Sunday, May 4, 2025
Home Blog Page 32

Shrirampur : अतिक्रमणमुक्त आणि हरित श्रीरामपूरसाठी कटिबद्ध

0

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

पुढील काळात शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी, शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी उपाययोजना करण्यासोबत शहराला हरित करण्यात येईल, अशी ग्वाही जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा, जलजीवन मिशन व महावितरण विभागांच्या कामाचा आढावा बैठकीत श्री. विखे पाटील बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती सुनंदा नरवाडे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ आदी उपस्थित होते.

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, जलजीवन मिशनचे काम करताना पाण्याचे स्त्रोत शोधल्यानंतर पाईप खरेदी करावी. उन्हापासून पाईप खराब होऊ नयेत, यासाठी पाईप बंदीस्त ठिकाणी ठेवावेत. जलजीवन मिशनच्या कामात गुणवत्ता ठेवावी. कामात अनियमितता करणार्‍या ठेकेदारांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीबाबत ग्रामस्थांच्या तक्रारींची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन निकृष्ट कामांच्या, अनियमिततेची चौकशी करावी, त्रुटींची दुरूस्ती करून पाणीपुरवठा योजना तात्काळ पूर्ण कराव्यात, ज्या गावांच्या पाणीपुरवठा योजना सुरू आहेत, त्या गावांना टँकरद्वारे पाणी पुरविण्याची गरज पडू नये, असेही त्यांनी सांगितले.

महावितरण कामांचा आढावा घेतांना ना. विखे पाटील म्हणाले की, शेतकर्‍यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री सौर पंप योजनेत येत्या काळात सर्वच शेतकर्‍यांना सोलर पंप देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेत सौर फिडर केंद्रांसाठी जिल्ह्यात 3 हजार एकर शासकीय जमीन देण्यात आली आहे. कुसूम आणि मागेल त्याला सोलर पंप या योजनेंतर्गत अर्ज केलेल्या शेतकर्‍यांना तात्काळ सोलर पंप वितरीत करण्यात यावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. तालुक्यातील नादुरुस्त उपकेंद्रांची तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. जिल्ह्यातील महावितरणच्या प्रलंबित कामांना जिल्हा नियोजनच्या माध्यमातून 40 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.

गावठाण जमीनीवर असलेले घरकुल नियमित करण्याचे शासनाचे धोरण आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यात 20 लाख घरकुले बांधण्यात येणार आहेत. यासर्व घरांना सोलरद्वारे वीज दिली जाणार आहे. तालुक्यासाठी जास्तीत जास्त घरकुले मंजूर करण्यात येतील, अशी ग्वाही ना. विखे पाटील यांनी दिली. ग्रामीण पाणीपुरवठा व महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाच्या योजनेत तालुक्यातील गावामध्ये करण्यात येणार्‍या कामांच्या प्रगतीचा पालकमंत्र्यांनी गावनिहाय आढावा घेतला. या बैठकीला महसूल, पंचायत समिती, ग्रामीण रस्ते, जलसंधारण अशा विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Water Scarcity : शेवगावकरांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती

0

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

उन्हाळ्यातील तापमानाचा पारा वाढत असताना शेवगाव शहर व तालुक्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. अनियमित पाणी पुरवठ्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी पैसे मोजण्याची वेळ नागरिकांवर येऊन ठेपली आहे. शहराला तर 10 ते 12 दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा केला जातोे. नाथ जलाशयजवळ असूनही शेवगावचा पाणी प्रश्न अद्याप सुटलेला नाही.

शेवगाव शहराचा पाणी प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. लोकप्रतिनिधींकडून निव्वळ आश्वासने दिली जाता आहेत. सध्या नवीन पाणी योजनेचे काम चालू आहे ही जमेची बाजू आहे. मात्र, योजना प्रत्यक्षात कधी कार्यान्वित होईल, हे सांगणे कठीण आहे. शहरातील नळांना कधी 10 तर कधी 12 दिवसांनंतर पाणी कधी व किती वाजता येईल याचा नेम नसतो. नागरिकांना सतत पाणी कधी सुटणार? याकडे लक्ष देत बसावे लागते. ते शुद्ध असेलच याचीही खात्री नाही. टंचाईमुळे कोणी विचार करताना दिसत नाही. सध्या पाण्याचे जार व पाण्याच्या बाटल्यांची जोरात विक्री चालू आहे. तसेच शहरात पाण्याच्या टँकरला मोठी मागणी असून त्यासाठी एकदिवस अगोदर नंबर लावावा लागतो तरच पाणी मिळते. नगरपरिषदेला वार्षिक पाणीपट्टी भरुनही सध्या हा आर्थिक भूर्दंड सहन करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. पाण्यासाठी शहरात अनेक आंदोलने झाली मात्र ती हवेतच जिरली.

तालुक्यातील विविध खेडे व वाड्यावस्त्यांवर पाणी टंचाईच्या झळा तीव्रतेने जाणवू लागल्या आहेत. तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींनी गावठाण व त्याअंतर्गत येणार्‍या 34 वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडे अ‍ॅानलाईन प्रस्ताव सादर केले आहेत. त्यातील थाटे ग्रामपंचायतीचा एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. आखेगाव, दिवटे, बाडगव्हाण, लाडजळगाव या चार ठिकाणचे स्थळ पाहणी अहवाल अप्राप्त आहेत. तर, वाडगाव, वरखेड, बेलगाव व सोनेसांगवीचे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सादर केले आहेत. प्रशासनाने पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन मागणी केलेल्या गावांना तातडीने पाणीपुरवठा करण्याची गरज आहे.

विजेच्या धक्क्याने शेतकर्‍याचा मृत्यू

0

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील लाख येथे एका 77 वर्षीय शेतकर्‍याचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना काल दि. 21 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास लाख येथे घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली. भास्कर भाऊसाहेब खाडे (वय 77) हे राहुरी तालुक्यातील लाख येथे राहत असून ते लाख विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन व तंटामुक्ती अध्यक्ष होते. भास्कर खाडे हे काल दि. 21 रोजी दुपारी त्यांच्या लाख शिवारातील शेतात पिकाला पाणी भरण्यासाठी गेले होते. दरम्यान श्री. खाडे यांना विजेचा जोरदार धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

बराच वेळ झाला तरी ते घरी परतले नाही. त्यामुळे त्यांचा नातू अमोल खाडे हा त्यांना पाहण्यासाठी गेला असता भास्कर खाडे हे बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णवाहिकेतून त्यांना राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले. पो.नि. संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राहुल यादव व सुरज गायकवाड यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या घटनेबाबत सायंकाळी उशीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. भास्कर भाऊसाहेब खाडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, नातू असा मोठा परिवार आहे.

Rahuri : महिला शिक्षकेच्या गळ्यातील साडे तीन तोळ्याचे गंठण ओरबडले

0

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी शहरातील न्यायालय परिसरात काल दि. 20 एप्रिल रोजी रात्रीच्या दरम्यान पाठीमागून दुचाकीवर आलेल्या एका भामट्याने दुचाकीवरून जात असलेल्या शिक्षक महिलेच्या (Woman Teacher) गळ्यातील सुमारे साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून (Chain Snatching) धूम स्टाईलने चोरी (Theft) केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली.

छाया अरविंद शिंदे (वय 43), या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका असून त्या शहरातील वृंदावन नगर येथे राहतात. दि. 20 एप्रिल रोजी रात्रीच्या वेळी छाया शिंदे व त्यांचे पती अरविंद शिंदे हे दोघे शुभकिर्ती लॉन्स येथे लग्न कार्याकरीता गेले होते. कार्यक्रम आटोपल्या नंतर रात्री 9.15 वाजे दरम्यान शिंदे पती पत्नी त्यांच्या दुचाकीवर घराकडे जात होते. दरम्यान न्यायालय परिसरातील सुर्या क्लासेस जवळ पाठीमागुन मोटारसायकलवर हेल्मेट घालून आलेल्या एका भामट्याने छाया शिंदे यांच्या गळ्यातील 1 लाख 65 हजार रुपये किंमतीचे 3 तोळे 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण ओरबडून (Chain Snatching) धुम स्टाईलने चोरी केली.

त्यावेळी शिंदे यांनी आरडाओरडा केला, मात्र भामटा काही क्षणात घटनास्थळावरून पसार झाला. छाया अरविंद शिंदे या शिक्षक महिलेच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात (Rahuri Police Station) अज्ञात आरोपी विरोधात गु.र.न. 449/2025 भारतीय न्याय संहीता कलम 309 (4) प्रमाणे रस्तालूटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरातील महिला वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा घटना शहरात नित्याच्या झाल्याने महिलांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप परदेशी हे करीत आहे.

Maharashtra News : मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे शपथबद्ध

0

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

राज्याचे नवनियुक्त मुख्य माहिती आयुक्त म्हणून राहुल पांडे (Rahul Pandey) यांनी सोमवारी आपल्या पदाची शपथ (Oath) घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पांडे यांना मुख्य माहिती आयुक्त पदाची (Chief Information Commissioner)  शपथ दिली. रवींद्र ठाकरे, प्रकाश इंदलकर आणि गजानन निमदेव यांनाही यावेळी राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ देण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांच्या उपस्थितीत राजभवन येथे हा  छोटेखानी शपथविधी समारंभ पार पडला. सुरुवातीला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे तसेच इतर माहिती आयुक्त यांच्या नियुक्तीची अधिसूचना वाचून दाखवली. त्यानंतर शपथविधी सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत आणि राज्यगीताने झाली तसेच समारोप राष्ट्रगीताने झाला.

दरम्यान, शपथविधी सोहळ्याला (Swearing Ceremony) विधान परिषद सदस्य परिणय फुके, मुख्य सचिव सुजाता सौनिक, प्रधान सचिव तथा माहिती आणि  जनसंपर्क महासंचालक ब्रिजेश सिंह, पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Nashik News : तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी पाणीटंचाई परिस्थिती संवेदनशीलतेने हाताळावी – प्रांताधिकारी शिंदे

0

ओझे | विलास ढाकणे | Oze

पेठ तालुक्यातील बोरीचीबारी (Borichibari) याठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे सदर ठिकाणी काही महिला पाण्याच्या (Water) शोधात हंडा घेऊन एका विहिरीतून (Well) पाणी काढण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत विहिरीत उतरत असल्याबाबतचा एक व्हिडीओ एक्स (ट्विटर)या समाज माध्यमावर शुक्रवार (दि.२०) रोजी प्रसिध्द झाला होता.त्यानंतर सदर बातमीची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन आज (सोमवारी) सकाळी १० वाजता, तहसीलदार, गटविकास अधिकारी पेठ यांनी मौजे बोरीचीबारी येथे संयुक्त भेट देऊन पाणीटंचाई बाबत पंचनामा, स्थळनिरीक्षण व आवश्यक त्या उपाययोजनांसह अहवाल सादर करण्याची कार्यवाही केली.

बोरीचीबारी येथील लोकसंख्या (Population) ५५४ इतकी असून, टंचाई आराखडयात माहे एप्रिल ते जूनच्या टप्प्यात विहिर अधिग्रहण करणे बाबतची उपाययोजना केल्या जातात . मागील वर्षी (सन २०२३-२४ मध्ये) याच कालावधीत विहीर अधिग्रहण करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा (Water Supply) केला जात होता. बोरीचीबारी येथे दोन वर्षापूर्वी स्वदेश फाऊंडेशन मार्फत नळ पाणी पुरवठा योजना केलेली असून,तेथे नळाद्वारे फेब्रुवारी २०२५ पर्यंत व त्यानंतर एप्रिल २०२५ च्या दुसऱ्या आठवडयापर्यंत ग्रामस्थांना पाणी पुरवठा केला जात होता.

मात्र, त्यानंतर (.१७ एप्रिल) पासून खाजगी टँकरद्वारे गावातील सार्वजानिक विहिरीत पाणी टाकण्यात येत होते व सदर विहीरीतून बादलीद्वारे पाणी गावातील (Village) महिला काढत होत्या. यानंतर (दि. १७) रोजी ग्रामपंचायत अधिकारी यांनी तेथील विहिर अधिग्रहण करण्यासाठी भेट देऊन अहवाल तयार करण्याची कार्यवाही केली. त्याचदिवशी संबंधित शेतकऱ्यास प्रस्ताव मंजूर होईपर्यंत टँकरद्वारे सार्वजानिक विहीरीत पाणी टाकावे असे सूचित केले होते.

बोरीचीबारी येथे नळ पाणी पुरवठा योजना व्यतिरिक्त वापरातील एक सार्वजनिक विहिर आहे. सदर विहीरीत आजरोजी ग्रामपंचायतमार्फत (Grampanchayat) खाजगी विहीरीतून पाणी टँकरद्वारे सोडून पाणीपुरवठा केला जात आहे. तथापि त्यास काही ग्रामस्थांचा उपसरपंच व पोलीस पाटील यांचा विरोध दिसून आला. शुक्रवार (दि.२०) रोजी सकाळी तेथील एका महिलेस पाणी घेण्यासाठी विहिरीत उतरवून व्हिडीओ तयार करून समाज माध्यमांवर कोणीतरी त्रयस्थ व्यक्तीने (गावातील आपसातील मतभेदामुळे) प्रसिध्द केला असे चौकशी मध्ये दिसून आले.या विहिरीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे,त्या विहीरीचे पाणी वापरले जात नसून त्या विहिरीला अत्यल्प पाणी दिसून आले.

दरम्यान, विहिर अधिग्रहण प्रस्ताव मान्यता मिळेपर्यंत ग्रामपंचायत बोरीचीबारी हे आता स्वखर्चाने पुरेसा पाणी पुरवठा करणार असून सार्वजनिक विहिरीत ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे पाणी न टाकता ग्रामस्थांच्या (Villagers) घरासमोरील ड्रममध्ये ठिकठिकाणी टँकरद्वारे पाणी वाटप सुरू केले आहे.तसेच क्षेत्रीत स्तरावरील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी गंभीरतेने पाणीटंचाई व टंचाई निवारणार्थ केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी व नागरिकांना पाण्यासाठी वन वन भटकावे लागणार नाही,याबाबत आवश्यक ती कार्यवाही तत्परतेने करावी असे आव्हान प्रांताधिकारी यांच्यामार्फत करण्यात येत आहे.

 

 

Nashik News : येवला रेल्वेस्थानकाची उपेक्षा; एक्स्प्रेस गाड्यांना थांबा नाही

0

येवला | योगेंद्र वाघ | Yeola

कांद्याची (Onion) मोठी बाजारपेठ, जगप्रसिद्ध हातमाग पैठणीचे महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र तसेच संभाजीनगर, नाशिक, धुळे व अहिल्यानगर या चार जिल्ह्यांना (District) मध्यवर्ती ठिकाण, असा येवला शहराचा लौकिक आहे. येवला येथे रेल्वेस्थानक बांधण्यात आले आहे. मात्र, या स्थानकावर अनेक एक्स्प्रेस, सुपर एक्स्प्रेस प्रवासी गाड्या थांबत नसल्याने परिसरातील नोकरदार, व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी, कामगार, पैठणी विणकर या सर्वांचीच मोठी अडचण होते.

येवला स्थानकावर (Yeola Railway Station) एक्स्प्रेस, सुपर एक्सप्रेस प्रवासी रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा यासह सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, या मागणीसाठी येवलेकरांनी रेल्वे प्रशासनाला सातत्याने निवेदने दिली, कधी आंदोलने केली. मात्र, केवळ रंगरंगोटीने रेल्वेस्थानकाचा चेहरामोहरा बदलण्यापलीकडे प्रवाशांच्या सोयीसाठी अपेक्षित असे काहीही झालेले नाही. रेल्वेकडे मागण्या होऊनही येवला रेल्वेस्थानक दुर्लक्षितच राहिले आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात असणाऱ्या येवला स्थानकाचा २०२१ मध्ये पुणे विभागात विलिनीकरण करण्याच्या हालचालींना वेग आला.

गेल्यावर्षी हे स्थानक पुणे विभागात (Pune Divison) गेले. येवला रेल्वेस्थानक दौंड-मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. स्थानकावर दोन फलाट, तीन मार्गिका असून विद्युतीकरण झालेले आहे. मध्य रेल्वेच्या मनमाड-दौंड-पुणे मार्गावर पॅसेंजर, एक्स्प्रेस व सुपर एक्स्प्रेस अशा तीसपेक्षा अधिक प्रवासी रेल्वेगाड्या धावतात. यातील बन्ऱ्याच गाड्या आठवड्यातील सातही दिवस दररोजच आवागमन करतात. काही एक्स्प्रेस गाड्या विशिष्ट दिवशी धावतात.

दररोजच धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमधील (Railway Trains) केवळ गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस, निजामाबाद पुणे एक्स्प्रेस, कोल्हापूर- गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस. दौंड निजामाबाद एक्सप्रेस या चारच प्रवाशी रेल्वे गाड्या सध्या येवला स्थानकावर थांबतात. इतर अनेक गाड्यांना येवला स्थानकावर थांबा नाही. अनेक एक्स्प्रेस व सुपर एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना येवला रेल्वे स्थानकात थांबा नसल्याने येवलेकरांना या गाड्यांसाठी एकतर मनमाड स्थानक किंवा काही गाड्यांसाठी कोपरगाव रेल्वेस्थानक गाठावे लागते.

येवला परिसरातील (Yeola Area) व्यापारी, नोकरदार, विद्यार्थी, शेतकरी वर्ग यांना ये जा करण्यासाठी व माल वाहतुकीसाठी महत्वपूर्ण असलेल्या येवला रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण विकास होणे अपेक्षित आहे. त्याचबरोचर पुणे अमरावती, पुणे नागपूर, पुणे-साईनगर, दादर-साईनगर व झेलम एक्सप्रेस या प्रवाशी रेल्वेगाड्यांना येवले रेल्वे स्थानकात थांबा देण्याची येवलेकरांची मागणी आहे.

स्थानकावर बंद असलेली तिकीट आरक्षण खिडकी सुरू करण्याची गरज आहे. रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक २ चे काम तीन वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे. येवला रेल्वेस्थानकावरील कॅन्टीन करोनाकाळानंतर उघडलेली नाही. प्रतीक्षालय बंद राहते, स्थानकाची सुरक्षा व्यवस्था रामभरोसेच आहे. स्थानकावर दिवसा तर सोडाच; रात्रीच्या वेळीही रेल्वे पोलीसदलाचा एक जवानही तैनात नसतो. रेल्वेहद्दीत काही घटना घडली तरच रेल्वेपोलीस दिसतात.

सन २०२३ मध्ये छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे येवला रेल्वे स्थानकाचा भारतीय रेल्वेच्या ‘अमृत भारत स्थानक’ योजनेत समावेश करून स्थानकांचा प्राधान्याने विकास करावा, अशी मागणी केली होती. या योजनेत येवल्याचा समावेशही झाला होता. मात्र, नंतर त्या योजनेतून येवल्याचे नाव गायब झाले.

तीन दिवसांपूर्वी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे (MP Bhaskar Bhagare) येवला दौऱ्यावर आले असता त्यांनी येवला रेल्वे स्थानकाला भेट देवून पाहणी केली. स्थानिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. रेल्वेचे प्रश्नही समजून घेतले. माजी मंत्री भुजबळ असो वा खासदार भगरे अथवा सत्ताधारी पक्ष कोणाकडूनही येवला रेल्वेस्थानकाचा कायापालट व्हावा व प्रवासी सुविधांसह एक्सप्रेस, सुपर एक्सप्रेस रेल्वेगाड्यांना येवला स्थानकावर थांबा मिळावा, अशी सर्वसामान्य येवलेकरांची अपेक्षा आहे.

किफायतशीर स्थानक

येवला तालुक्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने येथील व्यापारीवर्गाकडून खरेदी केलेला कांदा हा रेल्वे रॅकद्वारे बाहेर पाठवला जातो. कांदा वाहतुकीमुळे मध्य रेल्वेला महिन्याकाठी सरासरी सुमारे दोन कोटी रूपयांचे उत्पन्न मिळते. शिवाय प्रवासी तिकिटांचे उत्पन्न मिळते ते वेगळेच!

Maharashtra Politics: राज ठाकरे स्वाभिमानी नेते, त्यांना झुकवून युती होईल असे वाटत नाही; ठाकरे बंधुंच्या युतीवर शिंदे गटातील मंत्र्यांचे वक्तव्य

0
झुकवून
uddhav thackeray raj thackeray

सोलापूर | Solapur
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्याची साद घातली. उद्धव ठाकरेंनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे ठाकरे कुटुंबाच्या कलहावर पडदा पडणार का? असा प्रश्न सध्या सर्वसामान्य जनतेपासून ते राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. राजकारणात कोणीही एकत्र आले तर चांगलेच आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. आता, शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरे हे कुठल्याही अटी-शर्ती मानणारे नाहीत, असे म्हणत हे एकत्रिकरण शक्य नसल्याचे सूचवले आहे.

काय म्हणाले उदय सामंत?
मंत्री उदय सामंत सोलापूरमध्ये माढा येथे कार्यक्रमावेळी म्हणाले की, ‘मनसे प्रमुख राज ठाकरे हे स्वाभिमानी नेते आहेत. त्यांना झुकवून युती होईल असे वाटत नाही. उद्धव ठाकरे यांच्या अटींमुळे ठाकरे बंधूंची युती होणे अशक्य आहे’, असे उदय सामंत यांनी स्पष्ट सांगितले.

ते पुढे म्हणाले, ‘कुणाबरोबर जेवायचे नाही, कुणाबरोबर बोलायचे नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊ नये. पंतप्रधान मोदी -शाह यांचे फोटो लावू नयेत. अशा कोणत्याही अटी उद्धव ठाकरे घालतात. अशा परिस्थितीत राज ठाकरे यांना झुकवून युती होणे शक्य वाटत नाही, असे उदय सामंत म्हणाले.

राज ठाकरे यांच्या मनसे नेत्यांना सुचना
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या प्रश्नाबाबत २९ तारखेपर्यंत बोलू नका, अशा सूचना राज ठाकरेंकडून देण्यात आल्या आहेत. राज ठाकरे सध्या परदेशात आहेत. त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीचा विषय संवेदनशील आहे. त्यामुळे २९ एप्रिलपर्यंत कोणीही बोलू नका, अशा सूचना राज ठाकरेंकडून मनसेच्या नेत्यांना देण्यात आल्या आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Nashik Politics : “तुम्हीच राज ठाकरेंना मातोश्रीचे निमंत्रण देत महाराष्ट्राला…”; नाशिकच्या कार्यकर्त्यांची उद्धव ठाकरेंना कळकळीची विनंती

0

नाशिक | Nashik

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अभिनेते महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मराठी माणसांसाठी आमच्यातील वाद किरकोळ असून, मी महाराष्ट्राच्या (Maharashtra) हितासाठी माझा इगो बाजूला ठेवून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करण्यास तयार आहे, असे म्हटले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.

राज ठाकरे यांनी घातलेल्या सादीनंतर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) देखील तत्काळ प्रतिसाद दिला. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) नव्या समीकरणांची चाहूल लागू लागली आहे. या दोन्ही भावांनी एकत्र यावे, अशा आशयाचे फलक राज्यातील विविध शहरांत लागले आहेत. यात एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला असणाऱ्या नाशिकमध्ये लागलेल्या फलकाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगत आहे.

नाशिक येथील शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena UBT) मध्यवर्ती कार्यालयासमोर शिवसैनिकांनी फलक लावून उद्धव ठाकरे यांना मनोमिलनासाठी विनंती केली आहे. तसेच आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत. अनेक दबाव आणि अमिष आले तरी डगमगलो नाही. आगामी काळात उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी सज्ज आहोत, असे या फलकावर लिहिले आहे.

तसेच तुम्हीच राज ठाकरेंना मातोश्रीचे (Matoshree) निमंत्रण देत महाराष्ट्राला आनंदाची बातमी द्यावी, असे आवाहन या समर्थकांनी उद्धव ठाकरेंना फलकाद्वारे केले आहे. नाशिकमधील (Nashik) हे फलक सर्वांचेच लक्ष वेधत आहे. मात्र, आता उद्धव ठाकरे शिवसैनिकांच्या विनंतीला मान देतील का हे बघणं औत्सूक्याचे ठरणार आहे.

 

 

IPL 2025 : KKR vs GT – कोलकाता नाईट रायडर्ससमोर गुजरात टायटन्सचे आव्हान; कुणाचे पारडे जड?

0

मुंबई | Mumbai

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (सोमवारी) कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध गुजरात टायटन्स (Gujarat Titans vs Kolkata Knight Riders) सामना खेळविण्यात येणार आहे. हा सामना सायंकाळी ७:३० वाजता खेळविण्यात येणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाचे कर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे (Ajinkya Rahane) तर शुभमन गिलकडे गुजरात टायटन्सचे कर्णधारपद असणार आहे.

आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये यंदाच्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने ७ सामने खेळले असून, ३ सामन्यात विजय संपादन केला आहे. तर ४ सामन्यात संघाचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे यंदाच्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सने ईडन गार्डन्स स्टेडियमवर ३ सामने खेळले असून, सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध एकमेव विजय (Won) संपादन केला आहे. मात्र,लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूध्द कोलकाता नाईट रायडर्स संघाला पराभवाचा (Defeat) सामना करावा लागला आहे.

आयपीएल २०२५ स्पर्धेचा निर्णायक टप्पा सुरू झाला आहे. उपांत्य फेरीत आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स संघाला ७ पैकी ५ सामन्यात विजय संपादन करावा लागणार आहे.दुसरीकडे शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने यंदाच्या मोसमात चमकदार कामगिरी केली आहे. गुजरात टायटन्स ने मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू सारख्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील तगड्या संघांना पराभवाची धूळ चारून इतिहास रचला आहे.

दरम्यान, आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स संघांमध्ये ४ सामने (Match) खेळविण्यात आले असून, हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास गुजरात टायटन्सने २ तसेच कोलकाता नाईट रायडर्स ने १ विजय संपादन केला आहे. तर १ सामना पावसामुळे (Rain) रद्द करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये एकमेव सामना खेळविण्यात आला होता. या सामन्यात गुजरात टायटन्स ने कोलकाता नाईट रायडर्स संघाला पराभूत केले होते. या पराभवाची परतफेड करण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स संघाला संधी असणार आहे.