तिघांचा समावेश आहे. याबाबतचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोजी चव्हाण यांनी काढले आहेत.

Ahilyanagar : मंत्रिमंडळ बैठकीसाठी अधिकार्‍यांवर जबाबदारी निश्चित

0

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

चोंडी (ता. जामखेड) या ठिकाणी होणार्‍या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीची तयारी प्रशासनाच्यावतीने सुरू आहे. येत्या 6 मे रोजी ही बैठक होणार असल्याचे प्रस्तावित असून बैठकीच्या नियोजनाची तयारीचा भाग म्हणून जिल्हा पातळीवरील विविध अधिकार्‍यांवर बैठकीच्या व्यवस्थेची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे.

जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळ बैठक नियोजन समितीची जबाबदारी जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोर, जिल्हा परिषद बांधकाम विभाग दक्षिणेचे कार्यकारी अभियंता सागर चौधरी व गटविकास अधिकारी जामखेडचे राहुल शेळके यांच्यावर सोपविण्यात आली आहे. यासह बैठकीसाठी आवश्यक असणार्‍या विविध बाबींच्या पूर्ततेसाठी वेगवेगळ्या निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत.

याची जबाबदारी बांधकाम विभागाची कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव, जिल्हा परिषदेची मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे, व उपमुख्य कार्यकारी अधिकारी लेखा राजू लाकुडझोडे, समन्वय अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी अरूण उंडे, उपजिल्हाधिकारी भूसंपादन अतुल चोरमारे, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, उपचिटणीस गृह शाखा मयूर बेरड, सहाय्यक महसूल अधिकारी स्वप्निल फलटणे, संदेश दिवटे निलेश सोनसळे.
कार्यक्रमस्थळ समिती प्रमुखपदी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरत कुमार बाविस्कर, महावितरण विभागाचे अधीक्षक अभियंता रमेश पवार, रोजगार हमी विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप सोनकुसळे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब नन्नवरे, जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चव्हाण, सुप्रिया कांबळे, जामखेड नगर परिषदेची सुरेश साळवे, ऊर्जा व कामगार विभागाच्या विद्युत निरीक्षक राजश्री गीते, स्वागत समितीच्या प्रमुखपदी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय अधिकारी संगमनेर शैलेश शिंदे, तहसीलदार धीरज मांजरे, उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार मुदगल, वाहन तर समितीच्या प्रमुख अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, बांधकाम विभाग उपअभियंता शशिकांत सुतार, वाहतूक विभागाची निरीक्षक बाबासाहेब बोरसे, मोटर वाहन निरीक्षक सावंत पाटील, कर्जत नगर पालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय जायभाय यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

यासह विश्रामगृह व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था व वाहतूक नियोजन, भोजन व्यवस्था, खाद्य पदार्थ तपासणी समिती, वाहन चालक अधिकारी समन्वय समिती, मीडिया समिती, रांगोळी व सजावट, वैद्यकीय सेवा समिती, अग्निशामन व पिण्याचे पाणी स्वच्छता समिती, सुरक्षा पासेस, विद्युत व्यवस्था, तांत्रिक कक्ष, आपत्ती व्यवस्थापन समिती, नोडल अधिकारी या ठिकाणी विविध अधिकार्‍यांच्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान मंत्रीमंडळाची बैठक आधी 29 एप्रिला होती. मात्र, तांत्रिक कारणामुळे ही बैठक 6 मे रोजी असल्याचे सांगण्यात आले. बैठकीबाबत अद्याप निश्चित तारीख जाहीर झालेली नसली तरी जिल्हा प्रशासानाच्यावतीने बैठकीचे नियोजन सुरू आहे. वेगवेगळ्या पातळीवर समितीनिहाय अधिकारी नियोजनात व्यस्त असल्याचे सांगण्यात आले.

जिल्हाधिकारी आज चौंडीत
चोंडी येथे होणार्‍या या बैठकीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह प्रत्येक मंत्र्यासाठी स्वतंत्र अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. यासह 600 व्हिआयपी आणि अन्य दोन हजार व्यक्तीसाठी भोजन, पाणी अन्य व्यवस्था करण्यात आलेली आहे. दरम्यान, बैठकीच्या पूर्व तयारीसाठी आज जिल्हाधिकारी डॉ. पंकज आसिया स्वत: चोंंडीला जात त्या ठिकाणी आढावा घेण्यार आहे. साधारणपणे 6 मे रोजी बैठक होईल, त्यादृष्टीने नियोजन सुरू असल्याचे सांगण्यात आले. 

Ahilyanagar : दाखल पात्र विद्यार्थ्यांसोबत निरक्षर व्यक्ती शोधा

0

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

देशातील 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन, लेखन) व संख्याज्ञान विकसित करून साक्षर केले जाणार आहे. यासाठी उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी गावागावांत निरक्षरांचे उल्हास अ‍ॅपवर नाव नोंदवायचे असून या माध्यमातून सर्वेक्षण केले जाणार आहे. दरम्यान, शाळा सुरू होण्यापूर्वी राबवण्यात येणार्‍या दाखल पात्र विद्यार्थ्यांच्या शोध मोहिमेसोबत आता त्या-त्या गावातील निरक्षर यांना शोधण्याची जबाबदारी प्राथमिक शिक्षकांवर सोपवण्यात आली आहे. यामुळे यंदा गुरूजींना शाळेसाठी विद्यार्थ्यांसोबत निरक्षरांना शोधण्याची दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.

असाक्षर व्यक्तींच्या जीवनामध्ये प्रकाश उजाडावा, यासाठी शासनाने पाऊल उचलले आहे. असाक्षरांमध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जागरूकता, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण आदी बाबींचा विकास करण्यासाठी कौशल्य विकसित केले जाणार आहे. यामाध्यमातून निरक्षरांना साक्षर केले जाणार आहे. उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांना साक्षर करणे आहे. नवसाक्षर लोकांना वाचणे, लिहिणे याच बरोबर गणित, बँकेचे व्यवहार येणे आवश्यक आहे. जिल्ह्यात साक्षरतेची टक्केवारी वाढण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गजेचे आहे. निरक्षर नागरिकांना साक्षर बनवून त्यांचे सक्षमीकरण होणे महत्वाचे आहे. राज्य शासन अनेक महत्वपूर्ण योजना राबवित आहे. याचाच हा एक भाग आहे. विशेष म्हणजे, मार्च 2025 मध्ये निरक्षरांची परीक्षा घेण्यात आली. या परिक्षेचा निकालही लागला आहे.

प्रौढ नवसाक्षरांसाठी निरंतर शिकण्याच्या प्रक्रियेतील एक भाग म्हणून देशातील 15 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्ये विकसित केली जाणार आहेत. त्याची अंमलबजावणी केंद्र आणि राज्य, केंद्रशासित प्रदेश स्तरावरील संबंधित विभागाच्या साहाय्याने केली जात आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, गटस्तरीय, शाळास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे.

रम्यान, नगर जिल्ह्यात असाक्षर असणार्‍या 32 हजार 20 नागरिकांना साक्षर करण्याचे उद्दिष्टे देण्यात आलेले आहे. निरक्षरांसाठी यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्या आधी म्हणजे 15 जूनपूर्वी विशेष मोहिम राबवण्यात येणार आहे. दरवर्षी जिल्ह्यात पहिले तर आठवीपर्यंतच्या सर्व इयत्तेत दाखल होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना दाखल पात्र विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात येते. यंदा या सर्वेक्षणासोबत निरक्षर असणार्‍या व्यक्तीसाठी शोध मोहिम राबवण्यासाठी त्यांना साक्षर करण्यासाठी त्यांची नोंदणी करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागात (योजना) यांच्यावतीने सांगण्यात आले.