Friday, May 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूज'पंचवटी अ‍ॅनेक्स प्रॉपर्टी एक्स्पो'चे आज उद्घाटन

‘पंचवटी अ‍ॅनेक्स प्रॉपर्टी एक्स्पो’चे आज उद्घाटन

‘देशदूत’चा उपक्रम: घरे, शॉप्स खरेदी आणि गुंतवणुकीची सुवर्णसंधी

- Advertisement -

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकमधील नागरिकांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी दैनिक ‘देशदूत’च्या वतीने ‘पंचवटी अ‍ॅनेक्स (जत्रा चौफुली) प्रॉपर्टी एस्पो २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

या तीन दिवसीय प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन शुक्रवारी (दि. २९) सायंकाळी ५ वाजता आमदार राहुल ढिकले, प्रभाग क्रमांक २ च्या नगरसेविका ऐश्वर्या लाड जेजुरकर व जयवंत जेजुरकर आणि आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. प्रदर्शन रविवार ३१ मे २०२६ पर्यंत जत्रा चौफुली, नांदूर-लिंक रोड, पंचवटी येथील रामलिला बँक्वेट हॉलमध्ये भरविण्यात येणार आहे. प्रदर्शन दुपारी २ ते रात्री ९ या वेळेत ते सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुले राहील. नाशिक शहरात हक्काच्या घराचा शोध घेणार्‍यांसाठी आणि रिअल इस्टेट क्षेत्रात फायदेशीर गुंतवणूक करू इच्छिणार्‍यांसाठी हे प्रदर्शन एक उत्तम सुवर्णसंधी ठरणार आहे.

‘स्वप्न तुमचे, शोध आमचा’ हे ब्रीदवाय घेऊन आयोजित केलेल्या या एस्पोमध्ये नाशिकमधील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे लझरी प्रोजेट्स, बजेट आणि प्रीमियम घरे, तसेच व्यावसायिक वापरासाठी लागणारे कमर्शियल शॉप्स व ऑफिसेस एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये ग्राहकांना हॉटेल जत्रा, कोणार्क नगर, रासबिहारी रोड, संभाजीनगर रोड, आडगाव नाका परिसर आणि बळी मंदिर या भागातील नवनवीन व पूर्ण झालेल्या विविध गृहप्रकल्पांची प्रत्यक्ष माहिती आणि अनुभव घेता येईल. नाशिककरांनी आपल्या कुटुंबासह या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी, असे आग्रहाचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रदर्शनात पार्कसाईड, ललित रुंगटा ग्रुप, दक्ष रियल्टी, स्कीया प्रॉपर्टीज, सीडीआयएल, ललवाणी ग्रुप जय डेव्हलपर्स, एलिका ग्रुप, आरसीपीएल, शेठ रियल्टी, सुमित बिल्डकॉन, सचिन पी. बागड, एस अँड एस डेव्हलपर्स, ट्रिनिटी रियल्टस, ए. आर. डेव्हलपर्स, नंदन, ओंकारंश्वर इन्फ्राटेक, अर्थलँड डेव्हलपर्स, विजा प्रॉपर्टीज् यांसारखे नामांकित ब्रँड्स सहभागी झाले आहेत. तसेच पपयाज् नर्सरी हे या प्रदर्शनाचे एन्व्हायरमेंट पार्टनर आहेत.

ताज्या बातम्या

‘देशदूत’ पंचवटी अ‍ॅनेक्स प्रॉपर्टी एक्स्पोचे दिमाखात उदघाटन

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik नाशिकमधील नागरिकांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी दैनिक ‘देशदूत’च्या वतीने आयोजित ‘पंचवटी अ‍ॅनेक्स प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ चे शुक्रवारी सायंकाळी अत्यंत...