Wednesday, September 9, 2026
Homeदेश विदेशपाकिस्तानला नकाशावर दिसायचं असेल तर…; भारताच्या धमकीला पाकिस्तानचे प्रत्यूत्तर, म्हणाले, भविष्यात कुठलाही…

पाकिस्तानला नकाशावर दिसायचं असेल तर…; भारताच्या धमकीला पाकिस्तानचे प्रत्यूत्तर, म्हणाले, भविष्यात कुठलाही…

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
“दहशतवादाला खतपाणी घालणं थांबवा, अन्यथा नकाशावरून मिटवू”, असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला होता. यावर आता पाकिस्तानने प्रतिक्रिया दिली आहे. जर भविष्यात या दोन्ही देशात युद्ध झाले तर ते खूप विनाशकारी असेल. पाकिस्तानी सैन्य शत्रूच्या प्रत्येक भागात लढण्यास सक्षम आहे अशी पोकळ धमकी पाकिस्तानी सैन्याने दिली आहे.

नेमकं काय म्हटले आहे पाकिस्तानने?
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्या निवेदनात म्हटलेय की, भारतीय संरक्षण मंत्री आणि सैन्य प्रमुखांकडून चिथावणीखोर विधाने पाहता भविष्यात कुठलाही संघर्ष झाला तर तो खूप विनाशकारी असू शकतो हा आमचा इशारा समजा. जर शत्रूत्वाचा नवा काळ सुरू झाला तर पाकिस्तान मागे हटणार नाही. आम्ही विना कुठलीही पर्वा न करता जोरदार प्रत्युत्तर देऊ. नवीन नियम बनवण्याचा विचार करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे की पाकिस्तानने आता एक नवीन पद्धत स्वीकारली आहे, ही पद्धत जलद, निर्णायक आणि विनाशकारी असेल असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

…तर त्याचे परिणाम दोन्ही बाजूंना होतील
तसेच अनावश्यक धमक्या आणि कुठल्याही हल्ल्यांना तोंड देताना पाकिस्तानचे लोक आणि सशस्त्र दल प्रत्येक शत्रूच्या प्रदेशात लढण्याची क्षमता आणि दृढनिश्चय बाळगतात. यावेळी आम्ही भौगोलिक सीमांमागे लपून राहण्याची कल्पना मोडून काढू आणि भारतीय भूभागाच्या सर्वात दुर्गम कोपऱ्यात पोहोचू. नकाशावरून पाकिस्तानला पुसून टाकण्याबाबत बोलाल तर, जर अशी परिस्थिती उद्भवली तर त्याचे दोन्ही बाजूंना परिणाम होतील हे भारताने जाणून घेतले पाहिजे असेही पाकिस्तानी सैन्याने म्हटले आहे.

भारताने नेमकं काय म्हंटलं होतं?
ऑपरेशन सिंदूरनंतर, भारताची पाकिस्तानविरुद्धची भूमिका आणखी कठोर झाली आहे. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शुक्रवारी (३ ऑक्टोबर) गंगानगरमधील घडसाणातील गावांना भेट दिली आणि येथून पाकिस्तानला इशारा दिला की “पाकिस्तानला नकाशावर दिसायचं असेल तर त्यांना दहशतवाद्यांना मदत करणं थांबवावं लागेल.”

सीमावर्ती भागात राहणारे लोक हे देखील सैनिकच आहेत. ते लोक सैन्याच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत. देशासमोर उभी ठाकणारी सर्व आव्हाने पेलण्यास लष्कराबरोबर भारतीय नागरिकही सज्ज आहेत.जर पाकिस्तानला जागतिक नकाशावर टिकून राहायचे असेल, तर त्याने आपल्या भूमीवरून दहशतवाद्यांना आश्रय व पाठिंबा देणे थांबवले पाहिजे असे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला खडसावले होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

संपादकीय : आरोग्य व्यवस्थेवरील हल्ले

0
डॉक्टर हा देवाचे रूप असतो’ अशी श्रद्धा समाजात पिढ्यान्पिढ्या रुजलेली आहे. आपल्या प्राणांचे रक्षण करणार्‍या, अहोरात्र रुग्णांच्या सेवेत झटणार्‍या वैद्यकीय कर्मचार्‍यांबद्दल प्रत्येकाच्या मनात एक...