Tuesday, May 6, 2025
Home Blog Page 23

Pahalgam Terror Attack : “हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना…”; PM मोदींचा ‘मन की बात’मधून इशारा

0

नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज ‘मन की बात’ (Mann ki Baat) या त्यांच्या रेडिओ कार्यक्रमाच्या १२१ व्या भागामध्ये देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी पहलगाम हल्ल्यावर (Pahalgam Attack) भाष्य करत पीडित कुटुंबांना (Families) न्याय देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “जेव्हा मी तुमच्याशी मनापासून बोलतो तेव्हा माझ्या मनात खूप वेदना होतात. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने प्रत्येक नागरिकाला दुःख झाले आहे. प्रत्येक भारतीयाची शोकग्रस्त कुटुंबांबद्दल तीव्र सहानुभूती आहे. दहशतवादी आणि त्यांचे आका काश्मीर पुन्हा उद्ध्वस्त करू इच्छितात आणि म्हणूनच त्यांनी एवढा मोठा कट रचला. दहशतवादाविरुद्धच्या आपल्या या लढाईत संपूर्ण जग १४० कोटी भारतीयांसोबत उभे आहे. ही एकता दहशतवादाविरुद्धच्या आपल्या निर्णायक लढाईचा आधार आहे. मी पुन्हा एकदा पीडित कुटुंबांना आश्वासन देतो की,त्यांना न्याय मिळेल, न्याय नक्कीच मिळेल. या हल्ल्यातील गुन्हेगारांना (Criminal) आणि कट रचणाऱ्यांना सर्वात कठोर उत्तर दिले जाईल, असे त्यांनी म्हटले.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, “पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचे (Terrorist Attacks) फोटो पाहून प्रत्येक भारतीयाचे रक्त सळसळ करत आहे. हा हल्ला दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांचा भ्याडपणा दर्शवितो. या काळात काश्मीरमध्ये शांतता परतत होती, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये चैतन्य होते, बांधकाम कामांना अभूतपूर्व गती मिळाली होती, लोकशाही मजबूत होत होती, पर्यटकांच्या संख्येत विक्रमी वाढ होत होती, लोकांचे उत्पन्न वाढत होते, तरुणांसाठी नवीन संधी निर्माण होत होत्या. मात्र, हे देशाच्या शत्रूंना, जम्मू आणि काश्मीरच्या शत्रूंना हे आवडले नाही. या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून सतत शोक व्यक्त केला जात आहे. तसेच अनेक जागतिक नेत्यांनीही मला फोन केले असून, पत्रे आणि संदेश पाठवले आहेत, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले.

दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ पर्यटकाचा मृत्यू झाला. जे दहशतवादी यामध्ये सहभागी झाले त्यांच्या घरावर बुलडोझरची कारवाई केली जात आहे. तसेच त्यांना मदत केली त्यांच्यावरही अटकेची कारवाई करण्यात येत आहे. तर या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे लक्षात येताच भारताने कठोर कारवाई करत सिंधु जल करार रद्द केला आहे. त्यासोबतच व्यापार देखील बंद केला आहे.

 

Jalgaon Crime : प्रेमविवाह केल्याच्या रागातून बापाकडून मुलीची गोळ्या झाडून हत्या

0

चोपडा | प्रतिनिधी | Chopda

जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) चोपडा शहरात (Chopda City) मुलीने प्रेमविवाह (Love Marriage) केल्याच्या रागातून सेवानिवृत्त सीआरपीएफ बापाने मुलीसह जावयावर गोळीबार (Firing) केला आहे. या गोळीबारात मुलीचा मृत्यू झाला असून, जावई गंभीर जखमी आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, किरण मांगले (Kiran Mangale) असे गोळीबार केलेल्या बापाचे नाव असून, ते सीआरपीएफतून (CRPF) सेवानिवृत्त झालेले आहेत. मुलीने प्रेमविवाह केल्याचा रागातून मांगले यांनी पिस्तूलातून तीन राउंड फायर करत पोटच्या मुलीची हत्या (Murder) केली. तर गोळीबारात जावई गंभीर जखमी झाला आहे. साधारणता वर्षभरापूर्वी मांगले यांच्या मुलीने अविनाश वाघ याच्याशी प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर हे दाम्पत्य पुण्यात (Pune) राहत होते.

यानंतर काल (शनिवारी) ते चोपडा येथे अविनाशच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी आले होते. याची माहिती मिळताच किरण मांगले यांनी चोपड्यात थेट हळदीच्या ठिकाणी पोहोचत आपल्या जवळील बंदुकीतून (Gan) मुलीवर गोळ्या झाडल्या. यात तिचा जागीच मृत्यू (Death) झाला. तर जावई गंभीर जखमी झाला आहे. यावेळी तेथील जमावाने मांगले यांना चांगलाच चोप दिल्याने ते देखील गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, मांगले यांच्यासह जावयाला जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात (Jalgaon District Hospital) दाखल करण्यात आले असून, त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच घटनेची माहिती मिळताच पोलीस (Police) अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी दाखल होत पुढील तपास सुरू केला आहे. या ऑनर किलिंगच्या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे.

 

 

 

Devendra Fadnavis : “एकही पाकिस्तानी नागरिक…”; CM फडणवीसांचे मोठे विधान, नेमकं काय म्हणाले?

0

पुणे | Pune 

देशाच्या सुरक्षेसाठी कडक निर्णय घ्यावे लागतात. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) पाकिस्तानी लोकांना (Pakistani People) देश सोडण्याची नोटीस दिली आहे. त्यांना परत जाण्याच्या सूचनाही करण्यात आलेल्या आहेत. ४८ तासांत ते देश सोडून न गेल्यास त्यांच्यावर कारवाई (Action) करण्यात येणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. यानंतर आता पाकिस्तानी नागरिकांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यात बोलतांना आणखी एक मोठे विधान केले आहे

भारत सरकारच्या (India Government) अल्टिमेटमनंतर पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचा आज (दि. २७ एप्रिल) शेवटचा दिवस आहे. मायदेशी परतण्यासाठी अटारी सीमेवरून पाकिस्तानी रवाना होत आहेत. भारताने पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा आजपासून रद्द केले आहेत. पाकिस्तानी नागरिकांना (Pakistani Citizens) दिलेले वैद्यकीय व्हिसा देखील २९ एप्रिलपर्यंतच वैध असणार आहेत..

यावेळी फडणवीस म्हणाले की, “मी आपल्याला गृहमंत्री म्हणून सांगतो पाकिस्तानी नागरिकांसंदर्भात कृपया चुकीच्या बातम्या करु नका. माध्यमांनी १०७ नागरिक हरवले असल्याच्या बातम्या केल्या आहेत. परंतु राज्यातील एकही पाकिस्तानी नागरिक हरवलेला नाही. जेवढे पाकिस्तानी आहेत ते सर्व सापडले आहेत. सर्व बाहेर चालले आहेत. सगळ्यांची बाहेर घालवायची व्यवस्था केली आहे. राज्यात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत सर्वांना परत पाठवण्यात येणार”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, काल (शनिवारी) गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी माध्यमांशी बोलतांना राज्यातील ४८ शहरात एकूण ५०२३ पाकिस्तानी नागरिक आढळल्याचे म्हटले होते. यात नागपूर शहरात सर्वाधिक २ हजार ४५८ तर ठाणे शहरात ११०६ पाकिस्तानी नागरिक सापडले आहेत, असे कदम म्हणाले होते. तसेच यामधील फक्त ५१ पाकिस्तान्यांकडे वैध कागदपत्रे मिळाली आहेत. तर महाराष्ट्रात आलेले १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आल्याचे त्यांनी म्हटले होते. यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले.

 

 

 

 

Nashik Crime : सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून; १४ जणांविरुध्द तक्रार

0

नाशिक | Nashik

तडीपारीची शिक्षा भोगून परत आलेल्या प्रवीण उर्फ भैय्या गोरक्षनाथ कांदळकर (२७) याचा सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) शहा (Shah) येथील घरात शिरून गावातीलच १४ जणांनी कोयता, कुन्हाड, लोखंडी रॉड, लाकडी दांड्याच्या सहाय्याने खून (Murder) केल्याची घटना शनिवार (दि. २६) सकाळी ११ च्या दरम्यान घडली. याप्रकरणी मयत प्रवीणच्या आई विजया कांदळकर (४४) यांनी बाबी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

तक्रारीत पुढे म्हटले आहे की, तडीपारीची दोन वर्षांची शिक्षा भोगून आलेला प्रवीण शुक्रवारी (२५) रात्री दहाच्या सुमारास घरी आला व तो घरातच झोपलेला होता. आज सकाळी आंघोळीनंतर चहा-नाश्ता करून तो घरातच असताना ११ च्या सुमारास घराच्या लोखंडी सेफ्टी दरवाजावर काहीतरी फेकून मारल्याचा आवाज आल्याने विजया व त्यांचे पती गोरक्षनाथ दरवाजाची कड़ी उघडून बाहेर गेले असता गावातीलच सौरभ गोराणे, दिनेश वाळीबा गोराणे, बाळीचा गोराणे, शरद दिगंबर गोराणे, विजय दिगंबर गोराणे, सचिन गोरख बागल, राहुल गोरख बागल, अतुल अशोक गोराणे, आबा गोटीराम गोराणे, रवींद्र गोटीराम गोराणे, वैभव विलास गोराणे, दगू सामे (रा. अस्तगाव), गणेश सोनवणे, सर्जेराव रघुनाथ गोराणे या हातात कोयता, कुन्हाडी, लोखंडी रॉड, लाकडी दांडे घेऊन घरात (House) शिरण्याचा प्रयत्न केला.

त्यांनी प्रवीण हा जास्त शहाणा झाला का? आम्हाला धमकी देतो तो घरात आहे का असे म्हणत सर्वांनी घरात शिरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा गोरक्षनाथ व विजया यांनी त्यांना आडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गोरक्षनाथ यांना मारहाण (Beating) करीत घराबाहेर उभ्या असलेल्या मोटरसायकलवर फेकून देण्यात आले. तर विजया यांनाही घराच्या बाहेर लोटून देत सर्व घरात शिरले. त्यावेळी दोघा पती-पत्नीने मद‌तीसाठी आरडाओरड केली. मात्र, घरात शिरणाऱ्यांच्या हातातील हत्यारे पाहून मदतीला कोणीही धावून आले नसल्याचे विजया यांनी तक्रारीत म्हटले आहे. तरीही हिम्मत करत दोघेही घरात जाऊन सर्वांच्या हाता पाया पडले व मुलाला सोडून देण्याची विनंती त्यांना केली.

मात्र, कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. घरातला गॅस (Gas) चालू करून घर पेटवण्याची भाषा काहींनी सुरू केली. त्यानंतर सर्जेराव, दिनेश, अतुल गोराणे यांनी त्यांच्या हातातील कोयत्याने प्रवीण उर्फ भैय्याच्या डोक्यात, हाता-पायावर मारून त्याला जखमी केले तर अजून चौघांनी हातातील लोखंडी रॉडने भैय्याच्या डोक्यात, नाकावर, तोंडावर, हातापायावर मारून त्याला जखमी (Injured) केले. वाळीबा गोराणे यांनी काठीने तर शरद गोराणेने कुऱ्हाड डोक्यात मारली. विजय गोराणेने कोयत्याने पाठीवर वार केले. तर काहींनी विजया व गोरखनाथ यांनाही मारहाण करण्यात सुरुवात केल्याने ते घराबाहेर पळाले.

त्यानंतर जखमी प्रवीण उर्फ भैव्याला घरातून बाहेर ओढून अंगणात फेकून सर्व चौदा लोक पसार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दोघांनी भैय्याच्या जवळ जाऊन पाहिले असता त्याच्या डोके, नाक, तोंडातून रक्त निघत होते. तर तो बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. त्याचे पायही मोडलेले होते. सदर घटनेची माहिती मिळताच वावी पोलिसांचे (Vavi Police) पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांच्या मदतीने चुलतभाऊ राजेंद्र कांदळकर यांच्या गाडीत टाकून भैय्याला बाबीच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी सिन्नरच्या ग्रामीण रूणालयात (Sinnar Rural Hospital) घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर खणवाहिकेतून सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मयत घोषित केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, मयत भैय्या हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात (Police Station) गुन्हे दाखल होते. गावासह परिसरात अनेकांना त्याने त्रास दिलेला होता. नुकत्याच झालेल्या कालभैरवनाथ महाराजांच्या यात्रेत भैव्या व गोराणे कुटुंबामध्ये वाद झाल्याची चर्चा आहे. त्यातूनच ही घटना घडल्याची चर्चा होत आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे व हवालदार शहाजी शिंदे करीत आहेत.

वकिलांनी कायदेशीरदृष्ट्या अद्ययावत रहावे – न्या. जैन

0

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्‍या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा नाशिक जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती जितेंद्र शां. जैन यांनी केले.

न्यायमूर्ती जैन यांनी शनिवारी (दि. 26) नाशिकरोड न्यायालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी बार रूममध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी न्या. जैन म्हणाले की, न्यायदान प्रक्रियेत वेगवेगळ्या प्रकरणांत निकाल दिले जातात. त्या निकालांचा वकिलांनी अभ्यास करावा. तसेच दरमहा एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण निकालावर बार असोसिएशनच्या माध्यमातून चर्चासत्राचे आयोजन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी नाशिकरोड बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुदाम गायकवाड यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. न्या. जैन यांनी येथील वकिलांना दैनंदिन कामकाजात येणार्‍या समस्या व अडचणी जाणून घेतल्या. नाशिकरोड येथे दोन महिन्यांपूर्वी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर या दोन न्यायालयांचे कामकाज सुरू झाले आहेत. तथापि अपुर्‍या कर्मचारी संख्येमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने अ‍ॅड. सुदाम गायकवाड यांनी वाढीव कर्मचार्‍यांची मागणी करून तसे आदेश जिल्हा न्यायाधीशांना देण्याची विनंती केली. यावेळी वकिलांनी उपस्थित केलेल्या समस्या व प्रश्नांना न्या. जैन यांनी समाधानकारक उत्तरे दिले.त्यानंतर नाशिकरोड कौटुंबिक न्यायालयातही न्या. जैन यांनी भेट देत तेथील अडचणींचा आढावा घेतला.

यावेळी अ‍ॅड. चैताली कुटे यांनी येथील कौटुंबिक न्यायालयाच्या स्थलांतरास विरोध करताना या न्यायालयास नाशिकरोड हेच सर्वार्थाने कसे योग्य आहे, याबाबत अभ्यासात्मक विवेचन करून सोदाहरण स्पष्ट केले. येथील रेल्वे कनेक्टिव्हीटी, इतर सुविधा व पक्षकारांच्या दृष्टीने असणार्‍या सर्व सोयींबाबत अ‍ॅड. वर्षा देशमुख यांनी न्यायमूर्तीसमोर बाजू मांडली. नाशिकरोड येथे अतिरिक्त कौटुंबिक न्यायालयास मंजुरी मिळालेली असून कोर्ट हॉल देखील तयार आहे, केवळ त्याचे अधिकृत उद्घाटन बाकी असल्याने ते लवकरात लवकर करावे, अशी विनंती अ‍ॅड. सुदाम गायकवाड यांनी केली.

याप्रसंगी नाशिकचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी, नाशिकरोड जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. एम. दळवी यासह नाशिकरोड न्यायालयातील सर्व न्यायाधीश आदींसह नाशिकरोड बार असोसिएशनचे अ‍ॅड. बी. बी. आरणे, अ‍ॅड. संग्राम पुडे, अ‍ॅड. प्रमोद कासार, अ‍ॅड. मनीषा बेदरकर, अ‍ॅड. दमयंती दोंदे यांच्यासह ज्येष्ठ वकील सुहास पाठक, चंद्रभान पुंडे, योगेश सारडा, राजेंद्र बघडाणे, शिरीष पाटील, विजय शिंदे, संजयकुमार मुठाळ, ब्रिजेश रामराजे, दीपक बर्वे, धम्मपाल रुपवते, अभय परदेशी, नीता शेलार, जयंत शेलार, संदीप बनसोडे, अनिकेत वाडेकर, प्रेमनाथ पवार, पौर्णिमा पगारे, विद्या जाधव आदी वकील सभासद व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन अ‍ॅड. उमेश साठे यांनी केले.

 

दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सांत्वन

0

पुणे । प्रतिनिधी Pune

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे या पर्यटकांच्या घरी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

आतापर्यंत ज्याप्रमाणे आपण खंबीर राहिले त्याचप्रमाणेच यापुढेही खंबीर राहावे, राज्य शासन आपल्या दुःखात सहभागी असून आपल्या पाठीशी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना धीर दिला.

यावेळी गणबोटे यांच्या गंगानगर कोंढवा येथील घरी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार योगेश टिळेकर, सुनील कांबळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी संगीता गणबोटे, मुलगा तुषार, कुणाल, स्नुषा कोमल गणबोटे उपस्थित होते.

जगदाळे यांच्या कर्वेनगर येथील निवासस्थानी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, सुनील कांबळे, स्व. संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे, मुलगी आशावरी जगदाळे आदी कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

यावेळी गणबोटे यांच्या पत्नी आणि मुलांनी तसेच जगदाळे यांच्या पत्नी आणि मुलगी यांनी घडलेल्या घटनेबाबत सविस्तर माहिती सांगितली.

 

तडीपार गुन्हेगाराची हत्या

0

वावी । वार्ताहर Vavi

तडीपारीची शिक्षा भोगून परत आलेल्या प्रवीण उर्फ भैय्या गोरक्षनाथ कांदळकर (27) याचा तालुक्यातील शहा येथील घरात शिरून गावातीलच 14 मुलांनी कोयता, कुर्‍हाड, लोखंडी रॉड, लाकडी दांड्याच्या सहाय्याने खून केल्याची घटना आज (दि.26) सकाळी 11 च्या दरम्यान घडली.

दरम्यान, घडलेल्या प्रकारानंतर प्रवीण उर्फ भैय्याला सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याला तपासून मयत घोषित केले . या बाबतची तक्रार मयत प्रवीणच्या आई विजया कांदळकर (44) यांनी वावी पोलीस ठाण्यात दिली आहे.

पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे व हवालदार शहाजी शिंदे करीत आहेत.

 

Pahalgam Terror Attack : कागदी घोडे नाचवणे थांबवा, ठोस कारवाई तुम्ही करणार आहात का?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल

0

पुणे(प्रतिनिधी)

राज्यकर्ते केवळ कागदी घोडे नाचवत आहेत. पण, आता हे थांबवा. ठोस कारवाई करा. दहशतवाद्यांची ट्रेनिंग सेंटर उद्धवस्त करा, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पत्रकार परिषदेत दिला.

याबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले, तुम्ही एवढी हत्यारे, विकत घेता. पाणबुडय़ा घेता. जहाजे निर्माण करता. पण, त्या सगळय़ांचा उपयोग काय? पहलगाम हल्ल्यानंतर तुम्ही ठोस ऍक्शन घेणार आहात का? कागदी घोडे नाचवणे थांबवा. ठोस कारवाई तुम्ही करणार आहात का? जे काही दिसते, त्याला आर्मी उत्तर द्यायला तयार आहे. पण निर्णय घेण्याची राजकीय कमतरता निर्माण झाली आहे. म्हणूनच राज्यकर्त्यांनी काय तो एकदाचा निर्णय घ्यावा. सरकारला, शासनाला लोकांचा पाठिंबा आहे. लोक नक्कीच शासनाच्या निर्णयाबरोबर राहतील.

दहशतवादाविरोधात विविध देशांनी भारताला पाठिंबा दर्शवला आहे. तरीसुद्धा कारवाई होत नाही. माझे नेहमी म्हणणे असते. युद्ध करणे वा न करणे हा भाग वेगळा. पण जिथे हशतवाद्यांची टेनिंग सेंटर्स आहेत. ती उद्धवस्त केली पाहिजेत. दहशतवाद्यांचे तळ पाकिस्तानच्या अंतर्गत आहेत. अशा वेळी तुम्हाला ते काय करतात? याच्यापेक्षा तुम्ही काय करू शकता? याचा पहिल्यांदा विचार होणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. पाणी करार स्थगित करणार. मग नद्यांचे पाणी वापरणार कसे, अडवणार कसे, याचेही उत्तर मिळायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

काही नेत्यांचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न

धर्म विचारून गोळी मारली, यावर काही होय म्हणतात, तर काही नाही म्हणतात. मात्र, काही राजकीय नेते नरेटीव्ह सेट करत आहेत. गेले ते भारतीय आहेत. ख्रिश्चन, मुस्लिम पण मारले गेले आहेत, असे सांगत सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान जात नाहीत. म्हणजे ते किती गंभीर आहेत, हे लक्षात येते. मी बैठकीत असतो, तर वॉक आउट केले असते. सरकारने पर्यटकांना बाहेर काढणे, ही चूक केली. खरे तर त्यांना सपोर्ट द्यायला हवा होता. पर्यटकांच्या मनात भीती नव्हती. त्यांना सुरक्षा मिळणार की नाही, हा प्रश्न होता. सरकारने पर्यटकांचा खर्च करायला हवा होता, असे आंबेडकर यांनी या वेळी सांगितले.

J. P. Nadda : “देशावर आलेले संकट निवारण्यासाठी आणि….”; जे. पी. नड्डाचं गणपती बाप्पाला साकडं

0

पुणे (प्रतिनिधि)

दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये केलेल्या हल्ल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सडेतोड उत्तर दिले जाईल. या संकटातून देश ताकदीने पुढे जाईल. जे दोषी आहेत, त्यांना योग्य उत्तर देण्याकरिता गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळो, अशी प्रार्थना भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शनिवारी दगडूशेठ बाप्पा चरणी केली.

पुणे दौऱयावर असताना जे. पी. नड्डा यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे नड्डा यांचे स्वागत व सन्मान मंदिरात करण्यात आला. या वेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राजेश पांडे, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, तुषार रायकर, सचिन आखाडे आदी उपस्थित होते. या वेळी ट्रस्टचे सरचिटणीस व आमदार हेमंत रासने यांनी नड्डा यांना ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची माहिती देखील दिली.

नड्डा म्हणाले, काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सगळा देश हादरून गेला आहे. ज्याप्रकारे आतंकवादी हल्ला झाला, त्याचप्रकारे दोषी असणाऱयांना उत्तर दिले जाईल. या संकटातून देश ताकदीने पुढे जाईल तसेच बुद्धी व शक्तीच्या माध्यमातून भारत या संकटकाळातून बाहेर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भारतातून दहशतवादाचे भय निर्वाण होवो…

भारतातून दहशतवादाचे भय निर्वाण होवो… सर्वत्र कायदा सुव्यवस्था अबाधित राहो… परराष्ट्र शक्तींचे निर्वाण होवो… देशबांधवांना सुस्थिती प्राप्त होवो… असा संकल्प करीत त्यांनी ‘दगडूशेठ’ गणपतीला अभिषेक केला.

जे. पी. नड्डा म्हणाले, आज गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आलो. दहशतवाद्यांनी पेहलगाम मध्ये जे कृत्य केले, त्याला याला सडेतोड उत्तर देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आमची अपेक्षा आहे. या संकटातून देश ताकतीने पुढे जाईल आणि जे यामागे दोषी आहेत, त्यांना योग्य उत्तर देण्याकरिता गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळो. तसेच बुद्धी व शक्तीच्या माध्यमातून भारत या संकटकाळातून बाहेर येईल. याकरिता पंतप्रधान मोदी यांना शक्ती प्रदान होवो, ही प्रार्थना त्यांनी यावेळी केली.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बिमोड करून शत्रूला भरपूर चोख उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शक्ती द्यावी, अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी केली असल्याचे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी शनिवारी सांगितले.

Pahalgam Terror Attack : हल्ल्यानंतर भारतीय सैन्याची मोठी कारवाई; अनंतनागमध्ये १७५ संशयित ताब्यात

0

नवी दिल्ली | New Delhi

जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा अतिशय अलर्ट मोडवर आहेत. भारतीय लष्कराने मोठी कारवाई करत अनंतनाग (Anantnag) जिल्ह्यात तब्बल १७५ संशयितांना ताब्यात घेतले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर अनंतनाग पोलीस, लष्कर, सीआरपीएफ (CRPF) आणि इतर एजन्सींच्या संयुक्त पथकांनी जिल्ह्यात शोध मोहीम सुरु केली आहे. या कारवाई आतापर्यंत काही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. तर काही दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांकडून सध्या दक्षिण काश्मीरमध्ये (South Kashmir) कारवाई सुरु आहे. सुरक्षा दलांनी गेल्या ४८ तासांत १७५ हून अधिक संशयित ताब्यात घेतले आहेत. तसेच काश्मीरमध्ये एकूण १४ स्थानिक दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडमध्ये आहेत. सुरक्षा दलांकडून मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवली जात आहे. तसेच पोलिसांकडून (Police) सर्वसामान्य नागरिकांना देखील महत्त्वाचे आवाहन केले जात आहे. काही संशयास्पद हालचाली आढळल्यास पोलिसांना तातडीने कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशातील २७ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर सरकारने देखील पहलगाम येथे सुरक्षेत काही चुक झाली असल्याची कबुली दिली होती. आता या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करण्यास सुरुवात केल असून, अनेक संशयितांना (Suspected) ताब्यात घेण्यात येत आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारने देखील कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. केंद्राने भारतात असणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना २७ एप्रिलपर्यंत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. तर २९ एप्रिलनंतर सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्याचे आदेशही केंद्र सरकारने दिले आहे. त्यासोबतच पाकिस्तानशी असणारा सिंधू पाणी करार देखील सरकारकडून स्थगित करण्यात आला आहे.

गुप्तचर यंत्रणांनी तयार केलेल्या यादीतील काही दहशतवाद्यांची माहिती पुढीलप्रमाणे

१) आदिल रहमान देंतू – हा लष्कर-ए-तोयबा (LET) या संघटनेचा सोपोरमधील कमांडर आहे. तो २०२१ पासून दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय आहे. सध्या तो सोपोरचा जिल्हा कमांडर म्हणून काम पाहतो. तपास यंत्रणा त्याचा शोध घेत आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर, आता तो मारला जाईल किंवा त्याचे घर जमीनदोस्त केले जाईल.

२) आसिफ अहमद शेख – हा जैश-ए-मोहम्मद (JeM) या संघटनेचा दहशतवादी आहे. तो अवंतीपुराचा जिल्हा कमांडर आहे. २०२२ पासून तो सतत दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी आहे.

३) एहसान अहमद शेख – हा पुलवामामध्ये सक्रिय असलेला लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आहे. तो २०२३ पासून दहशतवादी कारवायांमध्ये सामील आहे. सुरक्षा यंत्रणा त्याचा शोध घेत आहेत.

४) हरीश नजीर – हा पुलवामाचा दहशतवादी आहे आणि लष्कर-ए-तोयबामध्ये सक्रिय आहे. तो सुरक्षा दलाच्या रडारवर आहे.

५) आमिर नजीर वाणी – हा पुलवामामध्ये सक्रिय असून जैश-ए-मोहम्मद या संघटनेशी संबंधित आहे.

६) यावर अहमद भट्ट – हा जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी असून पुलवामामध्ये सक्रिय आहे.