Monday, May 5, 2025
Home Blog Page 27

Pahalgam Terror Attack : महाराष्ट्र सरकारकडून काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना आणण्यासाठी आणखी एका विमानाची व्यवस्था

0

मुंबई | Mumbai

जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाममध्ये दोन दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ला झाला होता. या दहशतवादी हल्ल्यात देशातील २५ आणि नेपाळमधील एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. यात महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर महाराष्ट्रातून (Maharashtra) जम्मू आणि काश्मीरला पर्यटनासाठी गेलेले शेकडो नागरिक अडकले आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे.

यानंतर महाराष्ट्र सरकारने या पर्यटकांना परत आणण्यासाठी आणखी एका विशेष विमानाची (Flight) व्यवस्था केली आहे. या विशेष विमानातून १०० पर्यटकांना राज्यात परत आणले जाणार आहे.नुकतीच या १०० पर्यटकांची यादी जाहीर करण्यात आली असून, यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाच्या एक्स अकाउंटवरून माहिती देण्यात आली आहे. तसेच काल देखील राज्य सरकारने जम्मू आणि काश्मीरमधून परत आणल्या जाणाऱ्या ८३ पर्यटकांची यादी जाहीर केली होती.

एअर इंडियाचे विमान १०० पर्यटकांना महाराष्ट्रात आणणार

मुख्यमंत्री कार्यालयाने पोस्टमध्ये (CMO Office) म्हटले की, “काश्मिरातील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था झाली आहे. एअर इंडियाचे हे विमान महाराष्ट्रातील १०० पर्यटकांना घेऊन आज मुंबईला येईल. या विमानातील प्रवाशांची यादी सोबत जोडली आहे.

दोन्ही विमाने सायंकाळच्या सुमारास मुंबईत येणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर आज दोन विशेष विमाने मुंबईत येणार आहेत. इंडिगोचे विमान ८३ पर्यटकांना परत आणेल, तर एअर इंडियाच्या विमानाने १००, असे महाराष्ट्रातील एकूण १८३ पर्यटक आज मुंबईत परततील. ही दोन्ही विमाने सायंकाळच्या सुमारास मुंबईत येणार आहेत. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे यासाठी संपूर्ण मदत करीत आहेत. या विशेष विमानांचा खर्च राज्य सरकार करणार आहे.

 

Gautam Gambhir Death Threat: भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य कोच गौतम गंभीर यांना ‘ISIS कश्मीर’कडून जीवे मारण्याची धमकी

0
कोच

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
मंगळवारी काश्मिरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरून गेलेला असतानाच आता टीम इंडियाचा मुख्य कोच गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ISIS काश्मिरकडून ही धमकी मिळाल्याची माहिती आहे. गंभीरने २३ एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांकडे या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. आपल्यासह कुटुंबाला सुरक्षा मिळावी अशी मागणी त्याने केली आहे.

ISIS काश्मीरकडून जीवे मारण्याची धमकी
मिळालेल्या माहितीनुसार, गौतम गंभीरला दहशतवादी संघटना ISIS काश्मीरकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गंभीरने दिल्ली पोलिसांना संपर्क करत एफआयआर देखील दाखल केली आहे. यावेळी त्याने स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी सुरक्षा मागितली आहे. सध्या सुरू असलेल्या आयपीएलमुळे गौतम गंभीर सध्या टीम इंडियापासून ब्रेकवर आहे. अलीकडेच तो त्याच्या कुटुंबासह युरोप दौऱ्यावर गेला होता. पण पहलगाम हल्ल्याच्या एका दिवसानंतर त्याला धमकी देण्यात आली आहे.

मंगळवारी दुपारी काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा गंभीरने कडक शब्दात निषेध केला होता. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करत भारत या हल्ल्याचे सडेतोड उत्तर देईल असे त्याने सोशल मीडियाद्वारे म्हटले होते.

दरम्यान, गौतम गंभीरच्या कुटुंबाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची विनंती सुरक्षा यंत्रणांकडे केली आहे. या धमकीचे गांभीर्य लक्षात घेता, दिल्ली पोलिस या प्रकरणी सखोल चौकशी करतील. तसेच गंभीर आणि त्याच्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलतील, अशी अपेक्षा आहे.

Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांना शोधा आणि मारा, डोकं फोडा, रक्त, मांस बाहेर काढा; संतोष जगदाळेंच्या पत्नीची शरद पवारांकडे मागणी

0
दहशतवाद्यांना

पुणे | Pune
काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. यामध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश आहे. त्यापैकी पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचे मृतदेह गुरुवारी सकाळी पुण्यात आणण्यात आले. पुण्यातील दोघांच्याही निवासस्थांनी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. दोघांच्याही पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. शोकाकुळ वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या घरी जाऊन पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

शरद पवार हे संतोष जगदाळे यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या कर्वे नगरमधील घरी गेले. त्यावेळी शरद पवार यांनी संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. यावेळी संतोष जगदाळे यांच्या पत्नीने बैसरन व्हॅलीत दहशतवादी हल्ल्यावेळी घडलेला प्रकार शरद पवार यांना सांगितला. यावेळी संतोष जगदाळे यांनी हल्ल्यादरम्यानचा प्रसंग सांगतांना एकच टाहो फोडला.

संतोष जगदाळेंच्या पत्नीने शरद पवारांना हल्ल्यादरम्यान सर्वांची काय अवस्था होती हे सांगितले. हा सर्व थरार सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. त्या म्हणाल्या की, ‘त्यांनी माझ्या नवऱ्याच्या डोक्यात गोळ्या मारल्या. त्याने काहीही न विचारता थेट गोळ्या झाडल्या. ते सर्वजण तोंडाला मास्क लावून आले होते. दहशतवाद्यांनी प्रतिकार करणाऱ्या घोडेवाल्यालाही मारले. तो पर्यटकांना मारु नका, असे सांगत होता. दहशतवाद्यांनी तोंडावर मास्क घातले होते. लोकांचे जीव धोक्यात घालणे, लोकांचे जीवन उद्ध्वस्त करणे थांबले पाहिजे. आज माझा नवरा माझ्यासोबत नाही. आमचा माणूस आमच्या डोळ्यांदेखत गेला. तिथूनची स्थानिक लोकं आणि लष्कराचे अधिकारीही आमच्यासाठी रडत होते, असे संतोष जगदाळे यांच्या पत्नीने शरद पवार यांना सांगितले.

तसेच, ‘त्यांनी जसे गोळ्या झाडून २७ जणांचा जीव घेतला. त्यांना देखील तशाच गोळ्या घाला. लोकांची दुर्दशा झाली. काही तरी बंदोबस्त केला. २७ लोकांना त्यांनी मारले. २७ कुटुंबांना उद्धवस्त केले. माझे आख्खे आयुष्य उद्धवस्त झाले. माझ्या नवऱ्याला मी बघूही शकत नाही. तिथेही त्यांनी माझ्या नवऱ्याचे तोंड दाखवले नाही. दहशतवाद्यांनी माझ्या नवऱ्याच्या डोक्यात गोळी घातली. आमच्यासाठी काहीतरी करा. त्या दहशतवाद्यांना शोधा आणि मारा. दहशतवाद्यांनी आमच्या लोकांच्या डोक्यात गोळी घालून मांस बाहेर काढले, रक्त काढले, तसेच त्यांच्यासोबत करा आणि दहशतवाद्यांचे मृतदेह आम्हाला दाखवा. दहशतवाद्यांनी लहान मुलांसमोर त्यांच्या वडिलांना गोळ्या घातल्या. तेव्हा लहान मुले रडत होती. तिकडून खाली उतरताना आम्ही चिखलात पडलो. त्यामुळे मला पायांवर उभेही राहता येत नाही, असे संतोष जगदाळे यांच्या पत्नीने शरद पवार यांना सांगितले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Pahalgam Terror Attack : नाशिक जिल्ह्यातील ६१ पर्यटक सुरक्षित; प्रशासनाचा संपर्क 

0

नाशिक | प्रतिनिधी | Nashik  

काश्मीर पर्यटनासाठी (Kashmir Tourism) नाशिक जिल्ह्यातूनही (Nashik District) ६१ पर्यटक गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जिल्हा आपत्ती व्यव प्राधिकरण यांच्याकडून हेल्पलाईन नंबर जारी करत जिल्हा प्रशासनाशी नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

जिल्हा प्रशासनाकडून (District Administration) ८० हाल एजन्सीशी नियंत्रण कक्षाकडून संपर्क साधण्यात आला. त्यात ५० पर्यटक ट्रॅव्हल्स कंपन्यांसोबत ६१ लोक गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर ११ पर्यटक स्वतंत्ररीत्या गेल्याचे समजते. त्यांनीही जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला आहे.

जिल्ह्यातील एकूण ६९ पर्यटक (Tourist) सध्या जम्मू काश्मीर येथे असल्याबी माहिती आहे. सर्व पर्यटक सुरक्षित आहेत. यात लहाने यांनी राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क साधत त्यांची मुलगी व इतर आठ व्यक्ती श्रीनगर येथे असल्याची माहिती दिली. श्रीनगर येथे एकूण तीन कुटुंब गेले असून एकूण ८ व्यक्तींचा समावेश आहे. त्यात तीन महिला, तीन पुरुष व दोन लहान मुले असल्याचे समजते.

सर्वजण श्रीनगर (Shrinagar) येथे असूर त्यांचे विमानाचे तिकीट शनिवार (दि. २६) चे आहे. परंतु त्यांना परतण्यासाठी लवकर तिकीट मिळावे अशी त्यांनी प्रशासनाकडे विनंती केली आहे. तसेच सिद्धी मुसळे यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधत दोघे भाऊ बहीण श्रीनगर येथे सुरक्षित ठिकाणी असल्याचे कळवले आहे. परतण्यासाठी तिकिट मिळण्याची विनंती त्यांनी केली आहे. तर अजून एक पर्यटक पहलगाम येथील हॉटेलमध्ये सुरक्षित आहे

पर्यटकांकडून काश्मीर सहल रद्द  

पहलगामध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर कास्मीरला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते, अशी भीती व्यक्त होत असून त्याची झलक नाशिकमध्ये आजपासूनच दिसू लागली आहे. नाशिकमधून दरवर्षी साधारण एक लाखाच्या जवळपास पर्यटक काश्मीर, श्रीनगर, अमरनाथला जात असतात में व जून या दोन महिन्यात सर्वाधिक जाणा-यांची संख्या असते. यंदाही अमरनाथला जाण्यासाठी इच्छुकांनी रांगा लावल्या होत्या मात्र आजपासून त्यानी प्लॅन बदलण्यास सुरुवात केली आहे त्याऐवजी शिणला, कुलू, मनाली, दार्जिलिंग, कोकण, गोवाकडे ते वळत आहेत. मोठ्या संख्येने पर्यटकांनी त्याचे काश्मीरचे बुकिंग रद्द करण्यास सुरुवात केली आहे तालचे माजी अध्यक्ष दत्ता मालेराव यांनी सांगितले की, पहलगाम हल्ल्यानंतर पुढील ४-५ महिन्यांसाठी बुकिंग रद्द करण्याचे कोन येत आहेत. या हलल्यामुळे स्थानिक आणि पर्यटनाचे मोठे नुकसान होईल यात स्थानिक हॉटेल, विमान, रेल्वे बुकिंग रद्द करण्यात येत असल्याने याची झळ संबंधितांना बसणार आहे.

हेल्पलाईन नंबर 

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नाशिक नाशिक जिल्ह्याकरिता (०२५३-२३१७१५१), पर्यटकांच्या मदतीसाठी श्रीनगर येथील जिल्हा मुख्यालय, डीसी कार्यालयात पर्यटकांसाठी २४ तास मदत कक्ष व आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

संपर्क क्रमांक : ०१९४-२४८३६५१/०१९४-२४५७५४३

व्हाट्सॲप क्रमांक : ०७७८०८०५१४४ / ०१७७८०९३८३९७

आपत्कालीन नियंत्रण कक्ष, श्रीनगर : ०१९४-२४५७५४३/ ०१९४-२४८३६५१

जिल्हा प्रशासन, श्रीनगर २४ तास आपत्कालिन मदत कक्ष / पोलीस नियंत्रण कक्ष अनंतनाग : ९१ ९४१९०५१९४० (व्हाट्सॲप क्रमांक) / ९१९५९६७७७६६९/०१९३-२२२५०७०

दिल्ली नियंत्रण कक्ष : ०११ २३४३८२५२ / ०११ २३४३८२५३ आणि ०११ – २३०९३०५४.

ट्रॅव्हल्स कंपनीमार्फत गेलेल्या पर्यटकांच्या सुरक्षित ठिकाणांची माहिती 

चौधरी यात्रा कंपनी ९ पैकी ४ जण पहलगाम तर ५ जण श्रीनगर

डेक्कन ट्रॅव्हल्स कंपनी रजण श्रीनगर

हरी ओम तूहल्स ४ जण

जॉय अॅन्ड जॉय हॉलिडेज २० जण सर्व जम्मुमधील हॉटेलमध्ये सुरक्षित

कौस्तुभ टूर्स सोबत १२ जण गुलमर्ग येथे

श्री दत्त हॉलिडेज ३ जण श्रीनगर येथे सुरक्षित आहेत.

स्वंतत्ररित्या गेलेले ११ जण त्यापैकी श्रीनगर येथे १० पर्यटक. तर पहलगाम येथे १ पर्यटक सुरक्षित असल्याचे समजते.

 

 

संपादकीय : २४ एप्रिल २०२५ – गुरुजींचे लई नाही मागणे

0

सातारा जिल्ह्यातील करंजखोप शाळेतील एका गुरुजींनी पालकांना लिहिलेले पत्र सध्या समाज माध्यमांवर फिरत आहे. मुलांना सुट्टी लागली की त्यांचे बहुसंख्य पालक पुन्हा एकदा कुठे ना कुठे गुंतवण्याचा प्रयत्न करतात. पण उपरोक्त शाळेतील गुरुजींनी चक्क पालकांनाच सुट्टीतील गृहपाठ दिला आहे. तो मुले आणि पालक यांचे सान्निध्य घडवणारा, त्यांच्यात संवादाचा पूल बांधणारा आणि त्यानिमित्ताने मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न करणारा ठरू शकेल. तो गृहपाठ मुळातच वाचण्यासारखा आणि ठरवले तर अमलातही आणण्यासारखा आहे.

निदान उन्हाळ्याची सुट्टी तरी मुले आणि पालकांनी एकमेकांच्या सहवासात घालवावी, अशी अपेक्षा गुरूजी त्यात व्यक्त करतात. त्यांनी गृहपाठात सुचवलेले उपक्रमदेखील त्यालाच पूरक ठरू शकतील. उदाहरणार्थ, एकवेळचे जेवण सोबत करा, मुलांना पालकांच्या कामाच्या ठिकाणी घेऊन जा आणि त्यांचे पालक कुठे आणि किती काम करतात ते बघू द्या, मुलांना स्थानिक यात्रा किंवा बाजारात घेऊन जा.. अशा किमान पंधरा गोष्टी त्यांनी सुचवल्या आहेत. मुले आणि पालक बरोबर धमाल करू शकतील, सहवासातूनच संवाद घडेल अशाच त्या आहेत. यातून कदाचित मुले त्यांचे मन त्यांच्याही नकळत पालकांजवळ व्यक्त करू शकतील. गुरुजींना हा गृहपाठ पालकांना द्यावासा वाटला याचाच दुसरा अर्थ, पालक-मुले यांच्यातील सहवास आणि संवादाची उणीव त्यांनाही जाणवली असावी.

साधारणतः एक दशकापूर्वीपर्यंत मुले आणि त्यांचे पालक गुरुजींना अपेक्षित पद्धतीने सुट्टी घालवायचे. दुपारी बैठे खेळ, घरकामात मदत आणि संध्याकाळी गल्ल्या किंवा मैदाने दणाणून सोडणे म्हणजे मुलांची सुट्टी. तथापि सध्या सुट्टी म्हणजे डोक्याला ताप अशीच बहुसंख्य पालकांची भावना आढळते. यावर वेळेच्या अभावाचे कारण सहज पुढे केले जाऊ शकेल. तथापि मुलांच्या वाट्याचा वेळ नेमका कोण खाते हे वेगळे सांगायला हवे का? संवादासाठी वेळ कसा काढला जाऊ शकेल हा चर्चेचा वेगळा विषय होऊ शकेल. तथापि, संवादाची गरज बहुसंख्य पालकांना जाणवते की नाही हा खरा कळीचा मुद्दा आहे.

त्याशिवाय त्याचा इतका अभाव गुरुजींना जाणवला नसता. सध्या हा संवाद खूप साचेबद्ध झाला असावा का? म्हणजे अभ्यास करतो ना.. अजून काही पाहिजे आहे का… बाकी विशेष काही नाही ना.. ही प्रश्नोत्तरे म्हणजे संवाद असे झाले असावे का? पण ते फक्त माहितीचे आदानप्रदान ठरू शकेल. गुरुजींनी दिलेल्या गृहपाठाच्या निमित्ताने पालक याचा विचार करतील का? तात्पर्य, सुट्टीत मुलांशी खूप गप्पा मारा, सहवासाचा आनंद घ्या हे गुरुजींचे मागणे पालकांनी मनावर घ्यावे असेच आहे.

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात सरपंच पदासाठी सोडत

0

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणासाठी काल बुधवार दि.23 एप्रिल 2025 रोजी दुपारी सन 2025 ते 2030 या कालावधीत मुदत संपणार्‍या सरपंच पदासाठी राखीव असलेल्या जागांची सोडत त्या त्या ठिकाणच्या तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. ज्या ज्या ग्रामपंचायतीचे सरपंचपद खुले आणि ओबीसी वर्गासाठी झाले आहेत. त्या ठिकाणच्या इच्छुकांना दिलासा मिळाला आहे. तर काही गावे अन्य प्रवर्गासाठी आरक्षीत झाल्याने इच्छुकांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत.

तसेच या झालेल्या सोडतीमधून शुक्रवार दि. 25 एप्रिल रोजी महिला सरपंच पदासाठी आरक्षण सोडत होणार असून या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आपल्या गावचे सरपंच पद महिलांसाठी राखीव होते की काय अशी काहींना धास्ती आहे. तर काहिंनी आपली पत्नी, बहिण, आईसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

नेवासा

खुला वर्ग- बाभुळखेडे, बहिरवाडी, बकुपिंपळगाव, बेलपिंपळगाव, चांदा, देवगाव, देवसडे, गळनिंब, गेवराई, हंडीनिमगाव, हिंगोणी, मक्तापूर, जेऊरहैबती, कौठा, खरवंडी, लोहगाव, माका, माळीचिंचोरा, म्हाळसपिंपळगाव, मोरयाचिंचोरे, नजिकचिंचोली, पाचेगाव, पाचुंदे, पानसवाडी, पिचडगाव, प्रवरासंगम, रांजणगाव, सलाबतपूर, शिंगवेतुकाई, शिरेगाव, सौंदाळा, सुलतानपूर, सुरेशनगर, तेलकुडगाव, उस्थळदुमाला, वडाळाबहिरोबा, वाकडी, वांजोळी, वरखेड, निपानी निमगाव, तरवडी, टोका, पिंप्रीशहाली, खेडलेपरमानंद. जानेवारी 2021 मध्ये आरक्षण निश्चित केलेल्या ग्रामपंचायती- बेलपांढरी, चिलेखनवाडी, घोडेगाव, जायगुडे आखाडा, लेकुरवाळेआखाडा, महालक्ष्मी हिवरे, नेवासा बुद्रुक, राजेगाव, तामसवाडी, वडुले, वंजारवाडी, झापवाडी.

ओबीसी – भालगाव, भेंडे बुद्रुक, देडगाव, दिघी, फत्तेपूर, गोधेगाव, कांगोणी, करजगाव, खडका, कुकाणा, मंगळापूर, नारायणवाडी, रस्तापूर, घोगरगाव, चिंचबन, खुपटी, नवीन चांदगाव, भानसहिवरे, नागापूर, मुरमे, जळके खुर्द, सोनई, भेंडे खुर्द, पुनतगाव. जानेवारी 2021 मध्ये आरक्षण निश्चित केलेल्या ग्रामपंचायती- पाथरवाला, गोपाळपूर, अंतरवाली, नांदूरशिकारी, लोहारवाडी, शिरसगाव, गणेशवाडी.उक्कडगाव, दहेगाव बोलका, सोनारी, धारणगाव, चासनळी, वडगाव या गावांचा समावेश आहे.

श्रीरामपूर

खुला वर्ग- बेलापूर बु., बेलापूर खुर्द, भेर्डापूर, भोकर, दिघी, फत्याबाद, गळनिंब, घुमनदेव, गोंडेगाव, कडीत, कमालपूर, माळवाडगाव, मातापूर, मुठेवाडगाव, नाऊर, नायगाव, सराला

ओबीसी – कारेगाव, कान्हेगाव, वांगी बु., बांगी खुर्द, उंदिरगाव, उक्कलगाव, शिरसगाव, खंडाळा, हरेगाव, खिडी, जाफराबाद, गुजरवाडी, एकलहरे, भामाठाण.

संगमनेर

खुला वर्ग- कोळवाडे, जवळे बाळेश्वर, भोजदरी, अकलापूर, कौठे मलकापूर, म्हसवंडी, डोळासणे, कौठे बुद्रुक, कोंची, वनकुटे, माळेगांव पठार, घारगाव, बोटा, कनकापूर, नांदुर खंदरमाळ, कुरकूटवाडी, आंबीखालसा, रणखांबवाडी, नांदुरी दुमाला, मांडवे बुद्रुक, पोखरी बाळेश्वर, पिंपळगांव देपा, कासारा दुमाला, रहिमपूर, पानोडी, रायते, पळसखेडे, पेमगिरी, चिंचोली गुरव, चिंचपूर बुद्रुक, सोनेवाडी, मिरपूर, शेडगांव, जवळे कडलग, वडगांव लांडगा, दरेवाडी, सायखिंडी, चंदनापूरी, कौठे कमळेश्वर, चिखली, कौठे खुर्द, मेंढवन, वडझरी खुर्द, सुकेवाडी, मंगळापूर, कासारे, निमगांव बुद्रुक, राजापूर, रायतेवाडी, निमोण, कौठे धांदरफळ, शिबलापूर, पारेगांव बुद्रुक, हिवरगांव पावसा, वरुडी पठार, वाघापूर, देवकौठे, क-हे, करुले, तळेगांव, निमगांव भोजापूर, निंभाळे, निळवंडे, पिंप्री लौकी अजमपूर, खांडगांव, खांजापूर, निमगांव टेंभी, झोळे, आंबी दुमाला, हिवरगाव पठार.

ओबीसी – शेंडेवाडी, काकडवाडी, सारोळे पठार, पिंपरणे, चिकणी, कनोली, वेल्हाळे, माळेगांव हवेली, सावरचोळ, पिंपळगाव माथा, जांबुत बुद्रुक, कर्जूले पठार, झरेकाठी, प्रतापपूर, जोर्वे, आश्वी खुर्द, पारेगांव खुर्द, ओझर खुर्द, निमज, घुलेवाडी, वडगांव पान, वडझरी बुद्रुक, बिरेवाडी, शिरापूर, साकूर, खंदरमाळवाडी, महालवाडी, आश्वी बुद्रुक, दाढ खुर्द, समनापूर, जांभुळवाडी, खराडी, कुरकुंडी, शिरसगाव, पोखरी हवेली, बोरबनवाडी, सादतपूर, हंगेवाडी, मालदाड.

राहुरी

खुला वर्ग – मोकळ-ओहळ, चांदेगाव, ब्राम्हणगाव भांड, करजगाव, टाकळमिया, माहेगाव, कोपरे, तिळापूर, मांजरी, मानोरी, पिंप्री वळण, सडे, चिंचोली, पिंपळगांव फुणगी, ताहाराबाद, कोळेवाडी, दरडगांवथडी, चिंचविहीरे, कणगर बुद्रुक, वावरथ, वरवंडी, डिग्रस, तमनर आखाडा, धामोरी खुर्द, ब्राम्हणी, चेडगाव, लाख, मालुंजे खुर्द, पाथरे खुर्द, तांदुळवाडी, आरडगांव, केंदळ बुदुक, धानोरे, रामपूर, घोरपडवाडी

ओबीसी – चिखलठाण, जातप, मुसळवाडी, वळण, केंदळ खुर्द, उंबरे, खडांबे खुर्द, अंमळनेर, केसापूर, वरशिंदे, म्हैसगांव, देसवंडी, कुक्कडवेढे, वांबोरी, कात्रड, बोधेगांव, पिंप्री अवघड, बारागाव नांदूर, कुरणवाडी, वांजूळपोई, शिलेगांव, संक्रापूर.

कोपरगाव

खुला वर्ग- मोर्विस, धामोरी, मायगाव देवी, सांगवी भूसार, मळेगाव थडी, रवंदे, कुंभारी, मंजूर, बक्तरपुर, हंडेवाडी, शहापूर, हिंगणी, ब्राम्हणगाव, करंजी बुद्रुक, टाकळी, चांदगव्हाण, जेऊर पाटोदा, संवत्सर, कासली, शिरसगाव, लौकी, सडे, देर्डे-चांदवड, डाऊच खुर्द, चांदेकसारे, अंजनापुर, धोंडेवाडी, वेळापूर, वेस-सोयगाव.

ओबीसी – माहेगाव-देशमुख, कारवाडी, ओगदी, बोलकी, येसगाव, कोकामठाण, तिळवणी, कान्हेगाव, डाउच बुद्रुक, जेऊर कुंभारी, देर्डे-कोर्‍हाळे, मढी खुर्द, पोहेगाव, गोधेगाव, उक्कडगाव, दहेगाव बोलका, सोनारी, धारणगाव, चासनळी, वडगाव या गावांचा समावेश आहे.

राहाता

खुला वर्ग- आडगाव बुद्रुक, एकरुखे, गोगलगाव, हसनापूर, केलवड बुद्रुक, लोणी बुद्रुक, पाथरे बुद्रुक, पुणतांबा, रांजणगाव खुर्द, शिंगवे, तिसगाव, धनगरवाडी

ओबीसी – आडगाव खुर्द, चंद्रापूर, दाढ बुद्रुक, कनकुरी, लोहगाव, नपावाडी, नांदुर्खी खुर्द, निघोज, पिंप्री लोकई, निर्मळ पिंपरी, कोल्हार बुद्रुक, रामपूरवाडी, रांजणखोल, डोर्‍हाळे.

अकोले

खुला वर्ग – गर्दनी, ढोकी, इंदूरी, मेंहेदूरी, बहिरवाडी, डोंगरगाव, सुगाव बुद्रुक, कळस खुर्द, धुमाळवाडी, वाशेरे, परखतपूर, उंचखडक बुद्रुक, मोग्रस, लिंगदेव, बोरी, मन्याळे, बेलापूर

ओबीसी – कळस बुद्रुक, जांभळे, कुंभेफळ, उंचखडक खुर्द, अंबड, टाकळी, रेडे,लहीत खुर्द, पिंपळदरी, चास, चैतन्यपूर, हिवरगाव व कळंब

राजूर परिसरात काविळच्या साथीचे थैमान

0

राजूर |वार्ताहर| Rajur

राजुर व परिसरात कावीळच्या साथीने जोर धरला असून आतापर्यंत 100 हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. अनेकांना संगमनेर, राजूर व अकोले येथील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. या साथीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साथीचे प्रमुख कारण अजून पुढे आले नाही मात्र आरोग्य विभाग व ग्रामपंचायत यांनी तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

गावातील पाणीपुरवठा यंत्रणेची तपासणी सुरू असून जलस्रोतांवर क्लोरीनेशन केले जात आहे. नागरिकांना उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणी वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गावात जनजागृतीसाठी पत्रके, बॅनर व मोबाईल संदेशाद्वारे मोहीम राबवली जात आहे. आरोग्य विभागाने गावात आरोग्य तपासणी शिबिरे सुरू केली असून शाळा, अंगणवाड्या व सार्वजनिक ठिकाणी तपासण्या केल्या जात जात आहे. अकोले तालुक्यातील विठे येथील प्राथमिक केंद्रातील आरोग्य निरीक्षक डी.एल. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पाच जणांचे आरोग्य पथकाने राजूरमध्ये येऊन ग्रामपंचायत पाणीपुरवठा करणार्‍या टाकीतील पाणी तपासणीसाठी तसेच इतरही काही ठिकाणातील पाणी व इतर काही पदार्थ तपासणीसाठी पाठवलेले आहे.

ग्रामस्थांनी पाणी उकळून प्यावे, त्याचबरोबर उष्माघातापासून स्वतःचा बचाव करावा, उघड्यावरील थंड पेय तसेच पदार्थ खाऊ नये, तसेच वारंवार जास्त थंड पेय पिऊ नये, असे आवाहन आरोग्य निरीक्षक शेळके यांनी केले आहे.
या संदर्भात राजूर येथे बैठक होऊन सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी आरोग्य विभागाला याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत.

टंचाईच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध जलसाठ्याचे सूक्ष्म नियोजन करा – ना. विखे पाटील

0

लोणी |वार्ताहर| Loni

पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेता धरणे व तलावा मधील उपलब्ध जलसाठे वापरण्या बाबत सूक्ष्म नियोजन करावे. टंचाई संदर्भातील परिस्थितीचा अधिकार्‍यांनी नियमित आढावा घेऊन याबाबत उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या. उन्हाळी हंगामाच्या अनुषंगाने पाण्याच्या नियोजनासंदर्भात जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृह येथे बैठक झाली. यावेळी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील म्हणाले, संभाव्य टंचाई काळात नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे. पिण्याच्या पाण्याची टंचाई उद्भवणार्‍या गावांचा अधिकार्‍यांनी सर्व्हे करावा. पाण्याची गळती कमी करण्यासाठी उपाययोजना आखून त्यानुसार कार्यवाही करावी. पिण्याचे पाणी उचलणार्‍या ज्या यंत्रणा आहेत त्यांना मंजूर पाणी, प्रत्यक्ष उचलेले पाणी याबाबत अवगत करावे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त, नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांची याबाबत जिल्हाधिकारी स्तरावर बैठक घेण्यात यावी. पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी पाणी जपून वापराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी.

धरणातील बॅक वॉटरचा सर्व्हे करावा. हा सर्व्हे अचूक होण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. कालवा सल्लागार समितीने ठरविल्याप्रमाणे उन्हाळी हंगामात पाणी सोडण्याचे नियोजन करावे. साठवण तलाव व कॅनॉलच्या सभोवताली असणारी अतिक्रमणे काढावीत. पाणी वापराबाबतचे 15 जुलै पर्यंतचे नियोजन केले आहे त्यानुसार कार्यवाही करावी. या बैठकीत गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत असलेल्या प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा, पुढील काळात पिण्यासाठी, सिंचनासाठी सोडण्यात येणारे पाणी याचा प्रकल्पनिहाय आढावा घेण्यात आला. प्रकल्पनिहाय उपलब्ध पाण्याचे नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.

पहेलगामचा अतिरेकी हल्ला मानवतेला काळीमा फासणारा – बाळासाहेब थोरात

0

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

काश्मीर खोर्‍यातील पहेलगाम येथे भारतीय नागरिकांवर झालेला भ्याड हल्ला हा अत्यंत निंदनीय व मानवतेला काळीमा फासणारा असल्याची भावना माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. काश्मीर खोर्‍यातील अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, पहेलगाम येथे झालेला हल्ला हा अत्यंत भ्याड व निंदनीय आहे. यामध्ये निष्पाप 27 भारतीयांचा अतिरेक्यांनी जीव घेतला आहे. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. याबाबत सरकारने ठोस उपाययोजना केल्या पाहिजे.

केंद्र सरकारने कलमामध्ये बदल केला. 370 कलम लागू केले यावेळेस सांगितले वेगळे मात्र वस्तूस्थिती वेगळी आहे. अतिरेकी हल्ला आणि देशाची सुरक्षितता याबाबत सरकारने जास्त जागरूक राहण्याची आवश्यकता होती आणि यापुढे राहील अशी अपेक्षा व्यक्त करताना पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. माजी आ. डॉ.तांबे म्हणाले, काश्मीर खोरे हे देशाचे नंदनवन आहे. दरवर्षी हजारो पर्यटक तेथे जातात.

मात्र जातीय द्वेष पसरवण्यासाठी काही संघटना अतिरेकी हल्ले करतात यातून निरपराध नागरिकांचा बळी जातो. काश्मीरमध्ये 27 नागरिकांचा विनाकारण बळी गेला असून ही घटना अत्यंत दुर्दैवी असून मानवतेसाठी कलंक असल्याची प्रतिक्रिया जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक मा. आ. डॉ. सुधीर तांबे यांनी दिली आहे. पहेलगाम येथे मृत पावलेल्या 27 भारतीयांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे.

Ahilyanagar : सीना नदी पात्रासह जलस्त्रोतांची स्वच्छता

0

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून राज्य शासनामार्फत 1 मे पर्यंत आराधना वसुंधरेची हे अभियान राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरातही शनिवारी व रविवारी शहरातील जलस्त्रोतांची साफसफाई करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली. या अभियानात नागरिक व स्वयंसेवी, सामाजिक संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

शहरात शनिवारी (26 एप्रिल) नागापूर पूल जवळ, व स्टेशन रस्त्यावरील पूल जवळ सीना नदी पात्र, लगतचा परिसर व रविवारी (27 एप्रिल) अहिल्यानगर-पुणे रस्त्यावर इलाक्षी शोरूम जवळ, कल्याण रस्त्यावर असलेल्या पुला जवळील सीना नदी पात्र, लगतचा परिसर स्वच्छ करण्यात येणार आहे. यासह आठरे पाटील पब्लिक स्कूल येथील विहीर, बाळाजी बुवा विहीर येथे अभियान राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी व स्वयंसेवी, सामाजिक संस्थांनी यात सहभागी व्हावे, वसुंधरेचे जतन, हेच अहिल्यानगरचे वचन यानुसार वसुंधरेच्या रक्षणासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

स्वयंसेवक म्हणूनही सहभागी व्हावे व या कार्यात मदत करावी, त्यासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रमुख अशोक साबळे यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. आराधना वसुंधरेची या अभियानातून जलस्त्रोतांचे शुद्धीकरण होऊन पाण्याचा दर्जा सुधारेल. जलप्रदूषण कमी होऊन नागरिकांसह जलजीवन वाचेल. पाण्यातील जैवविविधता (मासे, जलवनस्पती) सुरक्षित राहतील व पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, असे आयुक्त डांगे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, रिड्यूस, रीयूज, रिसायकल या पर्यावरणपूरक तत्त्वांवर कार्य करणार्‍या संस्थांचा 1 मे रोजी सन्मान करण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जागृती निर्माण करणे. रिड्यूस, रीयूज, रिसायकल तत्वांचे पालन करणार्‍या संस्थांना प्रोत्साहन देणे, राज्य शासनाच्या योजनेसाठी निवडक उपक्रमांचा प्रातिनिधिक आदर्श निर्माण करणे, या उद्देशाने हा सन्मान करण्यात येणार आहे.